Thane Corona Update | ठाण्यात कोरोना स्थिती चिंताजनक, वॉर रुमचे तीनतेरा; उडवाउडवीची उत्तरं दिल्यामुळे मनसेचा हंगामा

Thane Corona Update | ठाण्यात कोरोना स्थिती चिंताजनक, वॉर रुमचे तीनतेरा; उडवाउडवीची उत्तरं दिल्यामुळे मनसेचा हंगामा
THANE WAR ROOM

ठाणे वॉर रुममधील कर्मचारी आज सकाळपासून कोरोना रुग्णांचे फोनच उचलत नसल्याचे दिसून आले आहे. (thane corona war room mns proest)

prajwal dhage

|

Apr 14, 2021 | 10:51 PM

ठाणे : महापालिकेकडून चालवले जाणाऱ्या कोरोना मदत कक्ष म्हणजेच कोरोना वॉर रूममधील ढिसाळ कारभार उघड झाला आहे. वॉर रुममधील कर्मचारी कोरोना रुग्णांचे फोनच उचलत नसल्याचे दिसून आले आहे. तशा तक्रारी लोकांनी केल्या आहेत. याच तक्रारींबद्दल जाब विचारण्यासाठी मनसेचे काही पदाधिकारी गेल्यानंतर त्यांनासुद्धा उडवाउडवीची उत्तरं दिली गेली.  ठाण्यातील वॉररुमध्ये फक्त चार कर्मचारी असून काय काय काम पाहणार असे कर्मचाऱ्यांनी सांगितले आहे. तसेच वॉर रूमच्या फोनची बॅटरी संपली होती; म्हणून  आम्ही फोन उचलले नाही. असंसुद्धा वॉर रूममधील कर्मचाऱ्यांनी सांगितलं. हा सर्व प्रकार पाहून मनसे पदाधिकाऱ्यांनी आज (14 एप्रिल) मनपाच्या वॉर रुममध्ये हंगामा केला. (Thane Corona cases increases war room servant not receiving phone calls of Corona patient and relatives MNS ask cause)

वॉर रुमचे सहकार्य नाही, उडवाउडवीची उत्तरं

सध्या कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत असल्यामुळे सर्व यंत्रणेवर लक्ष ठेवून काम सुरळीत चालावे यासाठी ठाणे महापालिकेने वॉर रूम स्थापन केले. परंतु या वॉर रूमविरोधात नागरिकांच्या अनेक तक्रारी येत आहेत. रुग्णांची बेडची स्थिती, लागणारे इंजेक्शन, रुग्णांचा रिपोर्ट या संदर्भात हे वॉर रूम कुचकामी ठरत असल्याचे दिसून येत आहे. तसा आरोप नागरिकांकडून केला जातोय. कोणालाही करोनाची  लागण झाली तर त्याला दवाखान्यात दाखल करण्याआधी वॉर रूमला कळवावे  लागते. त्यानंतर वॉर रूम त्यांना कोणत्या रुग्णालयात दाखल केलं जाऊ शकतं ते सांगते. तसा मॅसेज त्या रुग्णाला वॉर रुममधून पाठवला जातो. असे असूनसुद्धा आज (14 एप्रिल) मात्र वॉर रूमने अनेक लोकांचे फोनच उचलले  नाहीत. त्यामुळे कोरोना रुग्णामध्ये भीतीचे वातावरण पसरले होते.

मनसेच्या मदत कक्षालासुद्धा सहकार्य नाही

ठाण्यात कोरोना रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेता आणि मनपाच्या वॉर रुमचा ढिसाळ कारभार पाहता मनसेकडून मदत कक्षाची स्थापना करण्यात आली आहे. या कक्षाच्या माध्यमातून वॉर रूमशी संपर्क साधून तातडीने नागरिकांच्या समस्यांचे निवारण केले जात आहे. मात्र, मनसेच्या या मदत कक्षाला आक्षेप घेतला जात आहे. वॉर रूमची देखरेख करणाऱ्या डॉ.खुशबू यांनी मनसेसोबत काम करणार नसल्याचे कळवले आहे. एकीकडे वॉर रूमने सांगितल्याशिवाय रुग्णांना उपचारासाठी दाखल केले जात नाही. तर दुसरीकडे वॉर रुमकडून लोकांचे फोन रिसिव्ह केले जात नाहीयेत. या सर्व धांदलीमध्ये ठाण्यात कोरोना स्थिती बिघडत चालल्याचा आरोप होतोय.

मनसेचा हंगामा

दरम्यान, ठाणे मनपाच्या वॉर रुमकडून फोन कॉल रिसिव्ह केले जात नाहीयेत. चारच कर्मचारी वॉर रूमचे काम पाहत असल्यामुळे कुठे कुठे लक्ष देणार अशी ओरड केली जाते. तसेच आमच्या मोबाईलमधील बॅटरी संपल्याचे सांगत देऊन उडवाउडवीची उत्तरं दिली जात आहेत. तर दुसरीकडे मनसेने स्थापन केलेल्या मदत कक्षाला सहकार्य केले जात नाहीये. या सर्व प्रकारामुळे मनसे रस्त्यावर उतरली आहे. मनसेच्या कार्यकर्त्यांनी वॉर रुमच्या आवारात हंगामा केला होता.

इतर बातम्या :

VIDEO | ठाण्यातील संतापजनक प्रकार, कोरोनाबाधितांचे मृतदेह गुंडाळण्यासाठी कचऱ्याच्या पिशव्यांचा वापर

VIDEO | उद्धव काका घरी किराणा पाठवणार आहेत का? डीमार्ट बंद झाल्याने तरुणीचा संताप

रुग्णांनी आता जावं कुंठ? गंभीर रुग्णांना अंबरनाथ पालिकेच्या कोव्हिड सेंटरमध्ये जागा नाही, खासगी रुग्णालयात ऑक्सिजनचा तुटवडा

(Thane Corona cases increases war room servant not receiving phone calls of Corona patient and relatives MNS ask cause)

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें