AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Full time job करूनही UPSC मध्ये पहिल्या प्रयत्नात यश मिळवले, परीक्षेत दुसरा क्रमांक मिळवून बनली IAS

UPSC topper: यूपीएससीची परीक्षा देण्यासाठी मेडिकल प्रॅक्टिस सोडली होती. आयएएस अधिकारी रेणू राज मुन्नारच्या हिल स्टेशनमधील बेकायदेशीर बांधकामे आणि जमीन अतिक्रमणाविरोधात कठोर कारवाई करण्यासाठी देखील ओळखल्या जातात.

Full time job करूनही UPSC मध्ये पहिल्या प्रयत्नात यश मिळवले, परीक्षेत दुसरा क्रमांक मिळवून बनली IAS
IAS Renu raj
| Updated on: May 17, 2023 | 6:29 PM
Share

मुंबई: UPSC नागरी सेवा परीक्षा ही भारतातील सर्वात कठीण परीक्षांपैकी एक आहे. यामुळेच दरवर्षी सुमारे १००० उमेदवारच या नागरी सेवा परीक्षेत उत्तीर्ण होऊ शकतात. पण आज आम्ही तुम्हाला एक व्यक्ती आणि आयएएस अधिकारी रेणू राज बद्दल सांगणार आहोत, जी केरळमधील कोट्टायमची रहिवासी आहे आणि तिने ही यूपीएससी परीक्षा पहिल्याच प्रयत्नात उत्तीर्ण केली आणि या नागरी सेवा परीक्षेत दुसरा क्रमांक ही मिळवला.

रेणू राज यांनी यूपीएससीची परीक्षा देण्यासाठी मेडिकल प्रॅक्टिस सोडली होती. आयएएस अधिकारी रेणू राज मुन्नारच्या हिल स्टेशनमधील बेकायदेशीर बांधकामे आणि जमीन अतिक्रमणाविरोधात कठोर कारवाई करण्यासाठी देखील ओळखल्या जातात.

रेणू राज यांचे शालेय शिक्षण केरळमधील कोट्टायम येथील सेंट तेरेसा हायर सेकंडरी स्कूलमधून झाले. यानंतर त्यांनी कोट्टायमच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातून वैद्यकीय शिक्षण घेतले. रेणू राज यांचे वडील निवृत्त सरकारी कर्मचारी असून आई गृहिणी आहे. याशिवाय रेणूला दोन बहिणी असून दोघीही व्यवसायाने डॉक्टर आहेत.

रेणू राज यांनी एकदा एका मुलाखतीत सांगितले होते की, IAS अधिकारी बनणे हे माझे लहानपणापासूनचे स्वप्न होते. जेव्हा ती सर्जन म्हणून काम करत होती, तेव्हा तिला जाणवले की तिला सर्वसामान्य लोकांसाठी काहीतरी करायचे आहे आणि त्यांचे जीवन चांगले करायचे आहे. तेव्हाच तिने आयएएस अधिकारी होण्याचा निर्णय घेतला.

“मला वाटलं होतं की एक डॉक्टर म्हणून मी 50 किंवा 100 रुग्णांना मदत करू शकले असते, पण सिव्हिल सर्व्हिस ऑफिसर म्हणून माझ्या एका निर्णयाचा हजारो लोकांना फायदा होईल. तेव्हाच मी यूपीएससी नागरी सेवा परीक्षा देण्याचा निर्णय घेतला.

नगरसेवक बनायचं असेल तर... इच्छुक उमेदवारांवर गडकरींचं खास शैलीत सल्ला
नगरसेवक बनायचं असेल तर... इच्छुक उमेदवारांवर गडकरींचं खास शैलीत सल्ला.
कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेत भाजपचाच महापौर... नरेंद्र पवाराचा दावा
कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेत भाजपचाच महापौर... नरेंद्र पवाराचा दावा.
कार ते एक गुंठा जमीन, पुण्यात उमेदवाराकडून मतदारांना भन्नाट ऑफर्स
कार ते एक गुंठा जमीन, पुण्यात उमेदवाराकडून मतदारांना भन्नाट ऑफर्स.
शेलारांना आठवले चावले, त्यांना पक्षात..संदीप देशपांडे यांची बोचरी टीका
शेलारांना आठवले चावले, त्यांना पक्षात..संदीप देशपांडे यांची बोचरी टीका.
...हे श्रीमंत भिकाऱ्यांचं लक्षण, संजय राऊत यांची भाजपवर जहरी टीका
...हे श्रीमंत भिकाऱ्यांचं लक्षण, संजय राऊत यांची भाजपवर जहरी टीका.
नाशकात भूंकप, युतीनंतर ठाकरे बंधूंना धक्का; मनसे-ठाकरे नेते भाजपवासी
नाशकात भूंकप, युतीनंतर ठाकरे बंधूंना धक्का; मनसे-ठाकरे नेते भाजपवासी.
देवयानी फरांदे भावूक; भाजप प्रवेश अन निष्ठावंतांच्या न्यायासाठी उद्रेक
देवयानी फरांदे भावूक; भाजप प्रवेश अन निष्ठावंतांच्या न्यायासाठी उद्रेक.
जागावाटपाचा तिढा फडणवीसांच्या दरबारात, भाजपकडून 115 जणांची नाव निश्चित
जागावाटपाचा तिढा फडणवीसांच्या दरबारात, भाजपकडून 115 जणांची नाव निश्चित.
पुण्यात ठाकरेंची सेना अन् मनसेची युती होणार? कोण किती जागांवर लढणार?
पुण्यात ठाकरेंची सेना अन् मनसेची युती होणार? कोण किती जागांवर लढणार?.
राज ठाकरेंवर माझी नाराजी नाही, पण... दिनकर पाटलांची पहिली प्रतिक्रिया
राज ठाकरेंवर माझी नाराजी नाही, पण... दिनकर पाटलांची पहिली प्रतिक्रिया.