फक्त काकांना थँक्यू म्हटलं अन् दिल्ली मेट्रोची सफर झाली खतरनाक, मुलीने सांगितला धक्कादायक अनुभव
दिल्ली मेट्रोमध्ये एका २२ वर्षीय मुलीला अतिशय धक्कादायक अनुभव आला आहे. या मुलीने सोशल मीडियाच्या माध्यमातून हा अनुभव सांगितला आहे. तसेच तिने इतर महिलांना देखील सतर्क राहण्याचा सल्ला दिला आहे.

दिल्ली मेट्रो नेहमी कोणत्या ना कोणत्या कारणाने चर्चेत असते. एका 22 वर्षीय विद्यार्थिनीने सोशल मीडियावर एक भयानक अनुभव सांगितला, ज्यामुळे लोक संतापले. तिने सांगितले की दिल्ली मेट्रोमध्ये एका वृद्ध व्यक्तीने तिच्याशी गैरवर्तन केले. ती फक्त काकांना थँक्यू म्हटली होती. पण ते जे काही वागले ते धक्कादायक होते.
मुलीने केली पोस्ट
सोशल साइट रेडिटवर विद्यार्थिनीने एक पोस्ट शेअर केली आहे. त्यामध्ये तिने, “घृणास्पद आणि भयावह. दिल्ली विद्यापीठाकडे जाणाऱ्या यलो लाइन मेट्रोमध्ये एका वृद्ध व्यक्तीने मला अश्लील पद्धतीने स्पर्श केला. यापेक्षा भयानक बाब म्हणजे तो मला थोडा वयस्कर वाटत होता. मी खरंच त्याला माझी सीट देणार होते, कारण माझे स्टेशन येत होते. तो वृद्ध व्यक्ती काही वेळ रिकाम्या सीटकडे पाहत राहिला. मला त्यावेळी थोडे विचित्र वाटले. जेव्हा मी मेट्रोच्या दरवाजाकडे निघाले, तेव्हा त्याने माझ्या मागच्या बाजूला स्पर्श केला. देवाची शपथ, मी थक्क झाले. जेव्हा ही घटना घडली, तेव्हा मी त्याचा चेहरा पाहण्यासाठी मागे वळले, तर तो पुढील कोचच्या दिशेने पळत होता” असे म्हटले होते.
वाचा: अखेर रिंकूने आकाशसोबतच्या नात्यावर सोडले मौन, ‘तेव्हापासून आमच्यात…’
मुलीने दिला इतर महिलांना सल्ला
विद्यार्थिनीने महिलांना सावध राहण्याचा इशारा दिला. ती म्हणाली, “यामुळे मला कळले की ही कोणतीही चूक नव्हती. मला फक्त खूप घृणास्पद वाटले. मी माझ्या स्टेशनवर उतरण्यास खूप घाबरले होते आणि सर्वजण उतरेपर्यंत मी सुमारे 5 मिनिटे मेट्रोमध्येच थांबले. मी अजूनही त्या घृणास्पद घटनेची भावना अनुभवू शकते. हे खूप घाणेरडे वाटत होते. माझा दिवस पूर्णपणे खराब झाला आहे आणि आता मी बराच काळ मेट्रोने प्रवास करताना घाबरेन.”
विद्यार्थिनीने पुढे लिहिले की, ती 22 वर्षीय पदव्युत्तर विद्यार्थिनी आहे. पुरुषांकडून टक लावून पाहण्याची सवय तिला झाली असली, तरी या घटनेनंतर ती पुन्हा मेट्रो प्रवासादरम्यान आपल्या सुरक्षेबाबत घाबरली आहे.
