भारतातील सर्वात मोठ्या बँकेत मिळवा नोकरी, कोणतीही परीक्षा न देता होणार निवड, अर्ज कसा कराल?

स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये ११६ स्पेशलिस्ट कॅडर ऑफिसर पदांसाठी भरती जाहीर झाली आहे. लेखी परीक्षेविना थेट मुलाखतीद्वारे निवड होणार आहे. १५ मार्चपर्यंत अर्ज करा.

भारतातील सर्वात मोठ्या बँकेत मिळवा नोकरी, कोणतीही परीक्षा न देता होणार निवड, अर्ज कसा कराल?
bank jobs
| Updated on: Feb 27, 2026 | 1:14 PM

बँकिंग क्षेत्रात करिअर करण्याची इच्छा असलेल्या आणि विशेष तांत्रिक कौशल्य (Specialization) असलेल्या उमेदवारांसाठी गुडन्यूज आहे. भारतातील सर्वात मोठी सार्वजनिक क्षेत्रातील बँक असलेल्या स्टेट बँक ऑफ इंडियाने (SBI) अशा उमेदवारांसाठी एक मोठी सुवर्णसंधी उपलब्ध करून दिली आहे. बँकेने स्पेशलिस्ट कॅडर ऑफिसर (SCO) या श्रेणीतील विविध ११६ रिक्त पदांच्या भरतीसाठी अधिकृत अधिसूचना जारी केली आहे. या भरतीचे सर्वात महत्त्वाचे वैशिष्ट्य म्हणजे या उमेदवारांना कोणतीही लेखी परीक्षा (Written Exam) देण्याची आवश्यकता नाही. थेट मुलाखतीच्या (Interview) आधारे त्यांची निवड केली जाणार आहे.

किती पदं भरली जाणार?

या भरती मोहिमेअंतर्गत एकूण ११६ पदे भरली जाणार आहेत. या पदांनुसार आवश्यक शैक्षणिक पात्रता आणि अनुभव याची माहितीही समोर आली आहे. बँकेने जाहीर केलेल्या अधिसूचनेनुसार, AVP System Officer या पदासाठी मान्यताप्राप्त विद्यापीठातून आयटी किंवा कॉम्प्युटर सायन्समध्ये बी.ई./बी.टेक (B.E./B.Tech) किंवा MCA पदवी आवश्यक असणार आहे. तसेच या संबंधित क्षेत्रात कामाचा अनुभव अनिवार्य असेल.

त्यानंतर डेप्युटी मॅनेजर (IS Audit) हे पद रिक्त असून त्याची भरती जाहीर केली आहे. यासाठी माहिती प्रणाली (Information Systems) ऑडिट क्षेत्रातील अनुभवासह संबंधित पदवी किंवा CISA प्रमाणपत्र आवश्यक असणार आहे. त्यासोबतच डेप्युटी मॅनेजर (CA) यासाठी चार्टर्ड अकाउंटंट (CA) ही पदवी अनिवार्य असणार आहे.

या जागांसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांचे किमान वय २३ ते २५ वर्षे (पदांनुसार भिन्न) आणि कमाल वयोमर्यादा ३५ ते ४२ वर्षे (पदांनुसार भिन्न) निश्चित करण्यात आली आहे. शासकीय नियमांनुसार आरक्षित प्रवर्गातील (SC/ST/OBC/PWD) उमेदवारांना वयोमर्यादेत सवलत दिली जाणार आहे. ही भरती प्रक्रिया पूर्णपणे मुलाखतीवर आधारित असेल.

या प्राप्त अर्जांमधून शैक्षणिक पात्रता आणि अनुभवाच्या आधारे उमेदवारांचे शॉर्ट लिस्टिंग केले जाईल. यानंतर शॉर्टलिस्ट झालेल्या उमेदवारांना थेट मुलाखतीसाठी बोलावले जाईल. ही मुलाखत १०० गुणांची असेल. या मुलाखतीमधील कामगिरीच्या आधारे गुणवत्ता यादी (Merit List) तयार केली जाईल. जर दोन उमेदवारांना मुलाखतीत समान गुण मिळाले, तर ज्या उमेदवाराचे वय जास्त आहे, त्याला वरिष्ठ मानून प्राधान्य दिले जाईल.

अर्ज शुल्क (Application Fee)

सामान्य (General), EWS आणि ओबीसी (OBC): ७५० रुपये

अनुसूचित जाती (SC), अनुसूचित जमाती (ST) आणि दिव्यांग (PWD): शुल्क नाही

अर्ज कसा करावा?

  • SBI च्या अधिकृत वेबसाइटवर जा: sbi.co.in/careers
  • होमपेजवरील संबंधित जाहिरातीवर क्लिक करून ‘Apply Online’ निवडा.
  • नवीन नोंदणी (Registration) करा आणि आवश्यक माहिती भरा.
  • फोटो, स्वाक्षरी आणि शैक्षणिक कागदपत्रे अपलोड करा.
  • अर्ज शुल्क ऑनलाइन भरा आणि फॉर्म सबमिट करा.
  • भविष्यातील संदर्भासाठी अर्जाची प्रिंटआउट काढून ठेवा.
  • या उमेदवारीसाठी ऑनलाईन अर्ज करता येणार आहे.
  • हे अर्ज करण्याची अंतिम तारीख १५ मार्च आहे.

Follow Us