PMC Recruitment 2022 : पुणे महापालिकेच्या मेगाभरतीची परीक्षा केव्हा होणार? महत्त्वाची अपडेट! 448 जागांसाठी मेगाभरती

448 जागांसाठी एकूण 87 हजार 471 उमेदवारांनी आतापर्यंत शुल्कासहित अर्ज दाखल केले आहेत, अशी माहिती समोर आली आहे. या भरती प्रक्रियेचा महत्त्वाचा टप्पा ऑक्टोबर महिन्यात पार पडणार आहे. ऑक्टोबर महिन्यात ही भरती प्रक्रिया होईल.

PMC Recruitment 2022 : पुणे महापालिकेच्या मेगाभरतीची परीक्षा केव्हा होणार? महत्त्वाची अपडेट! 448 जागांसाठी मेगाभरती
पुमे महानगरपालिका
Follow us
| Updated on: Sep 04, 2022 | 7:44 AM

पुणे : पुणे महानगरपालिकेच्या मेगाभरती (PMC Recruitment 2022) संदर्भात महत्त्वाची अपडेट हाती आली आहे. पुणे महापालिकेच्या (Pune Municipal Corporation 2022) मेगाभरतीसाठीची परीक्षा ऑक्टोबर महिन्यात होणार आहे. ही परीक्षा दोन ते तीन टप्प्यात होणार असल्याची माहिती समोर आली आहे. एकूण 448 जागांसाठी भरतीप्रक्रिया (Job Opportunity) सुरु करण्यात आली आहे. अर्जही मागवण्यात आले आहेत. हजारो इच्छुक उमेदवारांचे अर्ज दाखलही झाले आहेत. 448 जागांसाठी तब्बल 87 हजारपेक्षाही जास्त जणांनी अर्ज केले आहेत.

पुणे महापालिकेत मेगाभरती होणार असल्याची जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली होती. त्यानंतर इच्छुकांकडून अर्जही मागवण्यात आले होते. ऑनलाईन, ऑफलाईन अशा पद्धतीने इच्छुकांना अर्ज सादर करता येणार होते. दरम्यान, 448 जागांसाठी एकूण 87 हजार 471 उमेदवारांनी आतापर्यंत शुल्कासहित अर्ज दाखल केले आहेत, अशी माहिती समोर आली आहे. या भरती प्रक्रियेचा महत्त्वाचा टप्पा ऑक्टोबर महिन्यात पार पडणार आहे. ऑक्टोबर महिन्यात ही भरती प्रक्रिया होईल. त्यानंतर पुढील निवड प्रक्रिया पार पडेल.

कोण कोणत्या पदांसाठी भरती?

पुणे पालिकेत असिस्टंट लीगल ऑफिसर, क्लार्क टायपिस्टर, ज्युनिअर इंजिनिअर, असिस्टंट एनकॉर्चमेन्ट इन्स्पेक्ट ही पदं रिक्त आहेत. यातील क्लर्क टायपिस्टसाठी 200 तर असिस्टंट एनकॉर्चमेन्ट इंस्पेक्टसाठी 100 पदांची भरती करण्यात येणार आहे. तर ज्युनिअर इंजिनिअरच्या सिव्हिल, मॅकेनिकल, ट्रॅफिक प्लानिंग या पदांसाठीही भरती केली जाणार आहे. त्यातील सिव्हिल इंजिनिअरसाठी 135 जागा असून मॅकेनिकलच्या 5 तर ट्रॅफिक प्लॅनिंगच्या 4 पदांवर भरती केली जाईल.

अशी असेल निवड प्रक्रिया

या मेगाभरतीसाठी लेखी परीक्षा, त्यानंतर मुलाखत, टायपिंग टेस्ट, कागदपत्रांची पडताळणी, अशी टप्प्याटप्प्याने निवडप्रक्रिया पार पडले. वय वर्ष 18 ते 38 वयोगटातील इच्छुक उमेदवारांना पुणे पालिकेत नोकरीची संधी चालून आली आहे. कोरोनामुळे लांबलेली भरती प्रक्रिया आता पुन्हा सुरु झाली आहे. त्यामुळे हजारो विद्यार्थ्यांनी पुणे पालिकेत नोकरी मिळावी, यासाठी अर्ज केल्याचं पाहायला मिळालंय.

Non Stop LIVE Update
सलमान खानच्या घरावर गोळीबार करणारे आरोपी महिनाभर पनवेलमध्ये?
सलमान खानच्या घरावर गोळीबार करणारे आरोपी महिनाभर पनवेलमध्ये?.
एका रात्रीत तुझं पार्सल बीडला माघारी पाठवणार, मोहितेंचा कुणावर निशाणा?
एका रात्रीत तुझं पार्सल बीडला माघारी पाठवणार, मोहितेंचा कुणावर निशाणा?.
माढ्यासाठी फडणवीस मैदानात, विशेष विमानाने 'या' 4 नेत्याची तडकाफडकी भेट
माढ्यासाठी फडणवीस मैदानात, विशेष विमानाने 'या' 4 नेत्याची तडकाफडकी भेट.
अजितदादा जर मला नटसम्राट म्हणून हिणवत असतील तर...अमोल कोल्हेंचा पलटवार
अजितदादा जर मला नटसम्राट म्हणून हिणवत असतील तर...अमोल कोल्हेंचा पलटवार.
सलमान खानच्या घरावरील हल्ल्याचा कट महिन्यापूर्वीच? इथं झालं प्लानिंग
सलमान खानच्या घरावरील हल्ल्याचा कट महिन्यापूर्वीच? इथं झालं प्लानिंग.
अभिषेक घोसाळकर हत्येच्या तपासावर तेजस्वी घोसाळकरांची नाराजी,
अभिषेक घोसाळकर हत्येच्या तपासावर तेजस्वी घोसाळकरांची नाराजी,.
रत्नागिरी-सिंधुदुर्गात तिढा वाढला; राणे-सामतांनी घेतले उमेदवारी अर्ज
रत्नागिरी-सिंधुदुर्गात तिढा वाढला; राणे-सामतांनी घेतले उमेदवारी अर्ज.
21 माजी न्यायाधीशांचं सरन्यायाधीशांना पत्र, काय केला आरोप?
21 माजी न्यायाधीशांचं सरन्यायाधीशांना पत्र, काय केला आरोप?.
प्रचारादरम्यान विरोधकांनी विरोधकांच्या प्रभागात मारला मिसळीवर ताव
प्रचारादरम्यान विरोधकांनी विरोधकांच्या प्रभागात मारला मिसळीवर ताव.
हंडाभर पाण्यासाठी वणवण, tv9च्या बातमीनंतर 'पाणीदूत' हाकेला धावला
हंडाभर पाण्यासाठी वणवण, tv9च्या बातमीनंतर 'पाणीदूत' हाकेला धावला.