AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

गाणं पाहिजे तर असं, 23 वर्षांपासून प्रत्येक GEN-Z चं आवडतं, ऐकू येताच प्रत्येकजण गुणगुणतो

23 वर्षांपूर्वीचं प्रचंड सुपरहिट गाणं, चित्रपट फ्लॉप झाला पण गाण्याने प्रेक्षकांच्या मनावर केलं राज्य. आजही ऐकू येताच प्रत्येकजण गुणगुणतो.

गाणं पाहिजे तर असं, 23 वर्षांपासून प्रत्येक GEN-Z चं आवडतं, ऐकू येताच प्रत्येकजण गुणगुणतो
Image Credit source: Social media
| Updated on: Nov 06, 2026 | 5:56 PM
Share

बॉलिवूडमध्ये काही गाणी अशी असतात जी प्रदर्शित झाल्यानंतर अनेक वर्षे उलटली तरी प्रेक्षकांच्या मनात घर करून राहतात. असंच एक गाणं म्हणजे 2003 मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘कुछ तो है’ चित्रपटातील ‘डिंग डाँग डिंग’. सुनिधी चौहानच्या दमदार आवाजातील हे गाणं तब्बल 23 वर्षांनंतरही संगीतप्रेमींमध्ये लोकप्रिय आहे. सोशल मीडियाच्या माध्यमातून जुन्या गाण्यांना पुन्हा नव्याने लोकप्रियता मिळत असताना या गाण्याचीही चर्चा रंगू लागली आहे.

‘कुछ तो है’ हा चित्रपट 2003 मध्ये प्रदर्शित झाला होता. या चित्रपटात तुषार कपूर आणि ईशा देओल मुख्य भूमिकेत होते. त्यांच्यासोबत ऋषी कपूर, रती अग्निहोत्री आणि अनीता हसनंदानी यांच्याही महत्त्वाच्या भूमिका होत्या. अनुराग बसू आणि अनिल वी. कुमार यांच्याशी संबंधित दिग्दर्शनाच्या या चित्रपटाची निर्मिती एकता कपूर आणि शोभा कपूर यांच्या बालाजी टेलिफिल्म्सने केली होती.

कॉलेज लाइफ, प्रेम आणि रहस्याचा संगम

या चित्रपटाची कथा कॉलेजमधील जीवन, प्रेम आणि रहस्यमय घटनांभोवती फिरते. तुषार कपूरने करण, तर ईशा देओलने नताशाची भूमिका साकारली होती. सुरुवातीला कॉलेजमधील वातावरण आणि प्रेमकहाणी दाखवणारा चित्रपट पुढे सस्पेन्सच्या वळणावर जातो. त्यामुळे चित्रपटात रोमान्ससोबतच थरारही पाहायला मिळतो.

या चित्रपटात अनीता हसनंदानीदेखील महत्त्वाच्या भूमिकेत दिसली होती. पुढील काळात तिने छोट्या पडद्यावर स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली. विशेषतः ‘ये है मोहब्बतें’ मालिकेतील शगुन या भूमिकेमुळे ती घराघरात लोकप्रिय झाली.

‘डिंग डॉंग डिंग’ गाण्याची पुन्हा क्रेझ

‘कुछ तो है’ चित्रपटातील ‘डिंग डाँग डिंग’ हे गाणं त्याच्या धमाल संगीतामुळे विशेष लोकप्रिय झालं होतं. सुनिधी चौहानच्या आवाजाने या गाण्याला वेगळी ओळख मिळाली. तुषार कपूर आणि अनीता हसनंदानी यांच्या डान्समुळेही हे गाणं प्रेक्षकांच्या लक्षात राहिलं.

विशेष म्हणजे, चित्रपटाला बॉक्स ऑफिसवर अपेक्षित मोठे यश मिळाले नाही. मात्र, त्यातील गाण्यांना प्रेक्षकांची चांगली पसंती मिळाली. आता सोशल मीडियावर जुन्या गाण्यांचा ट्रेंड वाढत असताना ‘डिंग डाँग डिंग’ पुन्हा एकदा तरुणाई आणि जुन्या बॉलिवूड संगीताच्या चाहत्यांमध्ये चर्चेत आले आहे.

Follow Us
अजित पवारांच्या राष्ट्रवादीत उलथापालथ होण्याची शक्यता...
NCP : अजित पवारांच्या राष्ट्रवादीत उलथापालथ होण्याची शक्यता; त्या बड्या नेत्याच्या दाव्याने राजकीय वर्तुळात खळबळ
अजितदादा असते तर दोन्ही राष्ट्रवादी...; सुनील तटकरे यांचं मोठं विधान
Sunil Tatkare : अजितदादा असते तर दोन्ही राष्ट्रवादी...; सुनील तटकरे यांचं  मोठं विधान
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार? शरद पवार-प्रफुल्ल पटेल भेटीनंतर राजकीय
NCP Merger : दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार? शरद पवार-प्रफुल्ल पटेल भेटीनंतर राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण
मुख्यमंत्री फडणवीसांचा सुप्रिया सुळेंना फोन; शरद पवारांच्या.....
Devendra Fadnavis Calls Supriya Sule : मुख्यमंत्री फडणवीसांचा सुप्रिया सुळेंना फोन; शरद पवारांच्या प्रकृतीची घेतली सविस्तर माहिती
अजितदादा हयात असते तर 12 फेब्रुवारीलाच दोन्ही राष्ट्रवादी एकत्र...
अजितदादा हयात असते तर 12 फेब्रुवारीलाच दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आल्या असत्या; सुनील तटकरेंचा मोठा खुलासा!
शरद पवारांच्या भेटीगाठींवरून रोहित पवारांचा भाजपला सूचक इशारा; पार्थ..
शरद पवारांच्या भेटीगाठींवरून रोहित पवारांचा भाजपला सूचक इशारा; पार्थ आणि सुनेत्रा पवारांबाबत काय म्हणाले?
मोठी बातमी! मृत्यूपूर्वी वैभव चव्हाण यांची कथित ऑडिओ क्लिप व्हायरल...
मोठी बातमी! मृत्यूपूर्वी वैभव चव्हाण यांची कथित ऑडिओ क्लिप व्हायरल; क्रीडा घोटाळ्याचा पर्दाफाश केल्याचा दावा
महाराष्ट्र राज्याला मिळणार राष्ट्रीय पुरस्कार! नवीकरणीय ऊर्जा...
महाराष्ट्र राज्याला मिळणार राष्ट्रीय पुरस्कार! नवीकरणीय ऊर्जा क्षेत्रातील कामगिरीचा गौरव
गोकुळमध्ये भाजपचे 5 संचालक नेमलेच कसे? राज ठाकरेंचा थेट सवाल!
Raj Thackeray : गोकुळमध्ये भाजपचे 5 संचालक नेमलेच कसे? राज ठाकरेंचा थेट सवाल!
गोकुळ दुध संघातील तिढा कधी सुटणार? चंद्रकांत पाटलांच्या भेटीनंतर हसन..
गोकुळ दुध संघातील तिढा कधी सुटणार? चंद्रकांत पाटलांच्या भेटीनंतर हसन मुश्रीफ स्पष्टच म्हणाले...