सूटकेसमध्ये 9 वर्षाच्या मुलीचा मृतदेह, बलात्काराची शंका, त्या 2 – 3 तासांत काय झालं?

माणुसकीला काळिमा फासणारी घटना, 9 वर्षीय चिमुकलीचा सूटकेसमध्ये आढळला मृतहेद, तिच्यावर बलात्कार झाल्याची शंका... 'त्या' 2 - 3 तासांत झालं तरी काय?

सूटकेसमध्ये 9 वर्षाच्या मुलीचा मृतदेह, बलात्काराची शंका, त्या 2 - 3 तासांत काय झालं?
फाईल फोटो
| Updated on: Jun 08, 2025 | 12:59 PM

एक हृदय पिळवटून टाकणारी घटना समोर आली आहे. 9 वर्षीय चिमुकलीचा सूटकेसमध्ये मृतहेद आढळला आहे. ज्यामुळे सर्वत्र खळबळ माजली आहे. एवढंच नाही तर, चिमुकलीवर बलात्कार झाल्याची देखील शक्यता याठिकाणी वर्तवण्यात येत आहे. पुन्हा एकदा धक्कादायक घटना समोर आल्यानंतर मुली खरंच सुरक्षित आहेत का? असा प्रश्न उपस्थित होत आहे. उत्तर पुर्व दिल्लीच्या दयालपूर भागात डी ब्लॉकमध्ये एका 9 वर्षाच्या मुलीचा मृतदेह एका सुटकेसमध्ये सापडल्यानं खळबळ उडाली आहे. सध्या याप्रकरणी पोलीस अधिक तपास करत आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, चिमुकली घरातून चुलतीला बर्फ देण्यासाठी निघाली होती. पण फार उशीर झाला तरी मुलगी घरी परतली नसल्यामुळे कुटुंबियांनी शोध घेण्यास सुरुवात केली. तब्बल दोन ते तीन तास ती परत न आल्याने नातेवाईकांनी चौकशी केली. मुलीचा शोध लागत नसल्यामुळे कुटुंबियांची देखील चिंता वाढली.

चौकशी दरम्यान मुलीला एका बंगल्याकडे जाताना पाहिलं… असं एका व्यक्तीने सांगितलं. अशा माहिती मिळाल्यानंतर नातेवाईकांनी क्षणाचाही विलंब न करता संबंधित बंगल्याकडे धाव घेतली. मात्र, बंगल्याला कुलूप होतं. कुलूप तोडून आत गेल्यानंतर सर्वात अगोदर नातेवाईकांना मुलीचे कंबरेखालचे कपडे सापडले. नातेवाईकांना मुलगी अत्यंत वाईट अवस्थेत आढळली.

शोध घेतल्यानंतर एका सुटकेसमध्ये मुलगी रक्तात ने माखलेली मिळाली. मुलगी मिळताच तिला रुग्णालयात दाखल करण्यात आले. पण रुग्णालयात दाखल केल्यानंतर डॉक्टरांनी मुलींना मृत घोषित केलं. सध्या घटनेमुळे सर्वत्र खळबळ माजली आहे.

घटनेची माहिती मिळताच पोलिसांची 6 पथकं तात्काळ आरोपीला शोधण्यासाठी रवाना झाली आहेत. मुलीला वाईट अवस्थेत पाहिल्यानंतर तिच्यावर बलात्कार झाल्याची देखील शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. संबंधित प्रकरणानंतर परिसरात संतापाची लाट उसळली आहे. सध्या कुटुंबीयांचे जबाब नोंदवण्यात येत असून पोलीस प्रत्येक पैलू बारकाईने तपासात आहेत.

प्रकरणाचा शोध घेण्यासाठी पोलीस परिसरातील सीसीटीव्हीची देखील मदत घेत आहेत.या संदर्भात, मुलीच्या वडिलांच्या तक्रारीवरून, दयालपूर पोलिसांनी अज्ञात व्यक्तींविरुद्ध POCSO कायदा आणि इतर संबंधित कलमांखाली गुन्हा दाखल केला आहे आणि आरोपींचा शोध सुरू केला आहे.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us