AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Pune Crime : पेट्रोल पंपावर राडा ! रांग मोडून पेट्रोल भरायला गेले, तरूणाने रोखलं तर त्यालाच हाणलं…

पुणे शहरात गुन्हेगारांचा सुळसुळाट माजल्याचे दिसत आहे. रोजच्या रोज गुन्ह्यांच्या काही ना काही घटना समोर येतच असतात. त्यामुळे सामान्य नागरिक मात्र हैराण झाले असून त्यांचे प्राण कंठाशी येतात. शहरात नुकतीच घडलेली एक घटना याचेच एक ताजं उदाहरण आहे.

Pune Crime : पेट्रोल पंपावर राडा ! रांग मोडून पेट्रोल भरायला गेले, तरूणाने रोखलं तर त्यालाच हाणलं...
Image Credit source: प्रातिनिधिक फोटो
| Updated on: Aug 15, 2024 | 10:04 AM
Share

पुणे.. एकेकाळी या शहराची ओळख विद्येचं माहरेघर अशी होती. पण गेल्या काही कालावधील या शहराची ही ओळख पुसली गेली असून गुन्हेगारांचा सुळसुळाट माजल्याचे दिसत आहे. रोजच्या रोज गुन्ह्यांच्या काही ना काही घटना समोर येतच असतात. त्यामुळे सामान्य नागरिक मात्र हैराण झाले असून त्यांचे प्राण कंठाशी येतात. शहरात नुकतीच घडलेली एक घटना याचेच एक ताजं उदाहरण आहे. रांगेत उभं रहावं, हे बेसिक मॅनर्स आहेत, जे प्रत्येकाने पाळण्याची अपेक्षा असते. मात्र याच रांगेवरून वाद झाल्यानंतर दोन तरूणांनी एका तरूणाला जबर मारहाण केल्याचा प्रकार पुणे शहरात घडला आहे. “रांगेत न उभे राहता आधी मला पेट्रोल भरू दे” अशी धमकी देत त्या दोघांनी तरूणाला बेदम मारहाण केली. हडपसर भागात पेट्रोल पंपावर घडलेला हा प्रकार तेथील सीसीटीव्हीमध्ये कैद झाला असून त्यामुळे दहशतीचे वातावरण आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, पुणे शहरातील हडपसर भागात असणाऱ्या एका पंपावर ही घटना घडली. काल दुपारी पुण्यातील हडपसर भागातील एका पेट्रोल पंपावर एक तरुण त्याच्या दुचाकी मध्ये पेट्रोल भरण्यासाठी रांगेत उभा होता. मात्र त्याच वेळी दोन तरूण त्यांची बाईक घेऊन तेथे आले आणि त्यांनी त्या तरूणाच्या मागेत रांगेत उभं न राहत सरळ पुढे घुसल, “आधी मला पेट्रोल भरू दे” अशी दादागिरी केली. त्यावर त्या तरूणाने आक्षेप दर्शवला आणि त्यांना पुढे घुसू देण्यास नकार दिला.

मात्र यामुळे ते दोन तरूण संतापले आणि त्यांनी गोंधळ माजवत त्या तरूणाची थेट कॉलरच पकडली आणि त्याला बेदम मारहाण केली. यामध्ये नितेश गुप्ता हा तरूण जबर जखमी झाला आहे. मारहाण करून, दहशत माजवून ते तरूण तेथून निघून गेले. ही संपूर्ण घटना त्या पेट्रोल पंपावरील सीसीटीव्हीमध्ये कैद झाली आहे. याप्रकरणी नागरिकांनी संताप व्यक्त करत कारवाईची मागणी केली आहे. पोलीस यावर काय कारवाई करतात, याकडे सर्वांचे लक्ष लागलं आहे.

Follow Us
पावसाने पाठ फिरवली, सोयाबीन करपले; बीडमध्ये शेतकरी संकटात
पावसाने पाठ फिरवली, सोयाबीन करपले; बीडमध्ये शेतकरी संकटात
हात जोडून सांगते आता अजित पवारांच्या अपघाताबाबत बोलणार नाही; सुप्रिया
हात जोडून सांगते आता अजित पवारांच्या अपघाताबाबत बोलणार नाही; सुप्रिया सुळे असं का म्हणाल्या?
विनोद तावडे यांचे भेटीगाठींचे सत्र सुरुच; प्रभारी म्हणून नियुक्ती...
विनोद तावडे यांचे भेटीगाठींचे सत्र सुरुच; प्रभारी म्हणून नियुक्ती होताच उत्तर प्रदेशमध्ये....
दिल्ली सत्यनिकेतनमध्ये पाच मजली इमारत अचानक कोसळली, अनेकजण अडकल्याची..
दिल्ली अचानक कोसळली मोठी इमारत; अनेकजण अडकल्याची भीती, काय घडलं?
संजय शिरसाट यांना दहीहंडी उत्सवादरम्यान अचानकच मराठा आंदोलकांचा सवाल,
संजय शिरसाट यांना दहीहंडी उत्सवादरम्यान अचानकच मराठा आंदोलकांचा सवाल, काय घडलं?
शिंदे गटातील नेत्यावर गंभीर आरोप; आक्षेपार्ह शिवगाळ प्रकरणी थेट...
शिंदे गटातील नेत्यावर गंभीर आरोप; आक्षेपार्ह शिवगाळ प्रकरणी थेट... अडचणी वाढणार?
महाराष्ट्रातील 2 कोटी मतदारांची नावे गाळली? राजू पाटलांच्या दाव्याने..
महाराष्ट्रातील 2 कोटी मतदारांची नावे गाळली? राजू पाटलांच्या दाव्याने खळबळ
गरबा खेळण्यासाठी मुस्लिमांना प्रवेश नाही, हिंदूंनाही टिळा लावणं आवश्यक
Vishva Hindu Parishad | गरबा खेळण्यासाठी मुस्लिमांना प्रवेश नाही, हिंदूंनाही टिळा लावणं आवश्यक; आणखी नियम कोणते?
हिंजवडीतील आयटी कर्मचाऱ्यांच्या मोर्चात आदित्य ठाकरे सहभागी, पायाभूत..
हिंजवडीतील आयटी कर्मचाऱ्यांच्या मोर्चात आदित्य ठाकरे सहभागी, पायाभूत सुविधांसाठी मागणी
मीनाताईंच्या स्मृतीस्थळी ठाकरे कुटुंबीय; उद्धव-रश्मी ठाकरेंनी...
मीनाताईंच्या स्मृतीस्थळी ठाकरे कुटुंबीय; उद्धव-रश्मी ठाकरेंनी वाहिली आदरांजली