UPSC CSE Main 2020 Result : नागरी सेवा मुख्य परीक्षेचा रिझल्ट जाहीर, upsc gov in या वेबसाईटवर पाहा निकाल

अत्यंत प्रतिष्ठेच्या समजल्या जाणाऱ्या नागरी सेवेच्या मुख्य परीक्षा 2020 चा निकाल नुकताच जाहीर झाला आहे. (upsc mains 2020 result declared)

UPSC CSE Main 2020 Result : नागरी सेवा मुख्य परीक्षेचा रिझल्ट जाहीर, upsc gov in या वेबसाईटवर पाहा निकाल
यूपीएससीच्या परीक्षेत मराठी विद्यार्थ्यांचे यश

मुंबई :  अत्यंत प्रतिष्ठेच्या समजल्या जाणाऱ्या नागरी सेवेच्या मुख्य परीक्षा 2020 चा (UPSC CSE Main 2020 result) निकाल नुकताच जाहीर झाला आहे. 8 जानेवारी 2021 ते 17 जानेवारी 2021 या कालावधित केंद्रीय लोकसेवा आोयगाकडून या परीक्षा घेण्यात आल्या होत्या. या परीक्षेचा निकाल केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या (UPSC) संकेतस्थळावर उपलब्ध असून उमेदवारांना त्यांच्या रोल नंबरद्वारे www.upsc.gov.in या वेबसाईटवर निकाल पाहता येतील. (UPSC CSE mains 2020 result declared checkout all process how to find result)

आपला निकाल पाहण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

केंद्रीया लोकसेवा आयोगाने दिनांक 8 जानेवरी ते 17 जानेवारी 2021 या कालावधित नागरी सेवा मुख्य परीक्षा 2020 घेतली होती. या परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या तसेच मुलाखतीसाठी पात्र ठरलेल्या उमेदवारांची यादी केंद्रीय लोकसेवा आयोगाने आपल्या ऑफिशियल वेबसाईटवर दिली आहे. तसेच यशस्वी उमेदवारांना त्यांच्या मुलाखतीविषयी लवकरच कळवले जाईल, असेही लोकसेवा आयोगाने सांगितले आहे.

मुलाखतीसाठी लवकरच कळवले जाणार

आज नागरी सेवा मुख्य परीक्षा 2020 चा निकाल लागला असला तरी केंद्रीय लोकसेवा आयोगाने उत्तीर्ण उमेदवारांच्या मुलाखती कधी होणार याबद्दल सांगितलेले नाही. उमेदवारांच्या मुलाखती या लोकसेवा आयोगाच्या दिल्ली येथील मुख्यालयात होणार असून त्यासाठी लवकरच उमेदवारांना कळवले जाईल. त्यासाठी www.upsc.gov.in किंवा www.upsconline.in या वेबसाईट्ववर e-Summon Letter उपलब्ध करुन दिले जाईल. त्यानंतर मुख्य परीक्षेत उत्तीर्ण झालेले उमेदवार e-Summon Letter डाऊनलोड करु शकतील.

नागरी सेवेचा निकाल कसा पाहावा?

 

>>> सर्वात आधी upsc.gov.in या अधिकृत संकेतस्थळाला भेट द्या.

>>> होमपेजवर गेल्यानंतर Written Results या ऑप्शनवर क्लिक करा

>>> त्यानंतर Examination Written Result या ऑप्शनवर क्लिक करा

>>> त्यानंतर Civil Services (Main) Examination, 2020 या ऑप्सशनवर क्लिक करा, त्यानंतर उमेदवारांना त्यांचा निकाल दिसेल.

 

दरम्यान, राज्यातील तसेच देशातील अनेक उमेदार नागरी सेवे मुख्य परीक्षेच्या निकालाची वाट पाहत होते. या पार्श्वभूमीवर उमेदवारांकडून आनंद व्यक्त केला जातोय.

इतर बातम्या :

UPSC Civil Service 2020 उमेदवारांना आणखी एक संधी नाहीच, सुप्रीम कोर्टाने याचिका फेटाळली!

UPSC CSE mains 2020 result declared checkout all process how to find result)

 

Read Full Article

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI