
नोकरीच्या शोधात असणाऱ्यांसाठी एक मोठी संधी असून भरतीला सुरूवात झालीये. विशेष म्हणजे ही मोठी संधी नक्कीच आहे. इंडियन कंपनी सेक्रेटरीज इन्स्टिट्यूट (ICSI) ने सेंट्रल प्रोसेसिंग सेंटरसाठी ही भरती प्रक्रिया सुरू केलीये. कार्यकारी पदासाठी ही भरती सुरू आहे. विशेष म्हणजे कोणत्याही कानाकोपऱ्यात बसूनही तुम्ही या भरती प्रक्रियेसाठी आरामात अर्ज करू शकता. icsi.edu या साईटवर जाऊन आपण अर्ज करू शकता. नोकरीच्या शोधात असणाऱ्यांसाठी मोठी सुवर्णसंधी आहे. चला तर मग जाणून घ्या या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करण्याची सोप्री प्रक्रिया.
सेंट्रल प्रोसेसिंग सेंटरमध्ये नोकरी करण्याची एक संधी तुमच्याकडे नक्कीच आहे. या भरती प्रक्रियेची अधिसूचना प्रसिद्ध करण्यात आलीये. विशेष म्हणजे ही भरती प्रक्रिया 15 पदांसाठी होत आहे. या भरती प्रक्रियेसाठी वयाची अट ही लागू करण्यात आलीये. 31 वयोगटापर्यंतचे उमेदवार हे आरामात या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करू शकतात.
या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करण्यासाठी आता अवघे काही दिवसच शिल्लक राहिले आहेत. 10 जून 2024 ही या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे. त्यापूर्वीच आपल्याला भरती प्रक्रियेसाठी अर्ज ही करावी लागणार आहेत. उमेदवारांनी अगोदर अभिसूचना व्यवस्थित वाचून घ्यावी आणि मगच अर्ज करावीत.
भरती प्रक्रियेची सविस्तर माहिती ही तुम्हाला icsi.edu या साईटवर मिळेल. हेच नाही तर रेल्वे विभागाकडून देखील भरती प्रक्रिया राबवली जातंय. काही दिवसांपूर्वीच या भरती प्रक्रियेची जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलीये. मुंबई रेल्वे विकास कॉर्पोरेशनकडून ही भरती राबवली जात आहे. वयाची आणि शिक्षणाची अट लागू करण्यात आलीये.
मुंबई रेल्वे विकास कॉर्पोरेशन लिमिटेडकडून राबवल्या जाणाऱ्या भरती प्रक्रियेसाठी देखील आपल्याला ऑनलाईन पद्धतीने अर्ज ही करावी लागणार आहेत. 19 जून 2024 ही भरतीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे. managerhr@mrvc.gov.in. या ईमेलवर उमेदवाराना भरतीसाठी अर्ज ही करावी लागणार आहेत.