सांगली : सांगली शहरातल्या एका शाळेमधील विद्यार्थ्यांना विषबाधा झाल्याचे प्रकार उघडकीस आला आहे. सुमारे 32 विद्यार्थ्यांना अन्नातून विषबाधा झाल्याचा प्रकार समोर आला आहे. सर्व विद्यार्थ्यांना सांगलीच्या शासकीय रुग्णालयामध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. विजयनगर येथील वानलेसवाडी हायस्कूल येथील पाचवी ते सातवीतील देण्यात आलेल्या पोषण आहारमधून विषबाधा झाल्याचं समोर आलं आहे. सध्या विद्यार्थ्यांची प्रकृती स्थिर असून, पुढील उपचार सुरु आहेत.