AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

सरकारी नोकरी करण्याची हीच ‘ती’ संधी, रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाकडून बंपर भरती, ही पदे…

RBI Recruitment 2024 : नोकरीच्या शोधात असणाऱ्यांसाठी एक सुवर्णसंधी आहे. विशेष म्हणजे लवकरच भरती प्रक्रियेला सुरूवात होईल. नोकरीच्या शोधात असणाऱ्यांनी अजिबातच वेळ वाया न घालता अर्ज करावीत. सरकारी नोकरी करण्याची मोठी संधी तुमच्याकडे आहे.

सरकारी नोकरी करण्याची हीच 'ती' संधी, रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाकडून बंपर भरती, ही पदे...
Reserve Bank of India
| Updated on: Jul 20, 2024 | 2:55 PM
Share

नोकरीच्या शोधात असणाऱ्यांसाठी खरोखरच एक मोठी संधी आहे. भरती प्रक्रियेला लवकरच सुरूवात होईल. नोकरीच्या शोधात असणाऱ्यांनी अजिबातच वेळ वाया न घालता भरतीसाठी अर्ज करावा. विशेष म्हणजे ही एकप्रकारची मेगा भरती किंवा बंपर भरतीच म्हणावी लागेल. या भरती प्रक्रियेसाठी आपल्याला ऑनलाईन पद्धतीने अर्ज ही करावी लागणार आहेत. विशेष म्हणजे सरकारी नोकरी करण्याची संधी तुमच्याकडे आहे. चला तर मग जाणून घ्या या भरती प्रक्रियेबद्दल अधिक आणि अर्ज करण्याची सोपी प्रक्रिया.

रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाकडून ही भरती प्रक्रिया राबवली जातंय.  RBI ने ग्रुप P भरतीसाठी शॉर्ट नोटिस जारी केली आहे. ही पदे B श्रेणीची असून त्यांच्या अंतर्गत एकूण 94 रिक्त पदे भरण्यात येणार आहेत. या भरती प्रक्रियेसाठी वयाची आणि शिक्षणाची अटही लागू करण्यात आलीये. या भरती प्रक्रियेसाठी आपल्याला 25 जुलैपासून अर्ज ही करावी लागणार आहेत. 

या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख ही 16 ऑगस्ट 2024 आहे. त्यापूर्वीच आपल्याला भरतीसाठी अर्ज करणे आवश्यक आहे. भरती प्रक्रियेसाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावी लागणार असून rbi.org.in. या साईटवर जाऊन तुम्हाला अर्ज करावी लागतील. याच साईटवर तुम्हाला भरती प्रक्रियेची सविस्तर माहिती ही आरामात मिळेल. 

लक्षात ठेवा की, ही भरती प्रक्रिया विविध पदांसाठी होत आहे. यामुळे अर्ज करताना आपण अर्ज नेमक्या कोणत्या पदासाठी करत आहोत, हे उमेदवाराने व्यवस्थित लक्षात घ्यावे. 21 ते 30 वयोगटापर्यंतचे उमेदवार या भरती प्रक्रियेसाठी आरामात अर्ज ही करू शकतात. 60 टक्क्यांपेक्षा अधिक गुणांसह पदवी किंवा पदव्युत्तर शिक्षण घेतलेले उमेदवार अर्ज करू शकतात.

परीक्षा आणि मुलाखत देखील या भरती प्रक्रियेसाठी उमेदवारांना द्यावी लागेल. डिसेंबरमध्ये मुलाखत होणार आहे. पहिला टप्पा, दुसरा आणि मुलाखत या तिन्ही टप्पे पार केल्यानंतरच निवड केली जाईल. नोकरीच्या शोधात असणाऱ्यांसाठी चांगली मोठी संधी आहे. या भरती प्रक्रियेची अधिसूचना व्यवस्थित वाचूनच उमेदवारांनी भरतीसाठी अर्ज करावा. 

Follow Us
गणेशोत्सवात महागणपती मंडपात काळीज पिळवटून टाकणारी घटना
Kalachowki : गणेशोत्सवात महागणपती मंडपात काळीज पिळवटून टाकणारी घटना
हार चढवला, पण फुलांचा नाही; मुंबईच्या राजाला चक्क 101 अमेरिकन डॉलरचा..
Mumbai Cha Raja | हार चढवला, पण फुलांचा नाही; मुंबईच्या राजाला चक्क 101 अमेरिकन डॉलरचा हार, व्हिडीओ होतोय व्हायरल
दिशा सालियन प्रकरणावर संजय राऊतांची प्रतिक्रीया, म्हणाले...
Sanjay Raut | मातोश्रीवर येऊन प्रसिद्धी मिळवण्याचा प्रयत्न घाणेरडा; दिशा सालियन प्रकरणावर संजय राऊतांची प्रतिक्रीया, पुढे म्हणाले...
भरधाव BMWचा अक्षरशः चक्काचूर! मुंबईच्या कोस्टल रोडवर चालकाचं नियंत्रण
BMW Car Accident | भरधाव BMWचा अक्षरशः चक्काचूर! मुंबईच्या कोस्टल रोडवर चालकाचं नियंत्रण सुटलं अन् BMW थेट खाली कोसळली
शेतात ट्रॅक्टर नाही, थेट ड्रोनची एन्ट्री; मुळशीत अभिनव प्रयोग
Drone In Farm | शेतात ट्रॅक्टर नाही, थेट ड्रोनची एन्ट्री; मुळशीत अभिनव प्रयोग, व्हिडिओ बघाच
पाच दिवसांत चारा छावण्या सुरू करा, रोहित पवारांचा सरकारला अल्टिमेटम
Rohit Pawar | पाच दिवसांत चारा छावण्या सुरू करा, रोहित पवारांचा सरकारला अल्टिमेटम; शेतकऱ्यांसाठी 50 हजारांची मदत अन्...
महाराष्ट्र दुष्काळात होरपळतोय, पण सरकार... राऊतांचा सरकारवर हल्लाबोल
Sanjay Raut | महाराष्ट्र दुष्काळात होरपळतोय, पण सरकार... संजय राऊतांचा राज्य सरकारवर जोरदार हल्लाबोल
मंत्री विखे पाटलांची पुतणी स्वीडिश संसदेत खासदार; 349 सदस्यांच्या...
Radhakrishna Vikhe Patil | मंत्री विखे पाटलांची पुतणी स्वीडिश संसदेत खासदार; 349 सदस्यांच्या संसदेत मिळवलं स्थान
राधाकृष्ण विखे पाटील यांची रुग्णालयात मनोज जरांगे पाटील यांच्याशी भेट
राधाकृष्ण विखे पाटील यांची रुग्णालयात मनोज जरांगे पाटील यांच्याशी भेट, व्हिडीओ आले समोर
दुष्काळ आढावा बैठकीतील काजू बदाम वादावर भरणेंचा खुलासा; म्हणाले...
दुष्काळ आढावा बैठकीतील काजू बदाम वादावर भरणेंचा खुलासा; म्हणाले, शुगर असलेल्यांनीच...