Chandrapur Accident : चंद्रपूरमध्ये शेतमजुरांना नेणारा पिकअप उलटला, अपघातात 43 शेतमजूर जखमी

चिमूर तालुक्यातील येरखडा येथील पिकअप वाहनाने केवाडा गावातील शेतमजूर गोंदेडा-बाडा मार्गावरील शेताकडे घेऊन जात असताना पिकअप वाहन चालकाचे नियंत्रण सुटल्याने रस्त्याच्या कडेला वाहन उलटले.

Chandrapur Accident : चंद्रपूरमध्ये शेतमजुरांना नेणारा पिकअप उलटला, अपघातात 43 शेतमजूर जखमी
चंद्रपूरमध्ये शेतमजुरांना नेणारा पिकअप उलटलाImage Credit source: tv9
Follow us
| Updated on: Jul 12, 2022 | 4:40 PM

चंद्रपूर : चंद्रपूर जिल्ह्यात शेत मजुरां (Laborers)ना घेऊन चाललेला पिकअप वाहन उलटल्याची घटना घडली आहे. या अपघाता (Accident)त 43 मजूर जखमी (Injured) झाले आहेत. ही घटना चिमूर तालुक्यातील गोदेंडा-खांबाडा मार्गावर आज घडली. या घटनेत सुदैवाने जीवितहानी झालेली नाही. या अपघातात 19 शेतमजूर गंभीर जखमी झालेत तर 24 शेतमजूर किरकोळ जखमी झाले आहेत. जखमींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. हे सर्व शेतमजूर केवाडा गावातील असून गोंदेडा-बाडा मार्गावरील शेतात शेतमजुरी करण्यासाठी चालले होते.

वाहन चालकाचे नियंत्रण सुटल्याने अपघात

जिल्ह्यात संततधार पाऊस सुरू आहे. त्यामुळे शेतीच्या कामांना गती आली आहे. मजुरांची कमतरता असल्याने पिकअप, ऑटोने मजुरांना शेतात नेले जात आहे. चिमूर तालुक्यातील येरखडा येथील पिकअप वाहनाने केवाडा गावातील शेतमजूर गोंदेडा-बाडा मार्गावरील शेताकडे घेऊन जात असताना पिकअप वाहन चालकाचे नियंत्रण सुटल्याने रस्त्याच्या कडेला वाहन उलटले. या वाहनात 43 मजूर होते. अपघात होताच आसपासचे शेतकरी, शेतमजूर धावून गेले. वाहनात दबलेल्या जखमींना त्यांनी बाहेर काढले. जखमींना उपचाराकरीता प्राथमिक आरोग्य केंद्र नेरी येथे हलविण्यात आले आहे.

नगर-कल्याण महामार्गावर बस-इको कारचा भीषण अपघात

नगर-कल्याण महामार्गावर राजुरी (जुन्नर) शिवारात बस व इको कार यांच्यात समोरासमोर भीषण अपघात झाला. यात इको कारमधील एका महिलेचा जागीच मृत्यू झाला असून चार जण गंभीर जखमी झाले. ही घटना गुलशन शकील चौगुले (48) असे अपघातात मृत्यू झालेल्या महिलेचे नाव आहे. जखमींना उपचारासाठी जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहेत. (43 farm laborers injured in pickup tempo accident in Chandrapur)

हे सुद्धा वाचा

Non Stop LIVE Update
'शरद पवार पक्ष एकत्र ठेवू शकले ना कुटुंब, मोदी म्हणाले ते अगदी बरोबर'
'शरद पवार पक्ष एकत्र ठेवू शकले ना कुटुंब, मोदी म्हणाले ते अगदी बरोबर'.
आमदार सरनाईकांच्या कुटुंबातील वाहनाचा भीषण अपघात, पाच जण जागीच ठार
आमदार सरनाईकांच्या कुटुंबातील वाहनाचा भीषण अपघात, पाच जण जागीच ठार.
बहिणीने भावाला फोन केला असता...अंधारेंच्या अपघातावर कुणाची प्रतिक्रिया
बहिणीने भावाला फोन केला असता...अंधारेंच्या अपघातावर कुणाची प्रतिक्रिया.
मनसेच्या नेत्यावर 5 कोटींची खंडणी मागितल्याचा आरोप, कुणी केली तक्रार?
मनसेच्या नेत्यावर 5 कोटींची खंडणी मागितल्याचा आरोप, कुणी केली तक्रार?.
ज्यांनी पत्नीला सोडलं..., शरद पवारांवरील टीकेनंतर मोदींवर कुणाची टीका?
ज्यांनी पत्नीला सोडलं..., शरद पवारांवरील टीकेनंतर मोदींवर कुणाची टीका?.
मोदी महानटसम्राट...काँग्रेसच्या बड्या नेत्याची पतंप्रधानांवर खोचक टीका
मोदी महानटसम्राट...काँग्रेसच्या बड्या नेत्याची पतंप्रधानांवर खोचक टीका.
दादा आवाज येत नाही, अजितदादांकडून कार्यकर्त्यांची फिरकी, काय दिल उत्तर
दादा आवाज येत नाही, अजितदादांकडून कार्यकर्त्यांची फिरकी, काय दिल उत्तर.
ठाकरे गटाच्या 'त्या' जाहिरातीत पॉर्नस्टार? चित्रा वाघ यांचा आक्षेप काय
ठाकरे गटाच्या 'त्या' जाहिरातीत पॉर्नस्टार? चित्रा वाघ यांचा आक्षेप काय.
'तर मोदींनी ते कृत्य केलं नसतं', संजय राऊतांचा पंतप्रधानांवर हल्लाबोल
'तर मोदींनी ते कृत्य केलं नसतं', संजय राऊतांचा पंतप्रधानांवर हल्लाबोल.
अंधारेंना घेण्यासाठी हेलिकॉप्टर आलं अन्...नको ते घडलं, नेमकं काय झालं?
अंधारेंना घेण्यासाठी हेलिकॉप्टर आलं अन्...नको ते घडलं, नेमकं काय झालं?.