सोनाराला हाताशी धरले, खोटे सोने खरे दाखवले, बँकेची 74 लाखांमध्ये फसवणूक
Crime News: अनिल उरकुडे याने 2017 ते 2018 या कालावधीत 15 ग्राहकांच्या संगनमताने सुमारे 73.90 लाखाचे कर्ज घेण्यासाठी मदत केली आहे. या गुन्हामध्ये सोनारा सोबत 15 कर्जदार आरोपींवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Crime News: देशात फसवणुकीचे वेगवेगळे प्रकार होत असतात. बँकांची फसवणूक करण्यामध्ये उद्योगपतीपासून अनेक जण असतात. एका सहकारी बँकेची काही जणांनी 74 लाखांमध्ये फसवणूक केली आहे. ही फसवणूक बँकेला सोने देऊन केली आहे. खोटे सोने देऊन तब्बल 15 लोकांनी कर्ज घेतले. बँकेचा लक्षात हा प्रकार आल्यानंतर आता त्या पंधरा जणांवर आणि खोटे सोने खरे असल्याचे सांगणाऱ्या सोनारावर गुन्हा दाखल करण्यात आला. नागपूरमधील शिक्षक सहकारी बँकेमध्ये हा प्रकार घडला आहे.
नकली सोने खरे असल्याचे प्रमाणपत्र
प्रकरणात पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पाचपोली परिसरातील कमल चौकात शिक्षक सहकारी बँक आहे. लक्ष्मण सिंगम हे बँकेत व्यवस्थापक आहेत. आरोपी असलेला सोनार अनिल उरकुडे याला बँकेमध्ये आले सोने तपासणी करून प्रमाणपत्र देण्यासाठी नियुक्ती करण्यात आली होती. अनिल उरकुडे याने सोने अस्सल असल्याचे प्रमाणपत्र दिल्यानंतरच दागिने गहाण ठेवून ग्राहकांना बँकेतून कर्ज दिले जात होते.
या कालावधीत केली फसवणूक
आरोपी अनिल उरकुडे याने 2017 ते 2018 या कालावधीत 15 ग्राहकांच्या संगनमताने सुमारे 73.90 लाखाचे कर्ज घेण्यासाठी मदत केली आहे. या गुन्हामध्ये सोनारा सोबत 15 कर्जदार आरोपींवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या सोबत पोलीस सर्व आरोपीचा शोध घेत आहे. या प्रकारामुळे बँकेच्या सभासदांमध्ये खळबळ उडाली.




नागपुरातील पाचपवली परिसरातील शिक्षक सहकारी बँकेमध्ये फसवणुकीचा प्रकार घडला. बँकेने नेमलेला सोनार आणि ग्राहकांनी संगनमत करून बनावट दागिने खरे असल्याचे सांगून बँकेकडून 73.90 लाखांचे कर्ज मिळवून बँकेची फसवणूक केली. या प्रकरणी पाचपोली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. फसवणूक आरोपी हा बँकेच्या पॅनलवर असलेला सोनार अनिल उरकुडे आहे. दरम्यान, पोलिसांनी कर्ज बुडवणाऱ्या कर्जधारकांचा शोध सुरु आहे.