AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Delhi Murder : उसने दिलेले 500 रुपये मागितले म्हणून चाकूने भोसकले; दिल्लीतील खळबळजनक घटना

काही दिवसांपूर्वी उबेदने दारू पिण्यासाठी जावेदकडून 500 रुपये उसने घेतल्याचा आरोप आहे. ते पैसे जावेदने मागितले म्हणून उबेदने पोटात चाकू खुपसून त्याचा खून केल्याचे पोलिस तपासात उघडकीस आले आहे.

Delhi Murder : उसने दिलेले 500 रुपये मागितले म्हणून चाकूने भोसकले; दिल्लीतील खळबळजनक घटना
दौंडमध्ये अज्ञात कारणावरुन व्यक्तीची हत्याImage Credit source: tv9
| Edited By: | Updated on: Jul 21, 2022 | 2:06 AM
Share

नवी दिल्ली : राजधानी दिल्लीमध्ये उसने पैसे मागितल्याच्या रागातून चाकूहल्ला (Knife Attack) करण्यात आल्याची खळबळजनक घटना उघडकीस आली आहे. 35 वर्षीय तरुणावर त्याच्या मित्रानेच चाकूने वार केले. मोहम्मद जावेद असे हल्ला झालेल्या तरुणाचे नाव असून त्याने मित्राला उसने दिलेले 500 रुपये परत मागितले होते. त्याचा राग आला आणि मित्राने जावेदच्या थेट पोटात चाकू खुपसला. यात जावेदला गंभीर दुखापत झाली. त्यातच जावेदचा रुग्णालयात उपचार सुरु असताना मृत्यू (Death) झाला. याप्रकरणी ईशान्य दिल्लीच्या ज्योती नगर पोलिसांनी जावेदचा मित्र उबेद (23) याला अटक (Arrest) केली आहे. त्याला न्यायालयापुढे हजर केले असता न्यायालयाने गुन्ह्याचे गंभीर स्वरुप लक्षात घेऊन उबेदची तुरुंगात रवानगी केली आहे.

जावेदचा सोमवारी जीटीबी रुग्णालयात मृत्यू झाला. त्यानंतर उबेदविरुद्ध खुनाच्या गुन्ह्याचे कलम जोडण्यात आले. पोलीस कोठडीत असलेला दुसरा आरोपी शबाज उर्फ ​​छोटू (21) याची सध्या पोलिसांकडून चौकशी केली जात आहे. उबेदचा मोठा भाऊ शेर खानने कुटुंबीयांना जबाब बदलण्यासाठी त्यांच्यावर दबाव टाकल्याचा आरोप करण्यात आला आहे.

मयत तरुणाने दारु पिण्यासाठी आरोपीकडून घेतले होते पैसे

जावेद हा कुटुंबासह गल्ली क्रमांक-10, कर्दमपुरी येथे राहत होता. वडील अब्दुल गफ्फार, भाऊ परवेज, दोन बहिणी, पत्नी निखत, एक मुलगा आणि मुलगी असा त्याचा परिवार आहे. तो मिनी टेम्पो चालवायचा. काही दिवसांपूर्वी त्याने टेम्पो विकला होता. उबेदही जावेदच्या घराजवळ कुटुंबासोबत राहत असल्याचे नातेवाइकांनी सांगितले. जावेद आणि उबेद यांच्यात मैत्री होती. दोघे अनेकदा एकत्र बसायचे. उबेदचा मोठा भाऊ शेरखान हा या भागातील कुख्यात गुंड आहे. काही दिवसांपूर्वी उबेदने दारू पिण्यासाठी जावेदकडून 500 रुपये उसने घेतल्याचा आरोप आहे. ते पैसे जावेदने मागितले म्हणून उबेदने पोटात चाकू खुपसून त्याचा खून केल्याचे पोलिस तपासात उघडकीस आले आहे.

शुक्रवारी रात्री जावेद काही कामानिमित्त बाहेर गेला होता. यादरम्यान जावेदने उबेदकडे त्याचे पैसे परत मागितले. यावरून आरोपी संतापला आणि त्याने चाकू काढून जावेदच्या पोटात वार केला. त्यानंतर जावेदसोबत असलेले सर्वजण पळून गेले. आपल्या भावाने जावेदला भोसकल्याचे शेर खानने पाहिले. त्यानंतर तो जावेदला जीटीबी हॉस्पिटलमध्ये घेऊन गेला. तेथून पोलिसांना माहिती मिळाली. शेरखानने कुटुंबीयांवर कुठलाही आरोप न करण्यासाठी दबाव टाकल्याचे बोलले जात आहे. हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या जावेदची प्रकृती बिघडली. त्यामुळे शनिवारी त्याचा भाऊ आणि वडिलांनी जबानी दिली आणि उबेदने चाकू मारल्याची माहिती पोलिसांना दिली. त्यानंतर उबेदला अटक करण्यात आली.

50 हजारांची खंडणी मागितली होती!

पोलिसांनी खूनासह खुनाच्या प्रयत्नाचे कलम लावले आहे. उबेदला न्यायालयात हजर केले असता, तेथून त्याची कारागृहात रवानगी करण्यात आली आहे. उबेदवर ज्योतीनगर पोलिस ठाण्यात यापूर्वीच चोरी आणि शस्त्रास्त्र कायद्याचे दोन गुन्हे दाखल आहेत. सोमवारी सकाळी जावेदचा मृत्यू झाला. काही दिवसांपूर्वी शेरखाननेही जावेदच्या कुटुंबीयांकडून 50 हजार रुपयांची खंडणी मागितली होती. तसा आरोप जावेदच्या कुटुंबीयांनी केला आहे. खंडणी मागितल्याच्या प्रकरणाचाही तपास सुरू असल्याचे पोलिस अधिकाऱ्यांनी सांगितले. (A friend was stabbed to death out of anger for demanding money in delhi)

बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो.
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं.
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!.
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.