AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

महावितरण विभागामध्ये महाभरती, तब्बल इतक्या जागांसाठी भरती, दहावी पास ते थेट पदवीधर…

mahavitaran recruitment 2024 : जर तुम्ही नोकरीच्या शोधात असाल तर ही मोठी संधी तुमच्यासाठी आहे. विशेष म्हणजे नुकताच या मेगा भरती प्रक्रियेबद्दलची अधिसूचना ही प्रसिद्ध करण्यात आलीये. इच्छुकांनी अजिबातच वेळ वाया न घालता या भरती प्रक्रियेसाठी फटाफट अर्ज ही करावीत. जाणून घ्या या भरती प्रक्रियेबद्दल अधिक

महावितरण विभागामध्ये महाभरती, तब्बल इतक्या जागांसाठी भरती, दहावी पास ते थेट पदवीधर...
| Updated on: Jan 12, 2024 | 12:04 PM
Share

मुंबई : नोकरीच्या शोधात असणाऱ्यांसाठी अत्यंत मोठी आणि महत्वाची बातमी आहे. विशेष म्हणजे ही एकप्रकारची मेगा भरतीच आहे. नुकताच या भरती प्रक्रियेबद्दलची अधिसूचना ही महावितरण यांच्याकडून प्रसिद्ध करण्यात आलीये. दहावी पास असणाऱ्या उमेदवारांसाठी ही मोठी संधी आहे. ही भरती प्रक्रिया विविध पदांसाठी राबवली जातंय. महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी लिमिटेडमध्ये नोकरी करण्याची ही संधी आहे. नोकरीच्या शोधात असणाऱ्यांसाठी हीच ती संधी आहे. इच्छुक उमेदवारांनी अजिबातच वेळ वाया न घालता या भरती प्रक्रियेच्या तयारीला फटाफट लागावे. खरोखरच ही मोठी संधी आहे.

महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी लिमिटेड यांच्या अंतर्गत ही भरती प्रक्रिया चंद्रपूर युनिटसाठी राबवली जातंय. ही भरती प्रक्रिया शिकाऊ उमेदवारांसाठी पार पडत आहे. आयटीआय झालेले उमेदवार ते अभियांत्रिकीमध्ये पदवी घेतलेले उमेदवार या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करू शकतात. नोकरीच्या शोधात असणाऱ्यांसाठी ही मोठी संधीच म्हणावी लागणार आहे.

विशेष म्हणजे ही भरती प्रक्रिया तब्बल 246 पदांसाठी राबवली जात आहे. 11 जानेवारी 2024 म्हणजे उद्यापासून उमेदवार हे या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करू शकतात. या भरती प्रक्रियेसाठी आपण ऑनलाइन पद्धतीने अर्ज करू शकता. महावितरणच्या साईटवर आपल्याला या भरती प्रक्रियेबद्दलची सर्व माहिती ही आरामात मिळेल. तिथेच आपल्याला या भरती प्रक्रियेसाठी अर्ज देखील करता येईल.

या भरती प्रक्रियेसाठी जरी ऑनलाइन पद्धतीने अर्ज करायचा असेल मात्र, केलेला अर्ज आणि कागदपत्रांसह उमेदवारांना प्रत्यक्षात मानव संसाधन आवक विभाग, मुख्य अभियंता यांचे कार्यालय महाऔष्णिक विद्युत केंद्र ऊर्जाभवन, चंद्रपूर येथे उपस्थित राहवे लागणार आहे. उशीरा आलेल्या उमेदवाराला ग्राह्य धरले जाणार नाहीये.

खरोखरच ही अत्यंत मोठी संधी आहे. लगेचच इच्छुकांनी या भरती प्रक्रियेच्या तयारीला लागावे. 25 जानेवारी 2024 च्या अगोदर उमेदवारांना आपले अर्ज हे सादर करावे लागणार आहेत. आयटीआय 210 जागा, पदवीधर 36 प्रमाणे ही भरती प्रक्रिया राबवली जाणार आहे. परत एकदा लक्षात असूद्या की, अर्ज सादर करण्याची शेवटची तारीख ही 25 जानेवारी 2024 आहे. त्यापूर्वीच आपल्याला अर्ज सादर करावे लागतील.

नगरसेवक बनायचं असेल तर... इच्छुक उमेदवारांवर गडकरींचं खास शैलीत सल्ला
नगरसेवक बनायचं असेल तर... इच्छुक उमेदवारांवर गडकरींचं खास शैलीत सल्ला.
कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेत भाजपचाच महापौर... नरेंद्र पवाराचा दावा
कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेत भाजपचाच महापौर... नरेंद्र पवाराचा दावा.
कार ते एक गुंठा जमीन, पुण्यात उमेदवाराकडून मतदारांना भन्नाट ऑफर्स
कार ते एक गुंठा जमीन, पुण्यात उमेदवाराकडून मतदारांना भन्नाट ऑफर्स.
शेलारांना आठवले चावले, त्यांना पक्षात..संदीप देशपांडे यांची बोचरी टीका
शेलारांना आठवले चावले, त्यांना पक्षात..संदीप देशपांडे यांची बोचरी टीका.
...हे श्रीमंत भिकाऱ्यांचं लक्षण, संजय राऊत यांची भाजपवर जहरी टीका
...हे श्रीमंत भिकाऱ्यांचं लक्षण, संजय राऊत यांची भाजपवर जहरी टीका.
नाशकात भूंकप, युतीनंतर ठाकरे बंधूंना धक्का; मनसे-ठाकरे नेते भाजपवासी
नाशकात भूंकप, युतीनंतर ठाकरे बंधूंना धक्का; मनसे-ठाकरे नेते भाजपवासी.
देवयानी फरांदे भावूक; भाजप प्रवेश अन निष्ठावंतांच्या न्यायासाठी उद्रेक
देवयानी फरांदे भावूक; भाजप प्रवेश अन निष्ठावंतांच्या न्यायासाठी उद्रेक.
जागावाटपाचा तिढा फडणवीसांच्या दरबारात, भाजपकडून 115 जणांची नाव निश्चित
जागावाटपाचा तिढा फडणवीसांच्या दरबारात, भाजपकडून 115 जणांची नाव निश्चित.
पुण्यात ठाकरेंची सेना अन् मनसेची युती होणार? कोण किती जागांवर लढणार?
पुण्यात ठाकरेंची सेना अन् मनसेची युती होणार? कोण किती जागांवर लढणार?.
राज ठाकरेंवर माझी नाराजी नाही, पण... दिनकर पाटलांची पहिली प्रतिक्रिया
राज ठाकरेंवर माझी नाराजी नाही, पण... दिनकर पाटलांची पहिली प्रतिक्रिया.