Alia Bhatt | आलिया भट्ट अखेर कोरोनामुक्त, आलिया म्हणते – निगेटिव्ह होणं पहिल्यांदाच चांगलं वाटतंय!

आपल्या कलेच्या जोरावर कोट्यवधी तरुणांच्या मनावर अधिराज्य गाजवणारी आलिया काही दिवसांपूर्वी कोरोना पॉझिटिव्ह आली होती.

  • टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम
  • Published On - 22:56 PM, 14 Apr 2021
Alia Bhatt | आलिया भट्ट अखेर कोरोनामुक्त, आलिया म्हणते - निगेटिव्ह होणं पहिल्यांदाच चांगलं वाटतंय!
बॉलिवूड अभिनेत्री आलिया भट्टची कोरोना चाचणी निगेटिव्ह आली आहे.

मुंबई : बॉलिवूड अभिनेत्री आलिया भट्टच्या चाहत्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. आलिया भटने कोरोनावर मात केलीय. आपल्या कलेच्या जोरावर कोट्यवधी तरुणांच्या मनावर अधिराज्य गाजवणारी आलिया काही दिवसांपूर्वी कोरोना पॉझिटिव्ह आली होती. आलियाने स्वत:च सोशल मीडियावर आपण कोरोना पॉझिटिव्ह आल्याची माहिती दिली होती. त्यानंतर आलिया कोरोनामुक्त व्हावी यासाठी तिचे चाहते प्रार्थना करत होते. (Bollywood actress Alia Bhatt’s corona test negative)

आलिया भट्टने स्टुडंट्स ऑफ द इयरपासून आपल्या करिअरची सुरुवात केली होती. या चित्रपटानंतर आलियाने आपल्या करिअरमध्ये कधीच मागे वळून पाहिलं नाही. आलियाने आता अखेर कोरोनावर मात केलीय. आलियाने स्वत: सोशल मीडियावर ही आनंदाची बातमी जाहीर केली आहे. आलियाने सांगितलं की, तिची कोरोना चाचणी निगेटिव्ह आली आहे. निगेटिव्ह होणं पहिल्यांदाच चांगलं वाटत असल्याचं आलियाने म्हटलंय.

 

View this post on Instagram

 

A post shared by Alia Bhatt ☀️ (@aliaabhatt)

आलियाच्या चेहऱ्यावर आनंद ओसंडून वाहतोय

आलियाने आपल्या पोस्टसह एक फोटोही शेअर केलाय. या फोटोमध्ये ती निळा टी शर्ट आणि पिंक लोअरमध्ये पाहायला मिळतेय. या फोटोमध्ये आलियाच्या चेहऱ्यावर आनंद स्पष्ट दिसून येतोय. आलियाने कोरोनावर मात केल्यानंतर तिचे चाहते चांगलेच आनंदी झाले आहेत.

काही दिवसांपूर्वी इन्स्टाग्राम अकाऊंटवर आलियाने आपला कोरोना चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आल्याची माहिती दिली होती. आपण होम क्वारंटाईन आहोत आणि डॉक्टरांनी दिलेल्या सर्व सूचना काटेकोरपणे पाळत असल्याचंही आलिया म्हणाली होती.

आलियाने बदलला इंस्टाग्रामचा फोटो

अलीकडेच आलिया भट्टने तिच्या इंस्टाग्रामचा प्रोफाईल फोटो बदलला आहे. अलीकडेच अभिनेत्री सुट्टीसाठी मालदीवमध्ये गेली होती. यावेळीचा एका फोटो अभिनेत्रीने इंस्टाग्रामवर पोस्ट केला आहे. फोटोत आलिया समुद्राच्या क्रिस्टल क्लीअर निळ्या पाण्याजवळ बसलेली दिसत आहे.

या फोटोमध्ये आलिया चमकदार रंगाच्या बिकिनीमध्ये वावरताना दिसत आहे. फोटोमध्ये ती ओल्या वाळूवर बसलेली दिसत आहे. या अभिनेत्रीने आपले डोळे खाली झुकवले आहेत आणि आपले केस ठीक करताना दिसत आहे. आलियाने यापूर्वीच हा फोटो तिच्या पेजवर शेअर केला होता. आता अभिनेत्रीच्या या इंस्टाग्राम प्रोफाईल फोटोने सोशल मीडियावर चांगलीच चर्चा रंगली आहे

 

View this post on Instagram

 

A post shared by Alia Bhatt ☀️ (@aliaabhatt)

इतर बातम्या :

Video | ‘बैसाखी’च्या शुभ मुहूर्तावर नीतूला आली ऋषी कपूरची आठवण, डान्स व्हिडीओ शेअर करत म्हणाल्या…

PHOTO | शहनाज गिलचा क्यूट अँड हॉट लूक पाहून चाहते घायाळ, पाहा फोटो…

Bollywood actress Alia Bhatt’s corona test negative