AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

CRIME NEWS : 80 वर्षांच्या इस्टेट एजंटला न्यूड व्हिडीओ कॉल, सेक्सटॉर्शन रॅकेटचे असे ठरले बळी

एका इस्टेट एजंटला या महिलेने परळमध्ये आपला दवाखाना असून आपली प्रॉपर्टी विकण्यास मदत करा अशी गळ घालत मैत्री केली.

CRIME NEWS : 80 वर्षांच्या इस्टेट एजंटला न्यूड व्हिडीओ कॉल, सेक्सटॉर्शन रॅकेटचे असे ठरले बळी
MANTUNGA POLICEImage Credit source: socialmedia
| Updated on: Apr 04, 2023 | 6:12 PM
Share

मुंबई : मोबाईल फोन स्मार्ट झाल्यामुळे त्याचा गैरवापरही वाढला आहे. सेक्सटॉर्शनचे रॅकेट चालविणारे सायबर चाचे आता या मोबाईलचा वापर करून एकट्या राहणाऱ्या किंवा स्मार्टफोनचा नुकताच वापर सुरू करणाऱ्या बुजुर्गांना चांगलाच गंडा घालत आहेत. अशा घटनांचे प्रमाण अलिकडे प्रचंड वाढले आहे. मुंबईतील एका 80 वर्षीय बुजुर्गाला अशाच प्रकारे आठ लाखाला लुबाडल्याचे प्रकरण उघडकीस आले आहे. माटुंगा पोलीस ठाण्यात या प्रकरणात गुन्हा दाखल झाला आहे.

माटुंगा पोलिस ठाण्यात एक सेक्सटॉर्शन रॅकेटचे प्रकरण दाखल झाले आहे. या प्रकरणात एका 80 वर्षीय बुजुर्गाला एका महिलेचा न्यूड कॉल आल्यानंतर पेशाने रियल इस्टेट एजंट असलेल्या वयस्काने या महिलेल्याच्या भूलथापांना फसून आपले आठ लाख रुपये गमावल्याचे उघडकीस आले आहे. या इस्टेट एजंटला एका महिलेने आपल्या जाळ्यात ओढले आणि त्याला न्यूड कॉल करीत त्याला ब्लॅकमेल करायला सुरूवात केली आहे.

तक्रारदार माटुंगा येथे राहणारे रियल इस्टेट एजंट असून त्यांना एका महिलेचा काही महिन्यांपूर्वी फोन आला होता. या महिलेने तिचे नाव मानसी जैन असे सांगत आपण डॉक्टर असून परळ येथे प्रॅक्टीस करीत असल्याचे सांगितले. तिला तिची काही प्रॉपर्टी विकायची आहे तर तुम्ही मला मदत करा असे तिने या तक्रारदाराला सांगितले. त्यानंतर त्यांच्या मैत्री वाढत गेली. एकदा या महिलेने त्यांना न्यूड व्हिडीओ कॉल करीत त्यांनाही कपडे काढायला सांगितले. त्यानंतर या महिलेने कॉल कट केला.

व्हिडीओ व्हायरल करण्याची धमकी

दोन दिवसानंतर या महिलेने या तक्रारदाराला धमकी देत तुमचा न्यूड व्हिडीओ आपल्याकडे असून दीड लाख रूपये द्या नाही तर हा व्हिडीओ व्हायरल केला जाईल अशी धमकी दिली. तक्रारदाराने तिचा कॉल कट केला, त्यानंतर अन्य एका व्यक्तीचा फोन आला. त्याने आपण सीबीआयच्या सायबर क्राईम सेलमधून विक्रम राठोड बोलत असून मानसी जैन यांनी आत्महत्या केल्याचे सांगितले. या महिलेला कॉल केल्याचा रेकॉर्ड तपासला असता त्यात तुमचे नाव आल्याचे त्याने सांगितले.

विक्रम राठोड नावाच्या या कथित सीबीआय अधिकाऱ्याने या महिलेच्या मोबाईलमध्ये या तक्रारदाराचा व्हिडीओ सापडल्याचे सांगितले. त्यामुळे हे प्रकरण जर मिठवायचे असेल तर तुम्हाला पंधरा लाख द्यावे लागतील. तक्रारदार इसमाने 7.97  लाख रूपये त्या कथित सीबीआय अधिकाऱ्याला दिल्याची तक्रार पोलीसांना केली आहे. आम्ही ज्या खात्यात हे पैसे वळते झाले त्याचा तपास करीत असल्याचे पोलिसांनी सांगितल्याचे टाईम्स वृत्तपत्रात म्हटले आहे.

चुनाभट्टीजवळ आंबेडकर अनुयायी अन् पोलिसांमध्ये वाद, थेट रस्ताच रोखला...
चुनाभट्टीजवळ आंबेडकर अनुयायी अन् पोलिसांमध्ये वाद, थेट रस्ताच रोखला....
इंडिगोची आजही 500 विमानं रद्द, प्रवाशांचा आक्रोश, कुठं काऊंटवर चढलं तर
इंडिगोची आजही 500 विमानं रद्द, प्रवाशांचा आक्रोश, कुठं काऊंटवर चढलं तर.
तपोवनातील प्रस्तावित प्रदर्शन केंद्राच्या निविदा प्रक्रियेला स्थगिती
तपोवनातील प्रस्तावित प्रदर्शन केंद्राच्या निविदा प्रक्रियेला स्थगिती.
शिंदेंमुळे 2022ला भाजप सत्तेत, शिवसेनेच्या मंत्र्याच्या दाव्यानं खळबळ
शिंदेंमुळे 2022ला भाजप सत्तेत, शिवसेनेच्या मंत्र्याच्या दाव्यानं खळबळ.
भाजप पदाधिकाऱ्यांनी मनसे पदाधिकाऱ्याला जबर धुतलं; उरणमध्ये घडलं काय?
भाजप पदाधिकाऱ्यांनी मनसे पदाधिकाऱ्याला जबर धुतलं; उरणमध्ये घडलं काय?.
वलसाडच्या ‘हापूस’ नामांकनाला कोकणचा कडाडून विरोध थेट...
वलसाडच्या ‘हापूस’ नामांकनाला कोकणचा कडाडून विरोध थेट....
BMC इज नॉट फॅमिली बिझनेस... भाजप नेत्याचा उद्धव ठाकरे यांना खोचक टोला
BMC इज नॉट फॅमिली बिझनेस... भाजप नेत्याचा उद्धव ठाकरे यांना खोचक टोला.
चुनाभट्टी येथे चैत्यभूमीकडे जाणाऱ्या आंबेडकर अनुयायांचा रास्ता रोको
चुनाभट्टी येथे चैत्यभूमीकडे जाणाऱ्या आंबेडकर अनुयायांचा रास्ता रोको.
तिन्ही पक्षाचा मालिक एक, अ‍ॅनाकोंडा गिळल्याशिवाय... ठाकरेंचा निशाणा
तिन्ही पक्षाचा मालिक एक, अ‍ॅनाकोंडा गिळल्याशिवाय... ठाकरेंचा निशाणा.
अमित ठाकरे यांच्या मेहुण्याच्या दिल्लीत विवाह, मोदींची सोहळ्याला हजेरी
अमित ठाकरे यांच्या मेहुण्याच्या दिल्लीत विवाह, मोदींची सोहळ्याला हजेरी.