AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

“सप्टेंबरमध्ये प्रवेशपत्र दिलं, आता कंपनी म्हणे अर्जच केला नाही, आरोग्य विभागही दाद देईना”

महाराष्ट्र राज्याच्या आरोग्य विभागातील गट क प्रवर्गातील पदांसाठी उद्या लेखी परीक्षा होणार आहे. आरोग्य विभागाची गट क परीक्षा एक दिवसावर आली असली तरी तुकाराम नाटेकर या विद्यार्थ्याला परीक्षेच हॉलतिकीट मिळालं नसल्याचं समोर आलं आहे.

सप्टेंबरमध्ये प्रवेशपत्र दिलं, आता कंपनी म्हणे अर्जच केला नाही, आरोग्य विभागही दाद देईना
तुकाराम नाटेकर
| Edited By: | Updated on: Oct 23, 2021 | 12:43 PM
Share

पुणे: महाराष्ट्र राज्याच्या आरोग्य विभागातील गट क प्रवर्गातील पदांसाठी उद्या लेखी परीक्षा होणार आहे. आरोग्य विभागाची गट क परीक्षा एक दिवसावर आली असली तरी तुकाराम नाटेकर या विद्यार्थ्याला परीक्षेच हॉलतिकीट मिळालं नसल्याचं समोर आलं आहे. तुकाराम नाटेकर या विद्यार्थ्याला सप्टेंबरमध्ये हॉल तिकीट मिळालं होतं आता आरोग्य भरती परीक्षेच्या पोर्टलवरुन अर्जचं केला नसल्याचं सांगण्यात आलं आहे. आरोग्य विभागाच्या भरती परीक्षेतील गोंधळाकडे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी लक्ष द्यावं, अशी मागणी विद्यार्थ्यानं केलीय.

तांत्रिक गोंधळामुळं विद्यार्थी त्रस्त

परभणी जिल्ह्यातील तुकाराम नाटकर या विद्यार्थ्यानं गट क पदासाठी अर्ज केला होता. सप्टेंबर महिन्यातील परीक्षेसाठी तुकाराम नाटकर याला प्रवेशपत्र मिळालेलं होतं. औरंगाबाद येथील परीक्षा केंद्र मिळालं होतं. मात्र, आता होत असलेल्या परीक्षेचं हॉल तिकीट तुकाराम नाटकर या विद्यार्थ्याला उपलब्ध झालेलं नाही. त्याच्या सर्व मित्रांचे हॉल तिकीट मिळालेले आहेत. तुकाराम नाटकर यांनी हॉल तिकीट देण्यात आलेलं नाही. मी ज्यावेळी माझा युजरनेम आणि पासवर्ड नोंदवला असता अर्ज केलाच नाही, असं सांगण्यात येत आहे.

न्यासा कंपनींची हेल्पलाईनवर संपर्क साधला असता त्यांनी दाद दिली नाही. यानंतरमी आरोग्य विभागाच्या संचालक डॉ. अर्चना पाटील यांच्याकडे संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता दाद दिली गेली नसल्याचा दावा संबंधित विदयार्थ्यानं केला आहे. 2014 पासून महापोर्टल आणि आता विविध कंपन्यांकडून परीक्षा घेत असताना विद्यार्थ्यांना त्रास दिला जातोय, असं तुकाराम नाटेकर या विद्यार्थ्यानं म्हटलं आहे.

लातूरमध्ये आरोग्य परिमंडळात 19 हजार विद्यार्थी परीक्षा देणार

आरोग्य विभागाच्या लातूर मंडळातील 127 पदांच्या भरतीसाठी रविवारी दोन सत्रात परीक्षा घेण्यात येणार आहेत , वेगवेगळ्या पदांच्या परीक्षेसाठी 19 हजार 146 उमेदवारांनी अर्ज केलेले आहेत . लातूर आरोग्य परिमंडळात लातूर ,बीड ,उस्मानाबाद आणि नांदेड या चार जिल्ह्यांचा समावेश आहे . लातूर शहरात 41 परीक्षा केंद्र स्थापन करण्यात आले असून सकाळी 10 ते 12 आणि दुपारी 3 ते 5 या वेळेत परीक्षा होणार असल्याचे सांगण्यात आले आहे .

इतर बातम्या:

MPSC Exam: मोठी बातमी, राज्य सेवा परीक्षेसाठी अर्ज करण्यास मुदतवाढ, एमपीएसीकडून नवं परिपत्रक जाहीर

MPSC Update : एमपीएससीकडून 2019 च्या PSI परीक्षेचा शारीरिक चाचणीसह मुलाखतीचा सविस्तर कार्यक्रम जाहीर, उमदेवारांना दिलासा

Maharashtra Health Department recruitment issue Tukaram Natekar not get hall ticket

गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा.
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका.
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?.
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन.
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की...
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की....
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक.
धनुष्यबाण कोणाला मिळणार ठाकरेंना कि शिंदेंना? उद्या फैसला होणार
धनुष्यबाण कोणाला मिळणार ठाकरेंना कि शिंदेंना? उद्या फैसला होणार.
भारतीय कम्युनिस्ट पक्षाचा मोर्चा पालघर जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकणार
भारतीय कम्युनिस्ट पक्षाचा मोर्चा पालघर जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकणार.
नितीन नबीन भाजपचे नवे राष्ट्रीय अध्यक्ष, पंतप्रधान मोदींकडून अभिनंदन
नितीन नबीन भाजपचे नवे राष्ट्रीय अध्यक्ष, पंतप्रधान मोदींकडून अभिनंदन.
मुंबई महापालिकेवर महायुतीचाच महापौर बसणार; अमित साटम यांचा दावा
मुंबई महापालिकेवर महायुतीचाच महापौर बसणार; अमित साटम यांचा दावा.