पत्नीच्या मृतदेहासोबत अभिनेता 7 दिवस एकाच खोलीत, पोलीस तपासात धक्कादायक खुलासा
प्रसिद्ध अभिनेत्याच्या पत्नीचा संशयास्पद मृत्यू झाल्याच्या बातमीने खळबळ उडाली होती. धक्कादायक म्हणजे अभिनेता पत्नीच्या मृतदेहासोबत तब्बल 7 दिवस एकाच रुममध्ये होता. पोलीस तपासाताही अनेक धक्कादायक बाबी समोर आल्या.

एका अभिनेत्याच्या आयुष्याच अचानक असं काहीतरी घडलं आहे की ते अत्यंत धक्कादायक आहे. या अभिनेत्याने तब्बल 7 दिवस एकाच खोलीत आपल्या पत्नीच्या मृतदेहासोबत घालवले. एखाद्या चित्रपटात घडावा असा धक्कादायक प्रसंग या अभिनेत्याच्या आयुष्यात घडला आहे. हा अभिनेता म्हणजे ऑस्कर विजेता हॉलिवूड स्टार जीन हॅकमन. जीन हॅकमन त्यांची पत्नी आणि पाळीव कुत्रा काही दिवसांपूर्वी त्यांच्या राहत्या घरात मृतावस्थेत आढळले. एवढंच नाही तर मृत्यूपूर्वी जीन हॅकमन त्यांची पत्नी बेट्सी हॅकमनच्या मृतदेहासोबत तब्बल एक आठवडा राहिल्याचं पोलीस तपासात उघड झालं. एका रिपोर्टच्या माहितीनुसार सांगितलं की, पत्नी बेट्सी हॅकमनचा हंतावायरस पल्मोनरी सिंड्रोमनं मृत्यू झाला होता. जीन हॅकमन यांच्या पत्नीला झालेला आजार उंदरांमुळे पसरला होता. पत्नीसोबत त्यांच्या कुत्राही मृतावस्थेत आढळला होता.
जीन हॅकमन अन् त्यांच्या पत्नीच्या मृत्यूचं कारण समोर
ऑस्कर विजेता हॉलिवूड स्टार त्यांचा मृत्यू संशयास्पद परिस्थितीत झाला. प्रसिद्ध अभिनेत्याच्या अशा संशयास्पद मृत्यूमुळे इंडस्ट्रीत खळबळ माजली होती. पोलिसांनी तातडीनं या प्रकरणाचा तपास सुरू केला. तोपर्यंत या जोडप्याच्या मृत्यूचं कारण कळू शकलेलं नाही. पण आता यासंदर्भात एक मोठा खुलासा झाला आहे. जीन हॅकमन यांचा मृत्यू हृदयरोगानं झाल्याचं उघड झालं आहे. पण एवढंच नाहीतर, मृत्यूपूर्वी जीन हॅकमन त्यांची पत्नी बेट्सी हॅकमनच्या मृतदेहासोबत एक आठवडा राहिल्याचं खळबळजनक खुलासा झाला आहे.
जीनचं निधन झालं तेव्हा त्याच्या पोटात अन्नाचा एकही कण नव्हता
पुढे सात दिवसांनी त्याच खोलीत जीनचा मृत्यू झाला. अभिनेता जीनचं निधन झालं तेव्हा त्याच्या पोटात अन्नाचा एकही कण नव्हता. याशिवाय शरीरात पाण्याचीही कमतरता होती. मेडिकल एग्जामिनरनुसार, जीन हॅकमॅन अल्झायमर आजाराच्या अॅडव्हान्स लेव्हलवर पोहोचले होते. त्यामुळेच पत्नीचा मृत्यू झालाय याविषयी जीनला काहीच समजलं नाही. याशिवाय जीनला हृदयासंबंधी आजारही होते. जीन हॅकमॅन, त्यांची पत्नी आणि त्यांचा कुत्रा यांचा संशयास्पद मृत्यू झाल्यानंतर पोलिसांनी तपास केल्यावर आढळून आलं की, अभिनेत्याच्या पत्नीचं निधन आधी झालं. परंतु अल्झायमर असल्याने जीनला याविषयी काहीच कळालं नाही.
पती-पत्नीचा आयुष्याचा शेवट अत्यंत करुण परिस्थितीत
जीन हॅकमन यांना पेसमेकर देखील बसवण्यात आला होतं आणि 17 फेब्रुवारी रोजी त्यांची तपासणी करण्यात आल्याचं वृत्त आहे. यामध्ये काही अनियमितता आढळून आल्या. या आधारे, अधिकाऱ्यांचं म्हणणं आहे की, बेट्सी हॅकमनचा सर्वात आधी मृत्यू झाला, ती 11 फेब्रुवारीपर्यंत जीवंत होती आणि नंतर अभिनेत्यानं अखेरचा श्वास घेतला.अशाप्रकारे अभिनेता आणि त्याची पत्नी यांच्या आयुष्याचा शेवट अत्यंत करुण परिस्थितीत झाला.
