AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

CBSE SSC EXAM : आईवडीलांच्या अपेक्षा पूर्ण कशा करायच्या? मोदी गुरुजींचा हा 1.57 सेकंदाचा व्हिडीओ सर्वांसाठी !

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी जो मंत्र दिला आहे तो फक्त विद्यार्थ्यांसाठीच आहे असं नाही तर मायबापांसाठीही आहे. (narendra Modi exam pressure pariksha pe charcha)

CBSE SSC EXAM : आईवडीलांच्या अपेक्षा पूर्ण कशा करायच्या? मोदी गुरुजींचा हा 1.57 सेकंदाचा व्हिडीओ सर्वांसाठी !
नरेंद्र मोदी
| Updated on: Mar 06, 2021 | 1:32 PM
Share

मुंबई : बोर्ड कुठलाही असो, दहावी आणि बारावीच्या परिक्षा आता जाहीर झालेल्या आहेत. कोरोनाचं संकट त्यात वर्षभर झालेला शाळांचा खेळ, त्यात आता ऐन परिक्षेच्या तोंडावर आलेलं प्रेशर. करायचं काय? हा तणाव पेपर देणाऱ्यांना जेवढा येतो आहे तेवढाच तो आई वडीलांनाही येतो आहे. पण पंतप्रधान नरेंद्र मोदींनी (Narendea Modi) जो मंत्र दिला आहे तो फक्त विद्यार्थ्यांसाठीच आहे असं नाही तर मायबापांसाठीही आहे. (narendra Modi suggestions to parents and student on exam pressure, pariksha pe charcha)

केंद्रीय शिक्षण मंत्र्यांकडून व्हिडीओ ट्विट

CBSE बोर्डाच्या परिक्षा आता जाहीर झालेल्या आहेत. त्यामुळे केंद्रीय शिक्षण मंत्री रमेश पोखरियाल निशंख (Ramesh Pokhriyal Nishank) यांनी एक व्हिडीओ ट्विट केला आहे. हा व्हिडीओ नरेंद्र मोदी यांच्या परिक्षा पे चर्चा ह्या कार्यक्रमातला आहे. दोन वर्षापुर्वीचा हा व्हिडीओ असला तरी तो आजही तेवढाच तंतोतंत लागू पडतो.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उत्तर दिलेला व्हिडीओ :

पंतप्रधान मोदींनी काय उत्तर दिलं?

रोहीत श्री ह्या केरळच्या विद्यार्थ्याने मोदींना प्रश्न विचारला, आई वडीलांच्या अपेक्षा कशा पूर्ण करायच्या? त्याचा खूप तणाव येतो. तुमच्याकडूनही पंतप्रधान म्हणून खुप अपेक्षा आहेत, ह्या सगळ्याशी तुम्ही डिल कसं करता?  त्याला उत्तर देताना मोदी म्हणाले, तुमच्यापैकी अनेकांना दिवसभर ऐकावं लागतं. की तुला समजत नाही का? मित्रांसोबत टेलिफोनवर बसलेला असतो. सोड तो कॉप्युटर. अभ्यास कर. मला सांगा, काय ही परिक्षा जीवनाची परिक्षा आहे का? की त्या वर्गाची फक्त परिक्षा आहे. एकदा हे निश्चित केलं की, ही दहावीची परिक्षा आहे, बारावीची आहे, ही काही जीवनाची परिक्षा नाही. एवढा जरी आपण विचार केला तरी आपल्यावरचं जे ओझं आहे ते कमी होईल. फोकसही वाढेल. आता नाही तर कधीच नाही. दहावीत गेला तर पुढं काहीच नाही, जीवन बेकार असं काही नाही. परिक्षेच्या गल्लीबोळातून निघणारं काही आयुष्य नसतं. त्याच्या बाहेरही खूप मोठं जग आहे.

इतर बातम्या :

Muthoot समूहाचे अध्यक्ष एमजी जॉर्ज मुथूट यांचे निधन, फोर्ब्जच्या श्रीमंतांच्या यादीत पटकावलेलं स्थान

पुद्दुचेरीत शिवसेनेच्या भूमिकेत एनआर काँग्रेस, भाजपा चेकमेट?

ती चौघांसोबत पळाली पण कुणाशी गाठ बांधावी? गावानं चिठ्ठ्या टाकल्या, पुढे जे झालं त्याची देशभरात चर्चा

(narendra Modi suggestions to parents and student on exam pressure, pariksha pe charcha)

मुंबईचा महापौर उत्तर भारतीय होणार, सुनील शुक्ला यांचा दावा
मुंबईचा महापौर उत्तर भारतीय होणार, सुनील शुक्ला यांचा दावा.
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आली तर काँग्रेस स्वबळावर लढेल - वडेट्टीवार
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आली तर काँग्रेस स्वबळावर लढेल - वडेट्टीवार.
काँग्रेसमध्ये आलो तरी शरद पवार कायम श्रद्धास्थानी - प्रशांत जगताप
काँग्रेसमध्ये आलो तरी शरद पवार कायम श्रद्धास्थानी - प्रशांत जगताप.
जळगाव महापालिकेत प्रतिनिधीत्व द्या, बारा बुलतेदार महासंघाची मागणी
जळगाव महापालिकेत प्रतिनिधीत्व द्या, बारा बुलतेदार महासंघाची मागणी.
याक्षणी आम्ही मुंबई पालिकेत 115 जागा जिंकत आहोत, संजय राऊत यांचा दावा
याक्षणी आम्ही मुंबई पालिकेत 115 जागा जिंकत आहोत, संजय राऊत यांचा दावा.
पुण्यात दोन्ही राष्ट्रवादीची युती होणार की नाही? काकडे काय म्हणाले
पुण्यात दोन्ही राष्ट्रवादीची युती होणार की नाही? काकडे काय म्हणाले.
माझ्या कार्यकर्त्याकडे कोणी वाकडी मान.....सत्यजीत कदम यांचा इशारा
माझ्या कार्यकर्त्याकडे कोणी वाकडी मान.....सत्यजीत कदम यांचा इशारा.
सटोगे तो बचोगे वरना बटोगे तो पिटोगे , शिवसेना भवनासमोर बॅनरबाजी
सटोगे तो बचोगे वरना बटोगे तो पिटोगे , शिवसेना भवनासमोर बॅनरबाजी.
अमोल कोल्हे-अजित पवारांची भेट, राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण
अमोल कोल्हे-अजित पवारांची भेट, राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण.
मुंबईत हवेचा दर्जा खालावला, AQI थेट 195 वर
मुंबईत हवेचा दर्जा खालावला, AQI थेट 195 वर.