AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

ISRO Recruitment 2021 : इस्रोमध्ये नोकरीची संधी, अकाउंट्स ऑफिसरसह अनेक पदांवर जागा रिक्त

या रिक्त जागा अंतर्गत एकूण 24 पदे नेमणूक केली जातील. या पदांसाठी अर्ज करू इच्छिणारे उमेदवार isro.gov.in या अधिकृत संकेतस्थळावर जाऊन ऑनलाईन अर्ज करू शकतात. (Job opportunities in ISRO, vacancies in several posts including Accounts Officer)

ISRO Recruitment 2021 : इस्रोमध्ये नोकरीची संधी, अकाउंट्स ऑफिसरसह अनेक पदांवर जागा रिक्त
इस्रोमध्ये नोकरीची संधी, अकाउंट्स ऑफिसरसह अनेक पदांवर रिक्त जागा
वैजंता गोगावले
वैजंता गोगावले | Edited By: Anish Bendre | Updated on: Apr 15, 2021 | 8:26 AM
Share

ISRO Recruitment 2021 नवी दिल्ली : इंडियन स्पेस रिसर्च ऑर्गनायजेशन (Indian Space Research Organization, ISRO)ने सरकारी नोकरीची एक मोठी संधी उपलब्ध झाली आहे. प्रशासकीय अधिकारी(Administrative Officer), लेखा अधिकारी(Accounts Officer), खरेदी व स्टोअर अधिकारी(Purchase & Stores Officer) यासह अनेक पदांच्या भरतीसाठी इस्रोने अधिसूचना जारी केली आहे. या रिक्त पदासाठी अर्ज प्रक्रिया (ISRO Recruitment 2021) 1 एप्रिल 2021 पासून सुरू झाली आहे. यामध्ये 21 एप्रिल 2021 पर्यंत अर्ज करण्याची मुदत देण्यात आली आहे. यासह फी जमा करण्याचीही शेवटची तारीखही 21 एप्रिलच आहे. या रिक्त जागा अंतर्गत एकूण 24 पदे नेमणूक केली जातील. या पदांसाठी अर्ज करू इच्छिणारे उमेदवार isro.gov.in या अधिकृत संकेतस्थळावर जाऊन ऑनलाईन अर्ज करू शकतात. (Job opportunities in ISRO, vacancies in several posts including Accounts Officer)

या पदांसाठी होईल भरती

जारी केलेल्या अधिसूचनेनुसार एकूण 24 पदांवर भरती होणार आहे. या (ISRO Recruitment 2021) मध्ये खरेदी व स्टोअर ऑफिसरच्या 12, प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या 6 आणि लेखा अधिकारी यांच्या 6 जागांसाठी नियुक्ती करण्यात येणार आहे. यासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांना फी जमा करण्यासाठी 23 एप्रिलपर्यंत मुदत देण्यात आली आहे.

कोण अर्ज करू शकेल?

यामधील अधिसूचनेनुसार, लेखा अधिकारी पदा (Account Officer)वर ऑनलाईन अर्ज करणाऱ्या उमेदवारांना कोणत्याही मान्यताप्राप्त संस्थेकडून एसीए / एफसीए किंवा एआयसीडब्ल्यूए / एफआयसीडब्ल्यूए किंवा एमबीए किंवा एमकॉममध्ये 1 वर्षाचा अनुभव असणे आवश्यक आहे.

प्रशासकीय अधिकारी पात्रता

प्रशासकीय अधिकारी पदासाठी ऑनलाईन अर्ज करणाऱ्या उमेदवारांना एमबीएसह सुपरवायजर पदावर एक वर्षाचा अनुभव किंवा पदव्युत्तर पदवीसह 3 वर्षाचा अनुभव किंवा 5 वर्षाचा पदवीधर (पदवीधारकाची क्षमता 2 वर्ष) असावी. पूर्ण माहितीसाठी अधिकृत सूचना पहा.

या तारखा लक्षात ठेवा

ऑनलाईन अर्ज करण्याला प्रारंभ : 1 एप्रिल 2021

ऑनलाईन अर्ज जमा करण्याची शेवटची तारीख : 21 एप्रिल 2021

फी जमा करण्याची शेवटची तारीख : 23 एप्रिल 2021 (Job opportunities in ISRO, vacancies in several posts including Accounts Officer)

इतर बातम्या

Alia Bhatt | आलिया भट्ट अखेर कोरोनामुक्त, आलिया म्हणते – निगेटिव्ह होणं पहिल्यांदाच चांगलं वाटतंय!

नि:शब्द ! जीव वाचवण्यासाठी रुग्णांना खुर्चींवर झोपवून ऑक्सिजन, कल्याणमधील विदारक वास्तव

Follow Us
शिवसेना सुनावणी, नीट आंदोलन, राजकीय घडामोडींचा आढावा
महाराष्ट्रातील महत्त्वाच्या बातम्या: शिवसेना सुनावणी, नीट आंदोलन, राजकीय घडामोडींचा आढावा
आवडत्या शिक्षकाची बदली रोखण्यासाठी विद्यार्थी थेट आमदारांकडे पोहोचले,
आवडत्या शिक्षकाची बदली रोखण्यासाठी विद्यार्थी थेट आमदारांकडे पोहोचले, मग शिंदेंच्या आमदाराने काय प्रतिक्रिया दिली पाहा...
मोठी खळबळ! कुंभमेळा घोटाळ्यात मत्री गिरीश महाजनांच्या 2 नातलगांना अटक,
मोठी खळबळ! कुंभमेळा घोटाळ्यात मत्री गिरीश महाजनांच्या 2 नातलगांना अटक, नेमकं काय घडलं?
CM फडणवीसांचा मोठा निर्णय; भरती परीक्षांबाबत सरकारचा मास्टरप्लॅन
CM फडणवीसांचा मोठा निर्णय; भरती परीक्षांबाबत सरकारचा मास्टरप्लॅन, नेमकं काय घडणार?
इमामपूर रोडवर वाल्मिक कराड समर्थकांकडून गोळीबार; नेमकं काय घडलं?
मोठी बातमी! इमामपूर रोडवर वाल्मिक कराड समर्थकांकडून गोळीबार; नेमकं काय घडलं?
चेन्नईला जाणाऱ्या इंडिगो विमानाच्या इंजिनमध्ये बिघाड
Kolkata To Chennai Flight | चेन्नईला जाणाऱ्या इंडिगो विमानाच्या इंजिनमध्ये बिघाड; विमानाचं तातडीने लँडिंग, चेन्नई विमानतळावर आपत्काल जाहीर
कोर्टाच्या आगामी सुनावणीत मोठं घडणार? सुनावणीच्या अखेरीच कपिल सिब्बल..
कोर्टाच्या आगामी सुनावणीत मोठं घडणार? सुनावणीच्या अखेरीच कपिल सिब्बल यांची मोठी मागणी
शिंदेंच्या मुख्यमंत्रीपदावरच सिब्बलांचा सवाल; कोर्टात नेमकं काय घडलं?
Shivsena Case Hearing | एकनाथ शिंदेंच्या मुख्यमंत्रीपदावरच सिब्बलांचा सवाल; सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडलं?
फूट म्हणजे नक्की काय? सुप्रीम कोर्टाचा थेट सवाल; सिब्बलांचा युक्तिवाद
Shivsena Hearing | फूट म्हणजे नक्की काय? सुप्रीम कोर्टाचा थेट सवाल; कपिल सिब्बलांचा जोरदार युक्तिवाद
कपिल सिब्बलांचा एक-एक युक्तिवाद, शिंदे गटाची धाकधूक वाढली...
Kapil Sibbal | कपिल सिब्बलांचा एक-एक युक्तिवाद, शिंदे गटाची धाकधूक वाढली; सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडतंय?