नि:शब्द ! जीव वाचवण्यासाठी रुग्णांना खुर्चींवर झोपवून ऑक्सिजन, कल्याणमधील विदारक वास्तव

कोरोनाचं थैमान इतकं भयानक वाढलंय की त्यामुळे निर्माण झालेली परिस्थिती शब्दांमध्ये सांगता येणार नाही. (No beds available in Kalyan Dombivali for corona patients).

नि:शब्द ! जीव वाचवण्यासाठी रुग्णांना खुर्चींवर झोपवून ऑक्सिजन, कल्याणमधील विदारक वास्तव
विदारक वास्तव, ऐतिहासिक शहर, लाखोंची वस्ती, कोरोनाबाधितांसाठी एकही बेड शिल्लक नाही
Follow us
| Updated on: Apr 14, 2021 | 11:04 PM

कल्याण (ठाणे) : कोरोनाचं थैमान इतकं भयानक वाढलंय की त्यामुळे निर्माण झालेली परिस्थिती शब्दांमध्ये सांगता येणार नाही. कल्याणमध्ये तर प्रचंड भयानक परिस्थिती आहे. इथे रुग्णांना बेड मिळणं खूप कठीण झालंय. सरकारी असो किंवा खासगी, सर्वच रुग्णालये फुल झाली आहेत. आरोग्य यंत्रणेवर प्रचंड ताण वाढला आहे. अशा परिस्थितीत अत्यवस्थ किंवा ऑक्सिजनची आवश्यकता असणाऱ्या रुग्णांना महापालिका रुग्णालयात पेसेजमध्ये असलेल्या खुर्च्यांवर झोपवून ऑक्सिजन दिला जातोय. ही भयानक परिस्थिती बघून मनाला चटका बसेल. पण हे वास्तव नाकारता येणार नाही (No beds available in Kalyan Dombivali for corona patients).

कल्याण डोंबिवलीत कोरोनाचा उद्रेक

कल्याण डोंबिवलीत कोरोनाचा उद्रेक सुरुच आहे. केडीएमसीतील एकूण रुग्णांच्या संख्येने आता एक लाखांचा आकडा पार केला आहे. खाजगी असो किंवा महापालिका रुग्णालय, रुग्णांसाठी बेडच नाही. खाजगी रुग्णालयात इंजेक्शन नाही. परिस्थिती इतकी विदारक आहे की, कल्याणच्या रुक्मीणीबाई रुग्णालयातील पॅसेजमध्ये रुग्णांकरीता बसविण्याची व्यस्था असते. त्याच खुर्च्यांवर आता रुग्णांना झोपवून ऑक्सिजन दिला जात आहे. हे चित्र पाहून सगळ्यांनाच धक्का बसेल.

रुग्णांचा जीव वाचवणं हेच आमच्या दृष्टीने महत्त्वाचं : आयुक्त

या विदारक परिस्थितीवर केडीएमसी आयुक्त विजय सूर्यवंशी यांच्याशी बोलण्याचा आम्ही प्रयत्न केला. तेव्हा त्यांनीदेखील या परिस्थितीवर नाराजी व्यक्त केली. पण सध्या पर्याय नसल्याने प्रशासनदेखील हतबल असल्याचं त्यांच्या बोलण्यातून जाणवलं. प्रशासन आपल्यातर्फे सर्वोतोपरी प्रयत्न करत आहे. मात्र, रुग्णवाढ ही प्रचंड वेगाने होत आहे. अशा परिस्थितीत रुग्णांचा जीव वाचवणं हेच महत्त्वाचं उद्दीष्ट असल्याचं महापालिका आयुक्तांच्या बोलण्यातून लक्षात आलं.

महापालिका आयुक्त नेमकं काय म्हणाले?

“संशयीत रुग्णांवर रिपोर्ट येण्यापूर्वी उपचार केले जात आहे. ज्यांना ऑक्सिजनची गरज  आहे, त्यांना ऑक्सिजन दिला जात आहे. रुग्णांचा जीव वाचविणे हेच आमच्या दृष्टीने महत्वाचे आहे. उद्या टास्क फोर्सची बैठक घेतली जाणार आहे. वेबीनारच्या माध्यमातून खाजगी रुग्णालयांशी संपर्क साधून इंजेक्शन, बेड, ऑक्सीजनची उपलब्धता याचा आढावा घेतला जाणार आहे”, अशी प्रतिक्रिया विजय सूर्यवंशी यांनी दिली.

केडीएमसीत कोरोना रुग्णांची संख्या 1 लाखांच्या पार

कल्याण डोंबिवली महानगरपालिका क्षेत्रात कोरोना रुग्णांनी 1 लाखांचा टप्पा ओलांडला आहे. केडीएमसीत दिवसभरात 1390 कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे. गेल्या 24 तासांत 1688 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. तर कोरोनामुळे आज चार जणांचा मृत्यू झाला आहे.

हेही वाचा : ठाण्यात कोरोना स्थिती चिंताजनक, वॉर रुमचे तीनतेरा; उडवाउडवीची उत्तरं दिल्यामुळे मनसेचा हंगामा

Non Stop LIVE Update
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?.
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप.
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या..
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या...
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान.
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?.
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल.
मतदार निघाले मतदान करायला पण EVM मशीनच बंद, कुठं घडला प्रकार?
मतदार निघाले मतदान करायला पण EVM मशीनच बंद, कुठं घडला प्रकार?.
लोकसभेच्या मतदानाचा आज दुसरा टप्पा, महाराष्ट्रात या 8 मतदारसंघात मतदान
लोकसभेच्या मतदानाचा आज दुसरा टप्पा, महाराष्ट्रात या 8 मतदारसंघात मतदान.
नो खैरे ओन्ली भूमरे...शिंदेंचं आवाहन, फडणवीसांनी काढली विरोधकांची औकात
नो खैरे ओन्ली भूमरे...शिंदेंचं आवाहन, फडणवीसांनी काढली विरोधकांची औकात.
भरसभेत पवारांनी लावला मोदींचा व्हिडीओ, तर शिंदे-फडणवीसांकडून पलटवार
भरसभेत पवारांनी लावला मोदींचा व्हिडीओ, तर शिंदे-फडणवीसांकडून पलटवार.