परीक्षा द्यायचीच नाही, थेट नोकरीच ज्वॉईन करायची; रेल्वेत ‘या’ लोकांसाठी फुल्ल भरती

दक्षिण-पूर्व रेल्वेने 1785 पेक्षा जास्त अप्रेंटिस पदांसाठी भरती जाहीर केली आहे. 28 नोव्हेंबर 2024 पासून iroams.com वर अर्ज सुरू आहेत. अर्ज भरण्याची अंतिम तारीख 27 डिसेंबर 2024 आहे. 10वी पास आणि ITI प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे. नोकरीसाठी वयोमर्यादा 15 ते 24 वर्षे आहे. निवड मेरिटच्या आधारे होईल. अर्ज शुल्क सामान्य/ओबीसीसाठी 100 रुपये आहे.

परीक्षा द्यायचीच नाही, थेट नोकरीच ज्वॉईन करायची; रेल्वेत 'या' लोकांसाठी फुल्ल भरती
Follow us
| Updated on: Nov 30, 2024 | 6:27 PM

रेल्वेमध्ये सरकारी नोकरी करण्याचं असणाऱ्या तरुणांसाठी आनंदाची बातमी आहे. रेल्वेत पुन्हा एकदा भरती होणार आहे. दक्षिण-पूर्व रेल्वेने विविध कार्यशाळा आणि युनिटमध्ये अप्रेंटिसच्या 1700 पेक्षा जास्त पदे भरणार असल्याची घोषणा केली आहे. या भरतीची अधिकृत नोटीस जाहीर करण्यात आली आहे. अर्ज भरण्याची प्रक्रिया 28 नोव्हेंबर 2024 पासून म्हणजे कालपासूनच अधिकृत वेबसाइट iroams.com वर सुरु झाली आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवार अंतिम तारीख 27 डिसेंबर 2024 रोजी सायं 5 वाजेपर्यंत अर्ज करू शकतात. अर्ज शुल्क भरण्याची अंतिम तारीखही 27 डिसेंबरच आहे.

रिक्तपदांची माहिती

जे उमेदवार त्यांच्या शिक्षणानंतर चांगल्या ठिकाणी अप्रेंटिसशिप करू इच्छितात, त्यांच्यासाठी ही एक उत्तम संधी आहे. रिक्तपदांची माहिती आणि नोटिफिकेशन लिंक खाली दिली आहे.

पदाचे नाव

अप्रेंटिस

हे सुद्धा वाचा

पदे भरावयाची

1785

नोटिफिकेशन

RRC SER Recruitment 2024

Official Notification Download PDF

पात्रता :

रेल्वे अप्रेंटिसच्या या भरतीसाठी अर्ज करण्यासाठी उमेदवारांनी कोणत्याही मान्यताप्राप्त बोर्डातून 10वी पास किंवा त्याच्या समकक्ष परीक्षेत पास असणे आवश्यक आहे. तसेच संबंधित ट्रेड/ब्रांचमध्ये ITI सर्टिफिकेट असणे आवश्यक आहे. पात्रतेसंबंधी इतर माहिती उमेदवार अधिकृत नोटिफिकेशनमध्ये पाहू शकतात.

वय काय हवं? :

रेल्वे अप्रेंटिसच्या या भरती प्रक्रियेत सहभागी होण्यासाठी उमेदवारांनी किमान वय 15 वर्षे आणि जास्तीत जास्त वय 24 वर्षे केलेली असावीत. उमेदवारांचे वय 1 जानेवारी 2024 च्या आधारावर गणना करण्यात येईल. वयोमर्यादेत आरक्षित वर्गांसाठी सवलत दिली जाईल.

निवड प्रक्रिया :

रेल्वे अप्रेंटिससाठी उमेदवारांची निवड प्रक्रिया कोणतीही परीक्षा न घेता, सरळ मार्क्सच्या आधारे तयार केलेल्या मेरिटच्या माध्यमातून केली जाईल. शॉर्टलिस्ट केलेल्या उमेदवारांना कागदपत्रांच्या सत्यापनासाठी बोलावले जाईल.

अर्ज शुल्क :

अर्ज करताना सामान्य आणि ओबीसी उमेदवारांना 100 रुपये अर्ज शुल्क भरावे लागेल. तर एससी, एसटी आणि महिलांना अर्ज शुल्कात सवलत दिली जाईल. रेल्वेच्या या भरतीसंबंधी इतर कोणतीही माहिती मिळवण्यासाठी उमेदवारांनी आरआरसी दक्षिण-पूर्व रेल्वे कोलकाताच्या अधिकृत वेबसाइटला भेट द्यावी.

'तिघांना शुभेच्छा पण आता नाटकबाजी बंद..', शपथविधी होताच जरांगे पेटले
'तिघांना शुभेच्छा पण आता नाटकबाजी बंद..', शपथविधी होताच जरांगे पेटले.
'शपथविधीला निमंत्रण दिल पण..', 'त्यांच्या' अनुपस्थितीवर फडणवीस म्हणाले
'शपथविधीला निमंत्रण दिल पण..', 'त्यांच्या' अनुपस्थितीवर फडणवीस म्हणाले.
महायुती आणि मविआतील दोन नेत्यांची गळाभेट... पुढे काय झालं बघा व्हिडीओ
महायुती आणि मविआतील दोन नेत्यांची गळाभेट... पुढे काय झालं बघा व्हिडीओ.
'कुठं गटाराचं नाव घेताय', चित्रा वाघांची कोणावर जिव्हारी लागणारी टीका?
'कुठं गटाराचं नाव घेताय', चित्रा वाघांची कोणावर जिव्हारी लागणारी टीका?.
उद्यापासून विशेष अधिवेशन, विधानसभेचं हंगामी अध्यक्षपद कोण भूषवणार?
उद्यापासून विशेष अधिवेशन, विधानसभेचं हंगामी अध्यक्षपद कोण भूषवणार?.
'तोंडाला सत्तेचं रक्त लागल्यानं काहींना शिकार सोडाविशी वाटत नाही'
'तोंडाला सत्तेचं रक्त लागल्यानं काहींना शिकार सोडाविशी वाटत नाही'.
महायुती 2.0 राज्यात आता फडणवीस 'सरकार',तिसऱ्यांदा मुख्यमंत्रिपदाची शपथ
महायुती 2.0 राज्यात आता फडणवीस 'सरकार',तिसऱ्यांदा मुख्यमंत्रिपदाची शपथ.
शपथविधीच्या 3 तासांआधी सस्पेन्स, अखेर शिंदेंनी घेतली DCM पदाची शपथ
शपथविधीच्या 3 तासांआधी सस्पेन्स, अखेर शिंदेंनी घेतली DCM पदाची शपथ.
लाल पागोटं, गुलाबी शेला अन् दादांनी रेकॉर्ड केला; 6 वेळा उपमुख्यमंत्री
लाल पागोटं, गुलाबी शेला अन् दादांनी रेकॉर्ड केला; 6 वेळा उपमुख्यमंत्री.
बाबासाहेबांचा 68 वा महापरिनिर्वाण दिन, चैत्यभूमीवर भीमसागर उसळला
बाबासाहेबांचा 68 वा महापरिनिर्वाण दिन, चैत्यभूमीवर भीमसागर उसळला.