AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

UPSC Mains Result 2020: जामिया मिलिया इस्लामिया विद्यापीठातील 34 विद्यार्थी UPSC नागरी सेवा मुख्य परीक्षेत उत्तीर्ण

जामिया मिलिया इस्लामिया विद्यापीठातील रेसिडेंशियल कोचिंग अ‌कॅडमीचे 34 विद्यार्थी मुख्य परीक्षेत उत्तीर्ण झाले आहेत. Jamia Millia Islamia's Residential Coaching Academy

UPSC Mains Result 2020: जामिया मिलिया इस्लामिया विद्यापीठातील 34 विद्यार्थी UPSC नागरी सेवा मुख्य परीक्षेत उत्तीर्ण
यूपीएससीच्या परीक्षेत मराठी विद्यार्थ्यांचे यश
Yuvraj Jadhav
Yuvraj Jadhav | Updated on: Mar 24, 2021 | 10:51 AM
Share

नवी दिल्ली: केंद्रीय लोकसेवा आयोगानं मंगळवारी नागरी सेवा मुख्य परीक्षा 2020 चा निकाल जाहीर केला आहे. यामध्ये गतवर्षी चर्चेत आलेल्या जामिया मिलिया इस्लामिया विद्यापीठातील रेसिडेंशियल कोचिंग अ‌कॅडमीचे 34 विद्यार्थी मुख्य परीक्षेत उत्तीर्ण झाले आहेत. या विद्यार्थ्यांची आता नागरी सेवा परीक्षा 2020 च्या मुलाखतीसाठी निवड झाली आहे. केंद्रीय लोकसेवा आयोगाकडून भारतीय प्रशासकीय सेवा, भारतीय परकीय सेवा, भारतीय पोलीस सेवा आणि इतर केंद्रीय सेवांसाठी मुलाखत प्रक्रिया राबवेल. (Thirty four Students of Jamia Millia Islamia’s Residential Coaching Academy have cleared UPSC CSE Main 2020)

पुढील तयारी काय?

रेसिडेंशियल कोचिंग अकॅडमीतर्फे विद्यार्थ्यांकडून मुलाखतीची तयारी करुन घेण्यासाठी मुलाखतीची रंगीत तालीम घेण्यात येणार आहे. यासोबतच काही चर्चात्मक सत्रांचे आयोजन केले झाणार आहे. वरिष्ठ आणि सेवानिवृत्त अधिकाऱ्यांकडून विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यात येणार आहे.

रेसिडेंशियल कोचिंग अकॅडमीमधील सुविधा

केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या नागरी सेवा मुख्य परीक्षा 2020 मध्ये उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना जामिया मिलिया इस्लामिया विद्यापीठातील रेसिडेंशियल कोचिंग अकॅडमीमध्ये विविध सुविधा उपलब्ध करुन दिल्या जातात. यामध्ये सराव परीक्षा, ग्रंथालय, विशेष व्याख्यान आणि मुलाखतीची तयारी करुन घेतली जातेय.

गतवर्षी 30 विद्यार्थ्यांची निवड

जामिया मिलिया इस्लामिया विद्यापीठातील रेसिडेंशियल कोचिंग अकॅडमीचे 30 विद्यार्थी गेल्या वर्षाीच्या नागरी सेवा परीक्षेत उत्तीर्ण झाले होते. याशिवाय अकॅडमीचे 35 विद्यार्थी विविध राज्यांच्या लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत उत्तीर्ण झाले आहेत. जम्मू काश्मीर, बिहार, उत्तर प्रदेश, महाराष्ट्र, कर्नाटक राज्यांमध्ये विद्यार्थ्यांनी यश मिळवले आहे. आयबी, सीएपीएफ, आरबीआय आणि इतर राज्यांच्या परीक्षेत रेसिडेंशियल कोचिंग अकॅडमीच्या विद्यार्थ्यांनी यश मिळवलं आहे.

मुलाखतीसाठी लवकरच कळवले जाणार

आज नागरी सेवा मुख्य परीक्षा 2020 चा निकाल लागला असला तरी केंद्रीय लोकसेवा आयोगाने उत्तीर्ण उमेदवारांच्या मुलाखती कधी होणार याबद्दल सांगितलेले नाही. उमेदवारांच्या मुलाखती या लोकसेवा आयोगाच्या दिल्ली येथील मुख्यालयात होणार असून त्यासाठी लवकरच उमेदवारांना कळवले जाईल. त्यासाठी www.upsc.gov.in किंवा www.upsconline.in या वेबसाईट्ववर e-Summon Letter उपलब्ध करुन दिले जाईल. त्यानंतर मुख्य परीक्षेत उत्तीर्ण झालेले उमेदवार e-Summon Letter डाऊनलोड करु शकतील.

नागरी सेवा मुख्य परीक्षेचा निकाल कसा पाहावा?

>>> सर्वात आधी upsc.gov.in या अधिकृत संकेतस्थळाला भेट द्या.

>>> होमपेजवर गेल्यानंतर Written Results या ऑप्शनवर क्लिक करा

>>> त्यानंतर Examination Written Result या ऑप्शनवर क्लिक करा

>>> त्यानंतर Civil Services (Main) Examination, 2020 या ऑप्सशनवर क्लिक करा, त्यानंतर उमेदवारांना त्यांचा निकाल दिसेल.

संबंधित बातम्या:

UPSC CSE Main 2020 Result : नागरी सेवा मुख्य परीक्षेचा रिझल्ट जाहीर, upsc gov in या वेबसाईटवर पाहा निकाल

MPSC:राज्यसेवा पूर्व परीक्षेला थोड्याच वेळात सुरुवात, विद्यार्थ्यांसह आयोगाचीही परीक्षा

(Thirty four Students of Jamia Millia Islamia’s Residential Coaching Academy have cleared UPSC CSE Main 2020)

Follow Us
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान असं का म्हणाले?
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात शिंदेंचं...
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस- अवधूत गुप्ते
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस... दहीहंडी कार्यक्रमानिमित्त अवधूत गुप्तेंचं भावनिक वक्तव्य;
प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावत...
Mallika SherawAt Magathane Dahihandi | प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावतची हजेरी
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ;
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ; मुंबईतील ही दहीहंडी चर्चेत
हम दो हमारे दो और इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं...
Gulabrao Patil : 'हम दो हमारे दो और... इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं वक्तव्य तुफान चर्चेत
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला;
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला; प्रेक्षकांचं मन जिंकणाऱ्या संवादाची सर्वत्र चर्चा
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची...
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची समिती...
दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर...
MNS Avinash Jadhav Dahi Handi 2026 : दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई, थेट 1,322 कोटी...