RRB NTPC 2021 Result : रेल्वे भरती बोर्डाच्यावतीनं आरआरबी एनटीपीसी परीक्षा 2021 चा सर्व विभागांचा निकाल जाहीर केला आहे. आरआरबीच्या अधिकृत वेबसाईटवर निकाल पाहता येईल. ज्या उमेदवारांनी एनटीपीसी आरआरबी परीक्षा दिली होती त्यांना पहिल्या टप्प्यातील परीक्षेचा निकाल उपलब्ध होणार आहे. उमेदवारांनी ज्या विभागातून परीक्षा दिली होती त्या विभागातील आरआरबीच्या प्रादेशिक वेबसाईटवर निकाल पाहता येईल. आरआरबी एनटीपीसी 2021 परीक्षेच्या पहिल्या टप्प्यात उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना दुसऱ्या टप्प्यातील परीक्षेसाठी बसण्यास परवानगी देण्यात येणार आहे. आरआरबी एनटीपीसी परीक्षेचा दुसरा टप्पा 14-18 फेब्रुवारी दरम्यान घेतली जाणार आहे. आरआरबी एनटीपीसी परीक्षेचा पहिला टप्पा यशस्वीपणे पार करणाऱ्या विद्यार्थ्यांची यादी जाहीर करण्यात आले होते. रेल्वेकडून 30 हजार जागांसाठी अर्ज मागवले होते.