AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

MPSC चा निर्णयांचा धडाका सुरुच, कर सहायक, लिपीक टंकलेखक परीक्षेत महत्वाचा बदल

महाराष्ट्र स्थापत्य अभियांत्रिकी सेवा पूर्व परीक्षा 2020 साठी परीक्षा दिलेल्या उमेदवारांची स्कॅन उत्तरपत्रिका, गुण व गुणांची सीमारेषा आयोगाच्या वेबसाईटवर उपलब्ध करुन देण्याचा निर्णय घेतल्यानंतर आता कर सहायक आणि लिपीक टंकलेखक परीक्षेत महत्त्वाचा बदल करण्यात आला आहे.

MPSC चा निर्णयांचा धडाका सुरुच, कर सहायक, लिपीक टंकलेखक परीक्षेत महत्वाचा बदल
MPSC EXAM
| Edited By: | Updated on: Oct 23, 2021 | 10:10 AM
Share

मुंबई: महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून निर्णयांचा धडाका सुरुच आहे. महाराष्ट्र स्थापत्य अभियांत्रिकी सेवा पूर्व परीक्षा 2020 साठी परीक्षा दिलेल्या उमेदवारांची स्कॅन उत्तरपत्रिका, गुण व गुणांची सीमारेषा आयोगाच्या वेबसाईटवर उपलब्ध करुन देण्याचा निर्णय घेतल्यानंतर आता कर सहायक आणि लिपीक टंकलेखक परीक्षेत महत्त्वाचा बदल करण्यात आला आहे. आगामी काळात आयोजित करण्यात येणाऱ्या लिपिक टंकलेखक व कर सहायक या पदांच्या भरतीकरिता मुख्य परीक्षेनंतर संगणक प्रणालीवर आधारित टंकलेखन कौशल्य चाचणी घेण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. सदर चाचणी पात्रता (Qualifying) स्वरूपाची असेल. सविस्तर कार्यपद्धत स्वतंत्रपणे जाहीर करण्यात येईल, असं आयोगाकडून कळवण्यात आलं आहे.

आयोगाचं ट्विट

आयोगाच्या निर्णयाचं स्वागत

कर सहायक आणि लिपिक टंकलेखक परीक्षेतील टायपिंग म्हणजेच टंकलेखनाची परीक्षा संगणक आधारित प्रणालीत घेण्याच्या आयोगाच्या निर्णयाचं उमदेवारांकडून स्वागत करण्यात आलं आहे. आयोगाच्या या निर्णयामुळं परीक्षेत गैरप्रकार करण्याचा प्रयत्न करणाऱ्यांना आळा बसेल, अशा प्रतिक्रिया उमेदवारांकडू व्यक्त करण्यात आल्या आहेत.

भरती प्रक्रियेतून बाहेर पडण्याची संधी मिळणार

आगामी काळात आयोगामार्फत आयोजित सर्व स्पर्धा परीक्षांकरीता गुणवत्ता यादी जाहीर झाल्यानंतर भरती प्रक्रियेतून बाहेर पडण्याचा (Opting out) पर्याय उमेदवारांना उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. सविस्तर कार्यपद्धत स्वतंत्रपणे जाहीर करण्यात येणार आहे. आयोगाच्या या निर्णयाचं देखील विद्यार्थ्यांनी स्वागत केलं आहे.

इतर बातम्या:

MPSC Exam: मोठी बातमी, राज्य सेवा परीक्षेसाठी अर्ज करण्यास मुदतवाढ, एमपीएसीकडून नवं परिपत्रक जाहीर

MPSC Update : एमपीएससीकडून 2019 च्या PSI परीक्षेचा शारीरिक चाचणीसह मुलाखतीचा सविस्तर कार्यक्रम जाहीर, उमदेवारांना दिलासा

Maharashtra Public Service Commission decided to take typing test on Computer

KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?.
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा.
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका.
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?.
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन.
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की...
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की....
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक.
धनुष्यबाण कोणाला मिळणार ठाकरेंना कि शिंदेंना? उद्या फैसला होणार
धनुष्यबाण कोणाला मिळणार ठाकरेंना कि शिंदेंना? उद्या फैसला होणार.
भारतीय कम्युनिस्ट पक्षाचा मोर्चा पालघर जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकणार
भारतीय कम्युनिस्ट पक्षाचा मोर्चा पालघर जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकणार.
नितीन नबीन भाजपचे नवे राष्ट्रीय अध्यक्ष, पंतप्रधान मोदींकडून अभिनंदन
नितीन नबीन भाजपचे नवे राष्ट्रीय अध्यक्ष, पंतप्रधान मोदींकडून अभिनंदन.