AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

गुन्हे शाखेकडून केलेल्या कारवाईच्या निरीक्षणातून समोर आली धक्कादायक बाब, अल्पवयीन मुलांसह तरुणाईमध्ये कसली ‘पॅशन’ ?

नाशिक शहरातील तरुणाईकडे घातक शस्रे आढळून येत आहे. गावठी कट्टेही आढळून येत असल्याने शहरात छुप्या पद्धतीने शस्र विक्री केली जात असल्याची चर्चा यानिमित्ताने होऊ लागली आहे.

गुन्हे शाखेकडून केलेल्या कारवाईच्या निरीक्षणातून समोर आली धक्कादायक बाब, अल्पवयीन मुलांसह तरुणाईमध्ये कसली 'पॅशन' ?
nashikImage Credit source: Google
| Updated on: Jan 30, 2023 | 10:24 AM
Share

नाशिक : गेल्या काही महिन्यांपासून नाशिक शहर पोलीसांच्या गुन्हे शाखेकडून करण्यात आलेल्या कारवाईमधून एक धक्कादायक निरीक्षण समोर आले आहे. संशयित आरोपीमध्ये अल्पवयीन मुलांचा सहभाग आणि धारधार शस्र बाळगण्याची पॅशनच एकप्रकारे तरुणाईमध्ये दिसून येत आहे. त्यामुळे शस्र बाळगणे असा ट्रेंडच गुंडांमध्ये सुरू असल्याचे समोर आल्यानं पोलिसांसमोरील आव्हान वाढत चाललं आहे. त्यातच शहरात देखील यानिमित्ताने भितीचे वातावरणं निर्माण होत असून पालकांची चिंता वाढवणारी बाब आहे. नाशिक शहराचे पोलीस आयुक्त अंकुश शिंदे यांच्या आदेशानंतर दरोडा आणि शस्त्रे विरोधी पथकाला सूचना देण्यात आल्या होत्या. त्यामध्ये दोन ठिकाणी मोठी कारवाई करण्यात आली आहे.

नाशिकरोड पोलीस ठाण्याच्या हद्दीत वीस वर्षीय तरुणाला ताब्यात घेत त्याच्याकडून पिस्तूल हस्तगत करण्यात आले आहे.

नुकतीच झालेली दुसरी कारवाई बघता 21 वर्षीय तरुणाकडे कारसह चॉपर जप्त करण्यात आला आहे. या दोन्ही कारवाई बघता त्यांनी पॅशन म्हणून ही हत्यारे बाळगल्याचे समोर आले आहे.

नाशिक शहरातील गुन्हेगारी मोडीत काढण्यासाठी काही खास पथके तयार करण्यात आली आहे. यामध्ये गुन्हे शाखेच्या अंतर्गत काही पथकांनी शहरातील संशयीत तरुणांची तपासणी सुरू केली आहे.

यामध्ये नाशिक शहर पोलिसांना तरुणाईमध्ये शस्र बाळगत असल्याचा शोध घेण्यात यश येत असले तरी शहरात अवैधरित्या शस्र कसे पोहचतात याचा छडा लावणे महत्वाचे ठरणार आहे.

नाशिक शहरातील तरुणाईकडे घातक शस्रे आढळून येत आहे. गावठी कट्टेही आढळून येत असल्याने शहरात छुप्या पद्धतीने शस्र विक्री केली जात असल्याची चर्चा यानिमित्ताने होऊ लागली आहे.

पोलीसांनी सुरू केलेली ही धरपकड मोहीम बघता शस्र बाळगणाऱ्या तरुणाईचे धाबे चांगलेच दणाणले आहे.

पिस्तूल घेऊन कॉलनी दहशत निर्माण करणाऱ्या गुड्या उर्फ आतिष शांताराम चौधरी आणि क्रिकेट खेळणारा तरुण जयेश जिभाऊ अहिरे यांच्याकडे चॉपर आढळून आल्याने त्यांना अटक करण्यात आली आहे.

पद्मभूषण पुरस्कार जाहीर झाल्यावर भगतसिंग कोश्यारींनी व्यक्त केला आनंद
पद्मभूषण पुरस्कार जाहीर झाल्यावर भगतसिंग कोश्यारींनी व्यक्त केला आनंद.
ना भगव्यावर प्रेम ना...त्या वादावर काँग्रेसच्या बड्या नेत्याने फटकारले
ना भगव्यावर प्रेम ना...त्या वादावर काँग्रेसच्या बड्या नेत्याने फटकारले.
पोस्टर लागले, तक्रारही दिली, तरीही सापडेना, आता तर कुटुंबीयही बेपत्ता
पोस्टर लागले, तक्रारही दिली, तरीही सापडेना, आता तर कुटुंबीयही बेपत्ता.
हिरव्या रंगाच्या वादात आता संजय राऊतांची उडी
हिरव्या रंगाच्या वादात आता संजय राऊतांची उडी.
मुंब्रा हिरवा करू... वादाला इम्तियाज जलील यांच्याकडून पुन्हा फोडणी
मुंब्रा हिरवा करू... वादाला इम्तियाज जलील यांच्याकडून पुन्हा फोडणी.
शिवाजी पार्कात प्रजासत्ताक दिनाचा दिमाखदार सोहळा पार पडला
शिवाजी पार्कात प्रजासत्ताक दिनाचा दिमाखदार सोहळा पार पडला.
सत्ता, संघर्ष, राजकारणापेक्षा देश महत्वाचा; एकनाथ शिंदे
सत्ता, संघर्ष, राजकारणापेक्षा देश महत्वाचा; एकनाथ शिंदे.
राज्यात मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्या हस्ते ध्वजवंदन
राज्यात मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्या हस्ते ध्वजवंदन.
विकसित भारताचा संकल्प दृढ होवो; पंतप्रधानांकडून देशवासीयांना शुभेच्छा
विकसित भारताचा संकल्प दृढ होवो; पंतप्रधानांकडून देशवासीयांना शुभेच्छा.
समाज घडवण्यात गुरू तेग बहादुर यांचे मोलाचे योगदान - फडणवीस
समाज घडवण्यात गुरू तेग बहादुर यांचे मोलाचे योगदान - फडणवीस.