AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

दीड महिन्यापूर्वी चावला कुत्रा, पण भीतीमुळे तोंड उघडलं नाही… अखेर 14 वर्षांच्या मुलाचा दुर्दैवी अंत

शेजाऱ्याचा कुत्रा मुलाला चावला, मात्र त्याने भीतीपायी कोणालाच काही सांगितलं नाही. या घटनेला काही दिवस उलटल्यानंतर त्याच्या शरीरात वेगवेगळी लक्षणं दिसू लागली. अनेक डॉक्टरांनी उपचारही केली मात्र...

दीड महिन्यापूर्वी चावला कुत्रा, पण भीतीमुळे तोंड उघडलं नाही... अखेर 14 वर्षांच्या मुलाचा दुर्दैवी अंत
| Updated on: Sep 06, 2023 | 12:18 PM
Share

गाझियाबाद | 6 सप्टेंबर 2023 : भटक्या कुत्र्यांचा उपद्रव खूप वाढला आहे. रात्री -अपरात्री भुंकणे, रस्त्यावरून येणाऱ्या जाणाऱ्यांचा पाठलाग करणे अशा अनेक घटना वाढत आहे. काही ठिकाणी तर भटक्या कुत्र्यांनी लोकांना चावल्याने (dog bite) ते गंभीररित्या जखमी झाले. मात्र प्राणीप्रेमी काही त्यांना आळा घालू देत नाहीत, त्यांचा बंदोबस्त करू देत नाहीत. कुत्र्यांमुळे एका निरागस, निष्पाप मुलाला जीव (boy died) गमवावा लागल्याची दुर्दैवी घटना उत्तर प्रदेशच्या गाझियाबादमध्ये घडली आहे. अवघ्या 14 वर्षांच्या मुलाला कुत्रा चावला आणि त्याला अतिशय वेदनादायक मृत्यू आला.

धक्कादायक गोष्ट म्हणजे, त्या मुलाला सुमारे दीड महिन्यापूर्वी कुत्रा चावला होता. मात्र भीतीमुळे त्याने कोणालाच, अगदी आई-वडिलांनाही ही गोष्ट सांगितली नाही. त्याची परिस्थिती प्रचंड बिघडल्यानंतर सत्य समोर आलं. रेबिज झाल्यामुळे त्याची तब्येत खूप खालावली, उपचारांसाठी आई-वडील ठिकठिकाणी भटकले. पण त्याचा काहीच फायदा झाला नाही अन् शेवटी त्या 14 वर्षांच्या मुलाने अखेरचा श्वास घेतला.

गाझियाबादच्या विजयनगर पोलीस स्टेशन हद्दीतील चरणसिंग कॉलनीतील ही दुर्दैवी घटना घडली. तेथे सोमवारी 14 वर्षीय मुलाचा मृत्यू झाला. मिळालेल्या माहितीनुसार, दीड महिन्यापूर्वी शेजारच्यांचा पाळीव कुत्रा त्या मुलाला चावला होता. मात्र त्याने घरच्यांना याबाबत काहीच सांगितले नाही. अखेर काही दिवसांनी त्याला त्रास होऊ लागला, त्याचं वागणं बदललं, तो सतत आजारी पडू लागला, तेव्हा त्याच्या कुटुंबियांना हा प्रकार कळला.

अनेक रुग्णालयांतून आले माघारी

खरंतर , त्या मुलाला रेबिज झाला होता, ज्यामुळे त्याचं वागणं बदललं होतं. 1 सप्टेंबर पासूनच त्याने खाणं-पिणं सोडलं होतं अखेर त्याचे आई-वडील त्याला डॉक्टरांकडे घेऊन गेले. कुटुंबियांनी त्याला गाझियाबाद, दिल्ली आणि आसपासच्या अनेक रुग्णालयांमध्ये उपचारांसाठी नेलं, पण त्याचा काहीच फायदा झाला नाही. अखेर त्याला बुलंदशहर येथे एका डॉक्टरकडे नेण्यात आलं. मात्र अँब्युलन्समध्ये असतानाच दुर्दैवाने त्याचा अंत झाला. त्यामुळे कुटुंबियांवर शोककळा पसरली आहे. या प्रकरणी पोलिसांनी कुत्र्याच्या मालकाविरुद्धही तक्रार नोंदवली आहे.

फडणवीसांचा दरिंदा, जल्लाद अन् गजनी उल्लेख, काँग्रेस नेता पुन्हा बरळला
फडणवीसांचा दरिंदा, जल्लाद अन् गजनी उल्लेख, काँग्रेस नेता पुन्हा बरळला.
इंदू मिल स्मारकाबाबत CM फडणवीसांची मोठी घोषणा, थेट सांगितली डेडलाईन
इंदू मिल स्मारकाबाबत CM फडणवीसांची मोठी घोषणा, थेट सांगितली डेडलाईन.
तपोवन वृक्षतोडीविरोधात मनसे नाशिककरांच्या सोबतीला, चित्रपट सेना आक्रमक
तपोवन वृक्षतोडीविरोधात मनसे नाशिककरांच्या सोबतीला, चित्रपट सेना आक्रमक.
फडणवीस सरकारच 1 वर्ष, मुख्यमंत्र्यांना किती मार्क? काय सांगतो सर्व्हे?
फडणवीस सरकारच 1 वर्ष, मुख्यमंत्र्यांना किती मार्क? काय सांगतो सर्व्हे?.
फोडाफोडीन नाराजी, वाक् युद्धानंतर आज शिंदे-रवींद्र चव्हाण एकाच मंचावर?
फोडाफोडीन नाराजी, वाक् युद्धानंतर आज शिंदे-रवींद्र चव्हाण एकाच मंचावर?.
फडणवीसांच्या इशाऱ्याने इतर पक्ष चालतात, कुणाच्या वक्तव्याची होते चर्चा
फडणवीसांच्या इशाऱ्याने इतर पक्ष चालतात, कुणाच्या वक्तव्याची होते चर्चा.
CM सह शिंदे दादांची महत्त्वाची बैठक; पक्षांतर्गत प्रवेशबंदीवर तोडगा?
CM सह शिंदे दादांची महत्त्वाची बैठक; पक्षांतर्गत प्रवेशबंदीवर तोडगा?.
इंडिगोच्या विस्कळीत सेवेविरोधात प्रवाशांना मनस्ताप, थेट कोर्टात याचिका
इंडिगोच्या विस्कळीत सेवेविरोधात प्रवाशांना मनस्ताप, थेट कोर्टात याचिका.
रूपाली ठोंबरेंकडून बाळासाहेब अन् पवारांसोबत फोटो शेअर, चर्चांना उधाण
रूपाली ठोंबरेंकडून बाळासाहेब अन् पवारांसोबत फोटो शेअर, चर्चांना उधाण.
मुंबईत भाजपच्या महापौरामुळं कॉलर टाईट होणार! लोढांचं मोठं वक्तव्य काय?
मुंबईत भाजपच्या महापौरामुळं कॉलर टाईट होणार! लोढांचं मोठं वक्तव्य काय?.