AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

CCTV नाशिकमध्ये लाठ्या काठ्यांनी मारहाण, अंबड परिसरात गावगुंडाची दहशत कायम, पोलीस कारवाई कधी करणार?

नाशिकच्या सिडको परिसरात गावगुंडाची दहशत असल्याचे पुन्हा एकदा समोर आले आहे, आणि यामध्ये अंबड पोलिसांचे दुर्लक्ष देखील असल्याचे स्पष्ट होत आहे.

CCTV नाशिकमध्ये लाठ्या काठ्यांनी मारहाण, अंबड परिसरात गावगुंडाची दहशत कायम, पोलीस कारवाई कधी करणार?
Image Credit source: Google
Kiran Balasaheb Tajne
Kiran Balasaheb Tajne | Updated on: Jan 10, 2023 | 1:00 PM
Share

नाशिक : नाशिक शहरातील नवीन नाशिक म्हणजेच सिडको परिसरातील गावगुंडांची दहशत काही केल्या कमी व्हायला तयार नाहीये. अंबड पोलीस स्टेशनच्या हद्दीत घडलेल्या या घटनेनं शहरात खळबळ उडाली असून अंबड परिसर हादरला आहे. विशेष म्हणजे हा संपूर्ण हाणामारीचा प्रकार सीसीटीव्ही मध्ये कैद झाला आहे. त्यामुळे सिडको परिसरात गावगुंडाची दहशत कायम आहे. यामध्ये कुणीही तक्रार न दिल्याने याबाबत कुठलाही गुन्हा दाखल करण्यात आला नाही. त्यामुळे या हाणामारीच्या विषयाकडे अंबड पोलीसांनी दुर्लक्ष केल्याचे दिसून येत आहे. याच परिसरात यापूर्वीही घरांवर दगडफेक, लाठ्याकाठ्या घेऊन गल्लीत दहशत निर्माण करणे अशा विविध घटना घडत आहे. वारंवार या घटना असतांना पोलीसांनी कुठलीही कठोर भूमिका न घेतल्याने नागरिकांमध्ये नाराजी पसरली आहे. सिडको परिसरात हाणामारीच्या घटणेमुळे नागरिकांमध्ये भितीचे वातावरण पसरले आहे.

नाशिकच्या सिडको परिसरात गावगुंडाची दहशत असल्याचे पुन्हा एकदा समोर आले आहे, आणि यामध्ये अंबड पोलिसांचे दुर्लक्ष देखील असल्याचे स्पष्ट होत आहे.

क्षुल्लक कारणावरून वाद घालत लाठ्या काठ्यांनी मारहाण केल्याची बाब समोर आली आहे. मारहाणीचा सीसीटीव्ही समोर आल्याने खळबळ उडाली आहे.

या घटनेतील धक्कादायक बाब म्हणजे गावगुंडाच्या भीतीने अंबड पोलिसात तक्रार देणे टाळले आहे, परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.

गावगुंडाचा बंदोबस्त करावा अशी नागरिकांची मागणी करत असले तरी अंबड परिसर नेहमीच अशा घटनेने चर्चेत येत असतो.

यापूर्वी देखील कोयते घेऊन मिरविण्याचा प्रकार घडला होता, अंबड परिसरात पोलिसांचा वचक राहिला नाही का ? अशी चर्चा आता सिडकोच्या चौकाचौकात होऊ लागली आहे.

Follow Us
परभणीत दूध पेढीवर FDAची धडक कारवाई! रिशा मिल्क अँड मिल्क प्रोडक्ट्स...
FDA Raid | परभणीत दूध पेढीवर FDAची धडक कारवाई! रिशा मिल्क अँड मिल्क प्रोडक्ट्सचा अन्न परवाना निलंबित
गणेशोत्सवाआधी BMCचा मोठा निर्णय! रस्ते-पदपथ अडवणाऱ्या जाहिरात...
Mumbai | गणेशोत्सवाआधी BMCचा मोठा निर्णय! रस्ते-पदपथ अडवणाऱ्या जाहिरात फलकांवर बंदी; उल्लंघन केल्यास कारवाई होणार
पाईप दिसला नाही अन् काळाचा घाला! नाशिकमध्ये भीषण अपघात
Nashik | पाईप दिसला नाही अन् काळाचा घाला! नाशिकमध्ये भीषण अपघात; संतप्त नागरिकांचा महापालिकेत ठिय्या
बिकानेरच्या रसमलाईत चक्क बुरशी! कामोठ्यात धक्कादायक प्रकार समोर
Navi Mumbai | बिकानेरच्या रसमलाईत चक्क बुरशी! कामोठ्यात धक्कादायक प्रकार समोर; दुकान मालकाने चूक मान्य करत...
मध्य रेल्वेची लोकल सेवा ठप्प! कल्याण स्थानकवरून प्रवाशांवर भर पावसात..
Mumbai Local | मध्य रेल्वेची लोकल सेवा ठप्प! कल्याण स्थानकवरून प्रवाशांवर भर पावसात रुळावरून पायी चालण्याची आली वेळ
अमित शाहांनी मुंबईतून दिली दोन मोठी अपडेट! सेवा संकल्प अभियानची घोषणा
Amit Shah | अमित शाहांनी मुंबईतून दिली दोन मोठी अपडेट! सेवा संकल्प अभियानची घोषणा, पुढे म्हणाले...
नांदेडमध्ये दुष्काळग्रस्तांची दहीहंडी! दीड महिन्यापासून पाऊस गायब...
Nanded | नांदेडमध्ये दुष्काळग्रस्तांची दहीहंडी! दीड महिन्यापासून पाऊस गायब; शेतकऱ्यांनी चौकात मांडली करपलेल्या पिकांची व्यथा
जरांगेंना विखे पाटलांची कळकळीची विनंती! चर्चेतून मार्ग काढू...
Radhakrishna Vikhepatil | जरांगेंना विखे पाटलांची कळकळीची विनंती! चर्चेतून मार्ग काढू... मराठा आरक्षणावर मोठी अपडेट समोर
तोंडाला पाने पुसण्यापेक्षा कोर्टात टिकणारं आरक्षण हवं!
Shivendraraje Bhonsle | तोंडाला पाने पुसण्यापेक्षा कोर्टात टिकणारं आरक्षण हवं! शिवेंद्रराजे भोसले स्पष्टच बोलले, पुढे म्हणाले...
संजय राऊतांचा अमित शाहांवर फंड कलेक्शनचा आरोप; बन यांचा सडेतोड पलटवार
Sanjay Raut Vs Navnath Ban | संजय राऊतांचा अमित शाहांवर फंड कलेक्शनचा आरोप; नवनाथ बन यांचा सडेतोड पलटवार, मुंबई दौऱ्यावरून वार- पलटवार सुरूच