ICAI CA Coaching 2021 : सीए इंटरमीडिएट आणि अंतिम वर्षाच्या विद्यार्थ्यांसाठी लाईव्ह कोचिंग सुरु, जाणून घ्या संपूर्ण तपशील

इन्स्टिट्युट ऑफ चार्टर्ड अकाउंटंट्स ऑफ इंडियातर्फे घेण्यात येणारे लाईव्ह क्लासेस दोन सत्रात आयोजित करण्यात आला आहे. (Start live coaching for CA Intermediate and final year students, know full details)

ICAI CA Coaching 2021 : सीए इंटरमीडिएट आणि अंतिम वर्षाच्या विद्यार्थ्यांसाठी लाईव्ह कोचिंग सुरु, जाणून घ्या संपूर्ण तपशील
सीए इंटरमीडिएट आणि अंतिम वर्षाच्या विद्यार्थ्यांसाठी लाईव्ह कोचिंग सुरु

ICAI CA Coaching 2021 नवी दिल्ली : इंस्टीट्युट ऑफ चार्टर्ड अकाऊंट्स ऑफ इंडिया (ICAI) ने कोरोना काळात विद्यार्थ्यांना दिलासा दिला आहे. आयसीएआयने आज म्हणजेच 10 मे 2021 पासून ऑनलाईन क्लासची सुरु केले आहेत. हे लाईव्ह कोचिंग (ICAI CA Live Classes) नोव्हेंबर 2021 परीक्षेमध्ये सहभागी होणाऱ्या सीए इंटरमीडिएट आणि अंतिम वर्षाच्या विद्यार्थ्यांसाठी आयोजित करण्यात आले आहेत. (Start live coaching for CA Intermediate and final year students, know full details)

दोन सत्रात चालतील वर्ग

इन्स्टिट्युट ऑफ चार्टर्ड अकाउंटंट्स ऑफ इंडियातर्फे घेण्यात येणारे लाईव्ह क्लासेस दोन सत्रात आयोजित करण्यात आला आहे. इंटरमीडिएट कोर्ससाठी प्रथम सत्राचे वर्ग सकाळी 7 ते सायंकाळी 9.30 या वेळेत तर द्वितीय सत्राचे वर्ग सायंकाळी 6 ते 8.30 या वेळेत घेण्यात येतील. त्याचबरोबर अंतिम वर्षाच्या अभ्यासक्रमाच्या पहिल्या सत्राचे वर्ग सकाळी 7 ते रात्री 10 या वेळेत आणि दुसऱ्या सत्राचे वर्ग संध्याकाळी 6 ते रात्री 9 या वेळेत घेण्यात येत आहेत. हे वर्ग 10 मे ते 31 मे 2021 या कालावधीत घेण्यात येतील.

परीक्षा पुढे ढकलल्या

कोरोना संकटाच्या पार्श्वभूमीवर, आयसीएआयने 21 आणि 22 मे रोजी होणारी अंतिम वर्षाची आणि इंटरमिजिएट अभ्यासक्रमाची सीए मे परीक्षा 2021 स्थगित केली होती. या संदर्भात 27 एप्रिल 2021 रोजी अधिकृत संकेतस्थळावर नोटीस बजावण्यात आली. या नोटीसमध्ये सांगण्यात आले होते की परीक्षेच्या नवीन तारखांची घोषणा किमान 25 दिवस अगोदर होईल. यासाठी वेबसाईटवर लक्ष ठेवण्याचा सल्ला देण्यात आला आहे. (Start live coaching for CA Intermediate and final year students, know full details)

इतर बातम्या

Gold Rate Today: अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला सोने-चांदी खरेदीची उत्तम संधी, झटपट पाहा 10 ग्रॅम सोन्याचा भाव

राजीव गांधींचा मध्यरात्री फोन आला अन् राजकारणात आलो; पृथ्वीबाबांचा हा किस्सा माहीत हवाच!

Read Full Article

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI