SSC GD Constable 2021: एसएससी जीडी कॉन्स्टेबल 25 हजार जागांवर भरती, 31 ऑगस्टपर्यंत नोंदणींची संधी, वाचा सविस्तर

एसएससी जीडी भरतीसाठी ऑफिशियल वेबसाईट ssc.nic.in वर रजिस्ट्रेशन करण्यासाठी अखेरचे काही दिवस शिल्लक राहिले आहेत.

SSC GD Constable 2021: एसएससी जीडी कॉन्स्टेबल 25 हजार जागांवर भरती, 31 ऑगस्टपर्यंत नोंदणींची संधी, वाचा सविस्तर
प्रातिनिधिक फोटो

SSC GD Constable 2021नवी दिल्ली:  स्टाफ सिलेक्शन कमिशन (SSC) ने CAPF मधील कॉन्स्टेबल (जनरल ड्यूटी किंवा जीडी), SSF आणि आसाम रायफल्स मध्ये रायफलमन या पदांसाठी अर्ज करण्यासाठी अखेरचे तीन दिवस शिल्लक आहेत. एसएससीनं जीडी कॉन्स्टेबल भरतीसाठी नोटिफिकेशन 17 जुलै रोजी जारी केलं होतं. एकूण 25 हजार पदांवर भरती प्रक्रिया राबवण्यात येत आहे.

एकूण किती पदांवर भरती

स्टाफ सिलेक्शन कमिशननं यावेळी 25271 पदांसाठी अर्ज मागवले आहेत. भरती प्रक्रियेत पुरुष उमेदवारांसाठी 22424 जागा आहेत तर, महिला सांठी 2847 पद आहेत. इच्छुक आणि योग्य उमेदवार ऑफिशियल वेबसाईट ssc.nic.in वर जाऊन ऑनलाईन अर्ज दाखल करु शकतात. अर्ज दाखल करण्याची अखेरची तारीख 31 ऑगस्ट 2021 ही आहे. तर, अर्जाचं शुल्क ऑनलाईन जमा करण्याची अखेरची मुदत 2 सप्टेंबर तर चलनाद्वारे सादर करण्याची अखेरची मुदत 7 सप्टेंबरपर्यंत आहे.

महत्वपूर्ण तारखा

अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया सुरु होण्याची तारीख – 17 जुलै
ऑनलाईन अर्ज दाखल करण्याची अखेरची तारीख- 31 ऑगस्ट (रात्री 11.30 वाजेपर्यंत)
ऑनलाईन फी जमा करण्याची अखेरची तारीख – 2 सप्टेंबर (रात्री 11.30 वाजता)
ऑफलाईन चलन जनरेट करण्याची अखेरची तारीख- 4 सप्टेंबर (रात्री 11.30 वाजता)
चलनाद्वारे फी जमा करण्याची अखेरची तारीख – 7 सप्टेंबर
टियर – 1 परीक्षा (सीबीटी) चे तारीख- नंतर कळवली जाणार आहे

विभागनिहाय पदसंख्या

बीएसएफ: 7545
सीआयएसएफ : 8464
एसएसबी : 3806
आयटीबीपी :1431
आसाम रायफल्स: 3785
एसएसएफ: 240
यावेळी सीआरपीएफ आणि एनआयएमध्ये कोणत्याही जागा निघालेल्या नाहीत.

पात्रता

स्टाफ सिलेक्शन कमिशनच्या सीएपीएफ जीडी कॉन्स्टेबल पदासाठी अर्ज करणारे उमेदवार 10 वी उत्तीर्ण असणं आवश्यक आहे.

वयोमर्यादा

ज्या उमेदवारांचं वय 18 ते 23 वर्षांच्या दरम्यान असेल ते अर्ज दाखल करु शकतात.

शारीरिक पात्रता

उंची
पुरुष उमेदवार – 170 सेमी.
महिला उमेदवार – 157 सेमी.

छाती
पुरुष उमेदवार – 80 सेमी. (फुगवून – 85 सेमी)

पगार

उमेदवारांची निवड झाल्यानंतर त्यांना पे लेवल -3 च्या प्रमाणे 21700-69100 रुपये पगार मिळणार आहेत.

अर्ज कुठे सादर करायचा?

स्टाफ सिलेक्शन कमिशनची ऑफिशियल वेबसाईट ssc.nic.in वर जाऊन ऑनलाईन अर्ज दाखल करु शकतात

इतर बातम्या

SBI Recruitment 2021 : स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये नोकरीची उत्तम संधी, आजच करा अर्ज, जाणून घ्या संपूर्ण प्रक्रिया

अहमदनगर येथील सैन्यभरतीसंदर्भात महत्वाची अपडेट; सप्टेंबरमधील भरती लांबणीवर, नेमकं कारण काय?

SSC GD Constable 2021 last date near for apply 25271 post online at ssc.nic.in check all details here

Read Full Article

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI