SSC Delhi Police Recruitment 2021: SSC कॉन्स्टेबलच्या 5836 पदांसाठी PET आणि PMT परीक्षांच्या तारखा जाहीर

स्टाफ सिलेक्शन कमिशनतर्फे (Staff Selection Committee) दिल्ली पोलिसात कॉन्स्टेबल भरती 2020 साठी PET आणि PMT परीक्षांच्या तारखा जाहीर झाल्या आहे. (SSC Delhi Police Recruitment 2021 PET And PMT Exam Date Announced)

SSC Delhi Police Recruitment 2021: SSC कॉन्स्टेबलच्या 5836 पदांसाठी PET आणि  PMT परीक्षांच्या तारखा जाहीर
फोटो : प्रातिनिधिक

नवी दिल्ली : स्टाफ सिलेक्शन कमिशनतर्फे (Staff Selection Committee) दिल्ली पोलिसात कॉन्स्टेबल भरती 2020 साठी PET आणि PMT परीक्षांच्या तारखा जाहीर झाल्या आहे. स्टाफ सिलेक्शन कमिशनने अधिसूचना जारी करून परीक्षेच्या तारखांची घोषणा केली आहे. प्रसिद्ध केलेल्या अधिसूचनेनुसार ही परीक्षा 28 जूनपासून घेण्यात येणार आहे. (SSC Delhi Police Recruitment 2021 PET And PMT Exam Date Announced)

दिल्ली पोलिस दलात कॉन्स्टेबल भरतीची अधिसूचना 1 ऑगस्ट 2020 रोजी प्रसिद्ध करण्यात आली. या रिक्त जागांसाठई एकूण 5836 पदे भरती करायची आहेत. जाहीर केलेल्या अधिसूचनेनुसार या पदांसाठी ऑनलाईन परीक्षा 27 नोव्हेंबर 2020 ते 14 डिसेंबर 2020 या कालावधीत घेण्यात आली. आता आयोगाने शारीरिक तपासणी परीक्षेच्या तारखा जाहीर केल्या आहेत. या पदांवर भरती अंतर्गत दिल्ली पोलिसात कॉन्स्टेबल पदांवर नियुक्ती केली जाणार आहे.

कोरोना नियमांचं करावं लागणार पालन

प्रसिद्ध दिलेल्या अधिसूचनेनुसार, PET आणि PMT या दोन्ही परीक्षांच्या वेळी सर्व उमेदवारांना कोरोना साथीच्या आजारापासून बचाव करण्यासाठी सरकारने जारी केलेल्या मार्गदर्शक सूचनांचे पालन करावे लागेल. सर्व परीक्षार्थींना मास्क घालणं अनिवार्य असणार आहे. त्याचबरोबर जारी केलेल्या सूचनांनुसार सुरक्षित अंतर देखील पाळावे लागणार आहे.

व्हॅकन्सी डिटेल्स

सप्टेंबर 2020 मध्ये स्टाफ सिलेक्शन कमिसनने दिल्ली पोलिसांत कॉन्स्टेबलच्या 5846 पदांसाठी रिक्त जागांसाठी भरतीची घोषणा केली.यामध्ये पुरुष कॉन्स्टेबलसाठी एकूण 3902 आणि महिला उमेदवारांच्या 1934 रिक्त पदांचा समावेश आहे. भरतीसाठी लेखी परीक्षा 27 नोव्हेंबर ते 14 डिसेंबर दरम्यान घेण्यात आली. परीक्षेसाठी 28,77,35 अर्ज प्राप्त झाले.

(SSC Delhi Police Recruitment 2021 PET And PMT Exam Date Announced)

हे ही वाचा :

बँकेमध्ये नोकरी मिळवण्याची संधी, 57 हजार मिळू शकतो पगार, असा करा अर्ज…

Job News: न्यूक्लिअर पॉवर कॉर्पोरेशनमध्ये अ‍ॅप्रेंटिसशिपची संधी

Indian Navy Recruitment 2021: भारतीय नौदलात SSC अधिकारी पदावर संधी, पगार 1 लाख 10 हजारांपर्यंत, असा अर्ज करा…

Read Full Article

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI