सासूने 17 वर्षांपूर्वी जावयासोबत केले होते कांड, आता 80 वर्षाची झाल्यावर…
एका महिलेने जावयासोबत असे कृत्य केले की सर्वांना धक्का बसला आहे. आता नेमकं काय झालं होतं चला जाणून घेऊया...

उत्तर प्रदेशातील लखीमपूर खेरी येथे एक धक्कादायक प्रकरण समोर आलं आहे.१७ वर्षांपूर्वी एका महिलेने आपल्या जावयासोबत असं काही केलं होतं की, जेव्हा ती ८० वर्षांची झाली, तेव्हा तिला जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली. या प्रकरणाने संपूर्ण परिसरात खळबळ माजली आहे. आता नेमकं प्रकरण काय होतं? जाणून घ्या…
न्यायालयाचा निर्णय
एडीजे देवेंद्रनाथ सिंह यांनी दोषी सासू निसार जहां यांना जन्मठेप आणि २० हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावत तुरुंगात पाठवलं. एडीजीसी संजय सिंह यांनी सांगितलं की, सुदामापुरी, सीतापूर येथील रहिवासी अकील अहमद हे पीएसी सीतापूरमध्ये मुख्य आरक्षक होते. अकील यांचा विवाह सुंदरवल गावातील एहतेशाम यांच्या मुली शाहीन उर्फ रिंकी यांच्याशी झाला होता. अकील यांची पत्नी शाहीन आणि तिचे माहेरचे लोक अकील यांच्यावर वेगळं राहण्यासाठी दबाव टाकत होते. वाचा: वय 34 वर्ष, अविवाहित ते लक्ष्मीतारा कंपनी; वैष्णवीचा सतत छळ करणारी नणंद, हगवणेंची ‘करिश्मा’ आहे तरी कोण?
काय आहे प्रकरण?
२१ डिसेंबर २००७ च्या रात्री शाहीन आपल्या खोलीत शेकोटी पेटवून बसली होती. तेव्हा तिची दीड वर्षांची मुलगी तिच्या खांद्यावर चढली, त्यामुळे शाहीन आगीत पडली आणि भाजली गेली. तिला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आलं आणि तिच्या माहेरच्यांना याची माहिती देण्यात आली. अकील यांचा तिच्या उपचारासाठी बराच खर्च झाला. त्यानंतर ६ फेब्रुवारी २००८ रोजी शाहीनच्या माहेरच्यांनी तिची तब्येत बिघडल्याचं सांगून अकील यांना लखीमपूरला बोलावलं आणि त्यांच्यावर हुंड्याचा सर्व सामान सीतापूरहून आणण्याचा आणि घटस्फोट देण्याचा दबाव टाकला.
जिवंत जाळून खून
अकील यांनी ही बाब फोनवरून आपला भाऊ खलील याला सांगितली. शाहीनच्या माहेरच्यांनी अकील यांना खूप मारहाण केली आणि त्यांना आगीत जाळून मारलं. रात्री १२ वाजण्याच्या सुमारास खलील यांना सीतापूर कोतवालीतून माहिती मिळाली की, त्यांचा भाऊ अकील याचा खून झाला आहे. माहिती मिळताच लखीमपूरला पोहोचलेल्या खलील यांना अकील यांचा मृतदेह बाथरूममध्ये विद्रूप अवस्थेत आढळला. खलील यांनी अकील यांचे सासरे एहतेशाम, सासू निसार जहां, पत्नी शाहीन, साला असलम यांच्यासह आठ जणांविरुद्ध तक्रार दाखल केली.
सासरे आणि साला यांचा मृत्यू
पोलिसांनी तपासानंतर अकील यांचे सासरे एहतेशाम, सासू निसार जहां, साला असलम, असलमची पत्नी जेबा, नसरीन आणि जावेद यांच्याविरुद्ध आरोपपत्र दाखल केलं. सुनावणीदरम्यान एहतेशाम आणि असलम यांचा मृत्यू झाला. उर्वरित आरोपींविरुद्ध सुनावणी चालली, ज्यामध्ये अभियोजन पक्षाने अनेक साक्षीदार पेश केले. प्रकरणाची सुनावणी करणारे एडीजे देवेंद्रनाथ सिंह यांनी सासू निसार जहां आणि असलम यांना अकील यांच्या खुनाचा दोषी ठरवलं. असलमचा यापूर्वीच मृत्यू झाल्याने सासू निसार जहां यांना शिक्षा सुनावत तुरुंगात पाठवण्यात आलं. इतर आरोपींना पुराव्याअभावी निर्दोष सोडण्यात आलं.