SSC Topper 2022 Maharashtra Board: कमाल! ‘या’ 122 विद्यार्थ्यांना100 टक्के गुण! 90 पेक्षा जास्त % मार्क मिळवण्याऱ्यांचीही संख्या मोठीय

रचना भोंडवे, Tv9 मराठी

रचना भोंडवे, Tv9 मराठी | Edited By: सागर जोशी

Updated on: Jun 17, 2022 | 10:53 PM

SSC Result 2022 Topper List for Maharashtra Board: बारावीप्रमाणेच दहावीच्या निकालातही कोकण विभाग अव्वल आहे! कोविडमुळे विद्यार्थी आणि पालक दोन्हींचे हाल झाले. परीक्षा होणार नाही होणार इथून सुरुवात होती पण तरीही राज्यातल्या एकूण 122 विद्यार्थ्यांनी 100 टक्के गुण मिळवणं ही अभिमानास्पद बाब आहे.

SSC Topper 2022 Maharashtra Board: कमाल! 'या' 122 विद्यार्थ्यांना100 टक्के गुण! 90 पेक्षा जास्त % मार्क मिळवण्याऱ्यांचीही संख्या मोठीय
Image Credit source: TV9 marathi

पुणे: कमाल! राज्यात 122 विद्यार्थ्यांनी 100 टक्के गुण मिळवलेले आहेत. दहावीचा निकाल (SSC Results 2022) विद्यार्थ्यांना दुपारी 1 वाजता उपलब्ध होणार आहे. निकालासंदर्भात बोर्डाची पत्रकार परिषद (Press Conference) घेण्यात आली त्यात यासंदर्भातली सविस्तर माहिती देण्यात आलीये. बारावीप्रमाणेच  दहावीच्या निकालातही (10th Results) कोकण विभाग अव्वल आहे! कोविडमुळे विद्यार्थी आणि पालक दोन्हींचे हाल झाले. परीक्षा होणार नाही होणार इथून सुरुवात होती पण तरीही राज्यातल्या एकूण 122 विद्यार्थ्यांनी 100 टक्के गुण मिळवणं ही अभिमानास्पद बाब आहे. शिवाय 82 हजार 60 विद्यार्थ्यांना 90 टक्क्यांपेक्षा जास्त टक्के गुण मिळालेले आहेत.

12 हजार 210 शाळांचा निकाल 100 टक्के

यंदा दहावीचा निकाल 96.94 टक्के लागलेला आहे. कोकण विभागाचा निकाल सर्वाधिक 99.27 टक्के, तर सर्वात कमी निकाल नाशिक विभागाचा 95.90 टक्के लागेलेला आहे. कोविडमुळे 75 टक्के अभ्यासक्रमावर परीक्षा घेण्यात आली. यूपीएससी, बारावी आणि आता दहावी! दहावीच्या परीक्षेत सुद्धा मुलींनीच बाजी मारलेली आहे. राज्यातील 22 हजार 921 शाळांमधून 16 लाख 38 हजार 946 विद्यार्थ्यांनी नोंदणी केली, त्यापैकी 12 हजार 210 शाळांचा निकाल 100 टक्के लागलाय. त्याचबरोबर राज्यातील नऊ विभागीय मंडळामधून 8 हजार 169 दिव्यांग विद्यार्थ्यांची नोंदणी झाली होती. त्यापैकी 8 हजार 29 दिव्यांग विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली, तर 7 हजार 579 दिव्यांग विद्यार्थी उत्तीर्ण झालेले आहेत.

विभागवार निकाल

  • पुणे 96.96
  • नागपूर 97.00
  • औरंगाबाद 96.33
  • मुबंई 96.94
  • कोल्हापूर 98.50
  • अमरावती 96.81
  • नाशिक 95.90
  • लातूर 97.27
  • कोकण 99.2

इथे तपासा दहावीचा निकाल

https://www.tv9marathi.com/board-result-registration-for-result-marksheet-10th

वाचा दहावीच्या निकालाचे ताजे आणि वेगवान अपडेट्स

https://www.tv9marathi.com/career/ssc-result-2022-maharashtra-board-nikal-live-updates-check-msbshse-board-class-10th-exam-results-news-online-at-mahresult-nic-in-dahavi-toppers-paas-percentage-news-today-au136-736831.html

पुन्हा अभ्यास करा आणि पास व्हा!

दरम्यान या सगळ्या घडामोडीत एक अत्यंत महत्त्वाची बातमी समोर येतीये. पुरवणी परीक्षेचं वेळापत्रक आलेलं आहे. बारावीची आणि दहावीची पुरवणी परीक्षा यासंदर्भातली ही बातमी आहे. बारावीची पुरवणी परीक्षा 21 जुलैपासून 12 ऑगस्ट पर्यंत होणार आहे. तर दहावीची पुरवणी परीक्षा 27 जुलै ते 12 ऑगस्ट दरम्यान होणार आहे. त्यामुळे खचून न जाता पुन्हा जोमाने कामाला लागा, पुन्हा अभ्यास करा आणि पास व्हा! तारखा मात्र लक्षात ठेवा.

हे सुद्धा वाचा

निकाल लागल्यानंतर 11 वी प्रवेशाबाबत माहिती उपलब्ध होण्याची शक्यता

अकरावीची प्रवेश प्रक्रिया सुरू झाली आहे. प्रवेश बंद करण्याची अंतिम तारीख अद्याप जाहीर करण्यात आलेली नाही. 11 वीच्या प्रवेशाची अंतिम तारीख 10 वीचा निकाल जाहीर झाल्यानंतर कळवण्यात येणार आहे. त्यामुळे आता कुठल्याही क्षणी यासंदर्भातली माहिती सुद्धा जारी केली जाऊ शकते.

Non Stop LIVE Update

Follow us on

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI