नोकरीच्या शोधात आहात? मग लगेच करा अर्ज, विविध पदांसाठी भरती सुरू, मोठी संधी
NPCIL Recruitment 2024 : नोकरीच्या शोधात असाल तर एक मोठी संधी तुमच्याकडे आहे. विशेष म्हणजे भरती प्रक्रियेला सुरूवात झालीये. नोकरीच्या शोधात असणाऱ्यांनी लगेचच अर्ज करावीत. ही एकप्रकारची मोठी संधी आहे. ही भरती प्रक्रिया विविध पदांसाठी सुरू आहे.

जर तुम्ही नोकरीच्या शोधात आहात तर ही बातमी तुमच्यासाठी अत्यंत महत्वाची आहे. न्यूक्लियर पॉवर कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेडमध्ये नोकरी करण्याची संधी तुमच्याकडे आहे. विशेष म्हणजे या भरती प्रक्रियेची अधिसूचना देखील नुकताच प्रसिद्ध करण्यात आलीये. सहाय्यक श्रेणी 1 च्या 58 पदांसाठी ही भरती प्रक्रिया सुरू आहे. या भरती प्रक्रियेसाठी वयाची आणि शिक्षणाची अटही लागू करण्यात आलीये. नोकरीय्या शोधात असणाऱ्यांसाठी ही सुवर्णसंधीच म्हणावी लागेल. चला तर मग जाणून घ्या या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करण्याची पद्धत आणि अधिक माहिती.
न्यूक्लियर पॉवर कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेडकडून ही भरती राबवली जातंय. 21 ते 28 वयोगटापर्यंतचे उमेदवार हे या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करू शकतात. या भरती प्रक्रियेसाठी उमदेवारांना शंभर रूपये फीस भरावी लागेल. यामध्ये प्रवर्गातील उमेदवारांना आणि दिव्यांग, महिला यांना फीसमध्ये सूट देण्यात आलीये. त्यांना कोणत्याही प्रकारची फीस ही भरावी लागणार नाहीये.
या भरती प्रक्रियेसाठी मान्यताप्राप्त विद्यापीठातून किमान 50 टक्के गुणांसह बॅचलर पदवी घेतलेले उमेदवार अर्ज करू शकतात. या भरती प्रक्रियेसाठी आपल्याला ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा लागेल. npcilcareers.co.in या साईटवर जाऊन आपल्याला अर्ज करावा लागेल. याच साईटवर आपल्याला भरती प्रक्रियेची सविस्तर माहिती देखील मिळेल.
5 जूनपासून भरती प्रक्रियेसाठी अर्ज करण्याची प्रक्रिया सुरू झालीये. 25 जून 2024 ही या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे. उमेदवारांना त्यापूर्वीच अर्ज करावी लागणार आहेत. उमेदवारांनी भरती प्रक्रियेसाठी अर्ज करण्याच्या अगोदर अधिसूचना व्यवस्थित वाचून घ्यावी आणि मगच भरतीसाठी अर्ज करावीत.
न्यूक्लियर पॉवर कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड (NPCIL) कडून सहाय्यक श्रेणी 1 च्या एकूण 58 पदांसाठी भरती सुरू आहे. सहाय्यक श्रेणी 1 (HR) ची 29 पदे, सहाय्यक श्रेणी 1 (वित्त आणि लेखा)ची 17 पदे आणि सहाय्यक श्रेणी 1 (सामान्य व्यवस्थापन) च्या 12 पदे याप्रमाणे ही भरती प्रक्रिया राबवली जातंय. चला तर लगेचच करा अर्ज.
