AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

वन बीएचकेच्या फ्लॅटमध्ये ‘काळेधंदे’, सेक्स रॅकेटचा पर्दाफाश, तिची सुटका, त्यांना अटक

पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, हे सेक्स रॅकेट एमआयडीसी कनकिया परिसरात असलेल्या इमारतीच्या वन बीएचके फ्लॅटमध्ये चालत होते.

वन बीएचकेच्या फ्लॅटमध्ये 'काळेधंदे', सेक्स रॅकेटचा पर्दाफाश, तिची सुटका, त्यांना अटक
जमिनीच्या वादातून भावाने भावाला संपवले
| Updated on: May 31, 2023 | 1:45 PM
Share

मुंबई : अंधेरी पूर्व एमआयडीसी पोलिसांनी मंगळवारी एका सेक्स रॅकेटचा पर्दाफाश केला. आणि 17 वर्षीय अल्पवयीन मुलीची (minor girl rescued) सुटका केली. अंधेरीतील एका निवासी इमारतीत एका फ्लॅटमध्ये 35 वर्षीय महिला हे सेक्स रॅकेट चालवत होती. पोलिसांना याची माहिती मिळताच त्यांनी कारवाई करत हे कृत्य करणारी महिला आणि एका ग्राहकाला अटक केली. तेथून एका अल्पवयीन मुलीची सुटकाही करण्यात आली.

पोलिस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, हे काळेधंदे एमआयडीसी कनकिया परिसरात असलेल्या एसआरए इमारतीच्या वन बीएचके फ्लॅटमध्ये सुरू होते.

या रॅकेटची माहिती मिळताच एनजीच्या मदतीने डीसीपी दत्ता नलावडे व वरिष्ठ निरीक्षक सतीश गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली एपीआय रोहित जाधव, शोभा खरात यांच्यासह पोलीस पथकाने बोगस ग्राहक पाठवला. त्यानंतर घरावर छापा टाकून एका १७ वर्षीय अल्पवयीन मुलीची सुटका केली. अशी माहिती पोलिस अधिकाऱ्यांनी दिली.

आरोपी महिला ही या फ्लॅटमध्ये गेल्या 6 महिन्यांपासून भाड्याने राहत होती आणि तेव्हापासून हे सेक्स रॅकेट चालवत असल्याचे तपासात समोर आल्याचे पोलिसांनी सांगितले. ती एका दिवसात फक्त एका महिलेला घेऊन जात असे आणि दिवसभर तिला घरात ठेवत असे, ज्याची आजूबाजूच्या लोकांना शंकाही आली नव्हती, असे पोलिसांनी नमूद केले.

सुटका करण्यात आलेल्या अल्पवयीन मुलीला रेस्क्यू सेंटरमध्ये पाठवले आहे आणि महिला आणि ग्राहकावर पॉक्सो कायद्यासह आयपीसीच्या विविध कलमांखाली गुन्हा दाखल केल्याचे पोलिस म्हणाले.

वलसाडच्या ‘हापूस’ नामांकनाला कोकणचा कडाडून विरोध थेट...
वलसाडच्या ‘हापूस’ नामांकनाला कोकणचा कडाडून विरोध थेट....
BMC इज नॉट फॅमिली बिझनेस... भाजप नेत्याचा उद्धव ठाकरे यांना खोचक टोला
BMC इज नॉट फॅमिली बिझनेस... भाजप नेत्याचा उद्धव ठाकरे यांना खोचक टोला.
चुनाभट्टी येथे चैत्यभूमीकडे जाणाऱ्या आंबेडकर अनुयायांचा रास्ता रोको
चुनाभट्टी येथे चैत्यभूमीकडे जाणाऱ्या आंबेडकर अनुयायांचा रास्ता रोको.
तिन्ही पक्षाचा मालिक एक, अ‍ॅनाकोंडा गिळल्याशिवाय... ठाकरेंचा निशाणा
तिन्ही पक्षाचा मालिक एक, अ‍ॅनाकोंडा गिळल्याशिवाय... ठाकरेंचा निशाणा.
अमित ठाकरे यांच्या मेहुण्याच्या दिल्लीत विवाह, मोदींची सोहळ्याला हजेरी
अमित ठाकरे यांच्या मेहुण्याच्या दिल्लीत विवाह, मोदींची सोहळ्याला हजेरी.
जसं पार्थ पवारांना माफ केलं तसं तपोवनातील झाडांना...मनसेकडून थेट इशारा
जसं पार्थ पवारांना माफ केलं तसं तपोवनातील झाडांना...मनसेकडून थेट इशारा.
मालवणमध्ये फिरायला जाताय? सिंधुदुर्गात जाणाऱ्या जेटीची अवस्था बघा!
मालवणमध्ये फिरायला जाताय? सिंधुदुर्गात जाणाऱ्या जेटीची अवस्था बघा!.
नटरंगी नार.... रुपाली ठोंबरेंचा रोख कुणावर? कोणाचा घेतला खरपूस समाचार?
नटरंगी नार.... रुपाली ठोंबरेंचा रोख कुणावर? कोणाचा घेतला खरपूस समाचार?.
फडणवीसांचा दरिंदा, जल्लाद अन् गजनी उल्लेख, काँग्रेस नेता पुन्हा बरळला
फडणवीसांचा दरिंदा, जल्लाद अन् गजनी उल्लेख, काँग्रेस नेता पुन्हा बरळला.
इंदू मिल स्मारकाबाबत CM फडणवीसांची मोठी घोषणा, थेट सांगितली डेडलाईन
इंदू मिल स्मारकाबाबत CM फडणवीसांची मोठी घोषणा, थेट सांगितली डेडलाईन.