AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

SSC results 2022: लै अवघडाय! दहावी निकालात 122 मुलांना शंभर टक्के, 29 “शाळांना” शून्य टक्के! असं कसं झालं?

SSC results 2022 Maharashtra board 10th result: या सगळ्याला जबाबदार कोण? कोरोना महामारी? त्या 29 शाळा? पालक कि स्वतः विद्यार्थी?? हे खरे प्रश्न आहेत. निकाल चांगला लागला या नावाखाली शून्य टक्के निकाल लागलेल्या शाळांची संख्या ही दुर्लक्षित करण्यासारखी नाही कारण तो आकडा मोठा आहे. आता 29 शाळा नेमक्या कोणत्या आहेत?

SSC results 2022: लै अवघडाय! दहावी निकालात 122 मुलांना शंभर टक्के, 29 शाळांना शून्य टक्के! असं कसं झालं?
लै अवघडाय! दहावी निकालात 29 शाळांना शून्य टक्केImage Credit source: TV9 marathi
| Edited By: | Updated on: Jun 17, 2022 | 10:51 PM
Share

पुणे: दहावीचा निकाल (SSC Results 2022) लागलेला आहे. राज्याचा निकाल 96 टक्क्यापेक्षा जास्त लागलाय. राज्यातल्या तब्बल 122 विद्यार्थ्यांना 100 टक्के गुण मिळालेले आहेत. कोविड महारामारीत सगळं जग असताना सुद्धा इतक्या मुलांना 100 टक्के गुण मिळणं खरं तर शिक्षण विभागासह, राज्यासाठी अभिमानाची बाब आहे.पण यातच आनंद आहे का? खरी चिंता आहे ती त्या शाळांची ज्या शाळांचा शून्य टक्के निकाल लागलेला आहे. शून्य टक्के निकाल लागणं आणि अशा शाळांची संख्या एकूण 29 असणं ही फारच चिंतेची बाब आहे. शून्य टक्के निकाल (SSC Zero Percent Result) म्हणजे इतक्या सगळ्या शाळांमध्ये एकही विद्यार्थी पास न होणे. या सगळ्याला जबाबदार कोण? कोरोना महामारी? त्या 29 शाळा? पालक कि स्वतः विद्यार्थी?? हे खरे प्रश्न आहेत. निकाल चांगला लागला या नावाखाली शून्य टक्के निकाल लागलेल्या शाळांची संख्या ही दुर्लक्षित करण्यासारखी नाही कारण तो आकडा मोठा आहे. आता 29 शाळा नेमक्या कोणत्या आहेत? कोणत्या विभागातील आहे? या शाळेतून दहावीला किती विद्यार्थी बसलेले होते? याची कोणतीही माहिती समोर येऊ शकलेली नाही मात्र ही बाब गांभीर्याने घ्यायची गरज आहे. कोरोनातून (Corona) सगळं जग हळू हळू बाहेर पडत असताना विद्याथ्यांचं शिक्षणही पूर्वपदावर आणणं गरजेचं आहे.

यंदा दहावीचा निकाल 96.94 टक्के

यंदा दहावीचा निकाल 96.94 टक्के लागलेला आहे. कोकण विभागाचा निकाल सर्वाधिक 99.27 टक्के, तर सर्वात कमी निकाल नाशिक विभागाचा 95.90 टक्के लागेलेला आहे. कोविडमुळे 75 टक्के अभ्यासक्रमावर परीक्षा घेण्यात आली. यूपीएससी, बारावी आणि आता दहावी! दहावीच्या परीक्षेत सुद्धा मुलींनीच बाजी मारलेली आहे. राज्यातील 22 हजार 921 शाळांमधून 16 लाख 38 हजार 946 विद्यार्थ्यांनी नोंदणी केली, त्यापैकी 12 हजार 210 शाळांचा निकाल 100 टक्के लागलाय. त्याचबरोबर राज्यातील नऊ विभागीय मंडळामधून 8 हजार 169 दिव्यांग विद्यार्थ्यांची नोंदणी झाली होती. त्यापैकी 8 हजार 29 दिव्यांग विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली, तर 7 हजार 579 दिव्यांग विद्यार्थी उत्तीर्ण झालेले आहेत.

विभागवार निकाल

  1. पुणे 96.96
  2. नागपूर 97.00
  3. औरंगाबाद 96.33
  4. मुबंई 96.94
  5. कोल्हापूर 98.50
  6. अमरावती 96.81
  7. नाशिक 95.90
  8. लातूर 97.27
  9. कोकण 99.27

इथे पहा निकाल

तपासा दहावीचा निकाल

https://www.tv9marathi.com/board-result-registration-for-result-marksheet-10th

वाचा दहावीच्या निकालाचे ताजे आणि वेगवान अपडेट्स

https://www.tv9marathi.com/career/ssc-result-2022-maharashtra-board-nikal-live-updates-check-msbshse-board-class-10th-exam-results-news-online-at-mahresult-nic-in-dahavi-toppers-paas-percentage-news-today-au136-736831.html

खचून न जाता पुन्हा जोमाने कामाला लागा

दरम्यान या सगळ्या घडामोडीत एक अत्यंत महत्त्वाची बातमी समोर येतीये. दहावीसह बारावीच्या पुरवणी परीक्षेची मोठी बातमी हाती येतीये. पुरवणी परीक्षेचं वेळापत्रक आलेलं आहे. बारावीची आणि दहावीची पुरवणी परीक्षा यासंदर्भातली ही बातमी आहे. बारावीची पुरवणी परीक्षा 21 जुलैपासून 12 ऑगस्ट पर्यंत होणार आहे. तर दहावीची पुरवणी परीक्षा 27 जुलै ते 12 ऑगस्ट दरम्यान होणार आहे. त्यामुळे खचून न जाता पुन्हा जोमाने कामाला लागा, पुन्हा अभ्यास करा आणि पास व्हा! तारखा मात्र लक्षात ठेवा.

बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो.
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं.
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!.
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.