रेल्वे भरतीची तयारी करताय? मग बोर्डाच्या ह्या गाईडलाईन्स वाचलात का?

रेल्वे भरती मंडळाने (आरआरबी) 15 डिसेंबरपासून सुरू होणाऱ्या रेल्वे भरती परीक्षांविषयी नवीन मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत.

रेल्वे भरतीची तयारी करताय? मग बोर्डाच्या ह्या गाईडलाईन्स वाचलात का?
Follow us
| Updated on: Dec 12, 2020 | 12:46 PM

नवी दिल्ली : रेल्वे भरती मंडळाने (आरआरबी) 15 डिसेंबरपासून सुरू होणाऱ्या रेल्वे भरती परीक्षांविषयी मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत. कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर आता उमेदवारांना आपलं फिटनेस सर्टिफिकेट द्यावं लागणार आहे. आरआरबीच्या नवीन परीक्षा मार्गदर्शक तत्त्वांनुसार परीक्षेला येण्यापूर्वी फिटनेस प्रमाणपत्रावर स्वाक्षरी करावी लागेल. (RRB Railway recruitment Exam Covid 19 guidelines)

“कोरोना संसर्गाच्या दरम्यान होत असलेल्या परीक्षांसाठी विशेष व्यवस्था केली जाईल. कॉम्प्युटरवर होत असलेल्या या परीक्षेसाठी परीक्षाकेंद्रावर पोहचण्यापूर्वी बायोमेट्रिक पद्धत पूर्ण करावी लागणार आहे”, अशी माहिती रेल्वे भरती मंडळाचे महासंचालक आनंद खाटी यांनी दिली.

15 डिसेंबरपासून, एनटीपीसी, गट-डी आणि मिनिस्ट्रियल रिक्त पदांसाठी रेल्वेच्या तीन विभागांमध्ये परीक्षा घेण्यात येत आहेत. या परीक्षेमधून एक लाख 40 हजार पदांवर भरती केली जात आहे. या परीक्षेसाठी सुमारे 2 कोटी 44 लाख उमेदवारांनी अर्ज केले आहेत. एका परीक्षा हॉलमध्ये 65 पेक्षा अधिक उमेदवार नसतील.

फिटनेस टेस्ट करावी लागणार

परीक्षा केंद्रात आल्यानंतर विद्यार्थ्यांची थर्मल पद्धतीने चाचणी केली जाईल. जर कोणत्या विद्यार्थ्याच्या शरीराचं तापमान जास्त असेल तर त्याला त्वरित फिटनेस टेस्टसाठी पाठवलं जाईल. त्यानंतरही विद्यार्थ्याला जर काही वैद्यकीय समस्या जाणवत असेल तर त्याला पुढील उपचारासाठी पाठवले जाईल. उमेदवार पूर्णपणे तंदुरुस्त झाल्यानंतरच त्याला पुन्हा परीक्षा देण्याची संधी दिली जाईल, अशी माहिती महासंचालक आनंद खाटी यांनी दिली.

विशेष गाड्या धावणार

परीक्षेला बसलेल्या उमेदवारांसाठी विशेष गाड्या चालवल्या जातील. त्याचबरोबर, त्यांच्या राज्यात महिला आणि अपंगांसाठी परीक्षा केंद्रे बनविली गेली आहेत, अशी माहितीही आनंद खाटी यांनी दिली.

(RRB Railway recruitment Exam Covid 19 guidelines)

संबंधित बातम्या

आयटीआय उत्तीर्ण विद्यार्थ्यांना सरकारी नोकरीची संधी, ‘महापारेषण’मध्ये 8500 पदांवर भरती

राज्याच्या 8 जिल्ह्यातील तलाठी भरती प्रक्रियेस मान्यता, अहमदनगर जिल्ह्यातील भरतीबाबतही लवकरच निर्णय : बाळासाहेब थोरात

Non Stop LIVE Update
धमक्या देणाऱ्यांना माझा नंबर द्या, सुप्रिया सुळेंचा रोख नेमका कुणावर?
धमक्या देणाऱ्यांना माझा नंबर द्या, सुप्रिया सुळेंचा रोख नेमका कुणावर?.
निधीवरून धमकीचा मामला...अजित पवारांचं 'त्या' वक्तव्यावरून स्पष्टीकरण
निधीवरून धमकीचा मामला...अजित पवारांचं 'त्या' वक्तव्यावरून स्पष्टीकरण.
लटकवून लटकवून उमेदवारी मिळाली, राणेंना ठाकरे गटाच्या नेत्यानं डिवचलं
लटकवून लटकवून उमेदवारी मिळाली, राणेंना ठाकरे गटाच्या नेत्यानं डिवचलं.
बाई खुणावेल, डोळा मारेल पण... राऊतांचा नाव न घेता राणांवर निशाणा
बाई खुणावेल, डोळा मारेल पण... राऊतांचा नाव न घेता राणांवर निशाणा.
अजितदादांवर गुन्हा दाखल होणार? शरद पवार गटाच्या नेत्याची मागणी, पण का?
अजितदादांवर गुन्हा दाखल होणार? शरद पवार गटाच्या नेत्याची मागणी, पण का?.
'यमराज'नं भरला लोकसभेचा उमेदवारी अर्ज? रेड्यावर बसून घेतली एन्ट्री
'यमराज'नं भरला लोकसभेचा उमेदवारी अर्ज? रेड्यावर बसून घेतली एन्ट्री.
नाची, डान्सर आणि... नवनीत राणांवर बोलताना संजय राऊतांची जीभ घसरली
नाची, डान्सर आणि... नवनीत राणांवर बोलताना संजय राऊतांची जीभ घसरली.
सुनेत्रा पवारांनी उमेदावारीचा अर्ज दाखल करताच दादांनी भरला डमी अर्ज
सुनेत्रा पवारांनी उमेदावारीचा अर्ज दाखल करताच दादांनी भरला डमी अर्ज.
लोकसभेची निवडणूक म्हणजे अफझलखानाची... अमोल कोल्हे नेमकं काय म्हणाले?
लोकसभेची निवडणूक म्हणजे अफझलखानाची... अमोल कोल्हे नेमकं काय म्हणाले?.
ठरलं... रत्नागिरी-सिंधुदुर्गातून राणे लढणार, भाजपकडून 13 वी यादी जाहीर
ठरलं... रत्नागिरी-सिंधुदुर्गातून राणे लढणार, भाजपकडून 13 वी यादी जाहीर.