AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

अखेर ‘त्या’ माथेफिरूला अटक, AC Local वर दगड मारून केली होती नासधूस , एक जखमी

मध्य रेल्वेच्या ठाकुर्ली- डोंबिवली स्थानकादरम्यान एसी लोकलवर दगडफेक करण्यात आल्याने सर्वच हादरले. यामध्ये लोकलच्या एका काचेचे नुकसान तर झालेच पण एक महिलाही जखमी झाली. याप्रकरणी एका माथेफिरुला अटक करण्यात आली आहे.

अखेर 'त्या' माथेफिरूला अटक, AC Local वर दगड मारून केली होती नासधूस , एक जखमी
| Updated on: Nov 10, 2023 | 9:52 AM
Share

सुनील जाधव, टीव्ही9 मराठी प्रतिनिधी, डोंबिवली | 10 नोव्हेंबर 2023 : घामाच्या धारा वाहणाऱ्या मुंबईकरांना एसी लोकल सुरू झाल्यापासून जरा गारवा मिळू लागला. गेल्या काही दिवसांपासून मध्य रेल्वेच्या मुख्य मार्गावरील एसी लोकलची संख्याही वाढवण्यात आली होती. गारेगार प्रवासामुळे प्रवासीही सुखावले होते. मात्र याला अचानकच गालबोट लागलं ते एसी लोकलवर झालेल्या दगडफेकीमुळे. गुरूवारी सकाळच्या सुमारास मध्य रेल्वेच्या मुख्य मार्गावर धावणाऱ्या एसी लोकलवर ठाकुर्ली ते डोंबिवली स्थानकादरम्यान दगडफेक करण्यात आली.

दगड लागून एसी लोकलच्या काचेचे तर नुकसान झालेच. . एसी लोकल धावत असताना अचानक जोरात दगड बसल्याने खिडकीच्या काचेला मोठा तडा गेला. पण या घटनेत एक महिलादेखील जखमी झाली. याप्रकरणी अखेर एका माथेफिरुला अटक करण्यात आली आहे. शरद गांगुर्डे असे या माथेफिरू तरुणाचे नाव आहे तो मूळचा चाळीसगाव येथे राहणारा आहे . पोलिस त्याची कसून चौकशी करत असून त्यानंतरच दगडफेकीचे कारण स्पष्ट होऊ शकेल.

वेगात जात होती लोकल आणि अचानक दगड भिरकावला…

नेहमीप्रमाणे गुरूवारी सकाळी टिटवाळा ते छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस पर्यंत एसी लोकल सुरू झाली. सकाळी नऊच्या सुमारास ठाकुर्ली ते डोंबिवली रेल्वे स्थानकादरम्यान लोकल आली असतानाच ठाकुर्लीजवळ बाजूच्या वस्तीमधून एक दगड एसी लोकलच्या खिडकीवर फेकण्यात आला. वेगात भिरकावल्याने दगड काच फोडून खिडकीजवळ बसलेल्या एका महिलेला लागला. त्यामध्ये ती किरकोळ जखमी झाली, पण अचानक दगड आल्याने तिला धक्का बसला.

या घटनेमुळे लोकलमधील प्रवाशांची चांगलीच तारांबळ उडाली. काहींनी याप्रकरणाची माहिती तातडीने रेल्वे प्रशासनाला ट्वीटरच्या माध्यमातून दिली. ही माहिती डोंबिवली लोहमार्ग, रेल्वे सुरक्षा बलाच्या जवानांनाही मिळाली. त्यानंतर पोलिसांनी तातडीने ठाकुर्ली रेल्वे स्थानक परिसरातील सीसीटीव्ही चित्रण तपासले. यावेळी काही गर्दुल्ले ठाकुर्ली जवळील वस्तीत रेल्वे मार्गालगत बसून दगडफेक करत असल्याचे आढळले. पोलिसांनी त्यांचा ठाकुर्ली रेल्वे स्थानक परिसरात शोध घेऊन त्यातील एकाला तत्काळ अटक केली. शरद गांगुर्डे असे या माथेफिरू तरुणाचे नाव आहे तो मूळचा चाळीसगाव येथे राहणार आहे . त्याने दगडफेक का केली हे चौकशीअंती स्पष्ट होणार आहे.

दरम्यान मध्य रेल्वेने अलीकडेच, म्हणजे 6 नोव्हेंबर पासून मुख्य मार्गावर 10 एसी लोकल वाढविल्या आहेत. त्यामुळे मध्य रेल्वेच्या एकूण एसी लोकलची संख्या आता 56 वरुन 66 इतकी झाली आहे.

भाजप पदाधिकाऱ्यांनी मनसे पदाधिकाऱ्याला जबर धुतलं; उरणमध्ये घडलं काय?
भाजप पदाधिकाऱ्यांनी मनसे पदाधिकाऱ्याला जबर धुतलं; उरणमध्ये घडलं काय?.
वलसाडच्या ‘हापूस’ नामांकनाला कोकणचा कडाडून विरोध थेट...
वलसाडच्या ‘हापूस’ नामांकनाला कोकणचा कडाडून विरोध थेट....
BMC इज नॉट फॅमिली बिझनेस... भाजप नेत्याचा उद्धव ठाकरे यांना खोचक टोला
BMC इज नॉट फॅमिली बिझनेस... भाजप नेत्याचा उद्धव ठाकरे यांना खोचक टोला.
चुनाभट्टी येथे चैत्यभूमीकडे जाणाऱ्या आंबेडकर अनुयायांचा रास्ता रोको
चुनाभट्टी येथे चैत्यभूमीकडे जाणाऱ्या आंबेडकर अनुयायांचा रास्ता रोको.
तिन्ही पक्षाचा मालिक एक, अ‍ॅनाकोंडा गिळल्याशिवाय... ठाकरेंचा निशाणा
तिन्ही पक्षाचा मालिक एक, अ‍ॅनाकोंडा गिळल्याशिवाय... ठाकरेंचा निशाणा.
अमित ठाकरे यांच्या मेहुण्याच्या दिल्लीत विवाह, मोदींची सोहळ्याला हजेरी
अमित ठाकरे यांच्या मेहुण्याच्या दिल्लीत विवाह, मोदींची सोहळ्याला हजेरी.
जसं पार्थ पवारांना माफ केलं तसं तपोवनातील झाडांना...मनसेकडून थेट इशारा
जसं पार्थ पवारांना माफ केलं तसं तपोवनातील झाडांना...मनसेकडून थेट इशारा.
मालवणमध्ये फिरायला जाताय? सिंधुदुर्गात जाणाऱ्या जेटीची अवस्था बघा!
मालवणमध्ये फिरायला जाताय? सिंधुदुर्गात जाणाऱ्या जेटीची अवस्था बघा!.
नटरंगी नार.... रुपाली ठोंबरेंचा रोख कुणावर? कोणाचा घेतला खरपूस समाचार?
नटरंगी नार.... रुपाली ठोंबरेंचा रोख कुणावर? कोणाचा घेतला खरपूस समाचार?.
फडणवीसांचा दरिंदा, जल्लाद अन् गजनी उल्लेख, काँग्रेस नेता पुन्हा बरळला
फडणवीसांचा दरिंदा, जल्लाद अन् गजनी उल्लेख, काँग्रेस नेता पुन्हा बरळला.