Vasai Fraud : नकली सोन्याची नाणी देऊन करोडोची फसवणूक, आंतरराज्य मारवाडी टोळीचा भांडाफोड, तिघांना अटक

| Updated on: Jul 24, 2022 | 5:05 PM

ही टोळी गुजरात राज्यातील असून महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यात जाऊन सोन्याच्या नावाखाली नागरिकांची फसवणूक करत होती. धातूची नाणी सोन्याची असल्याची भासवून ही टोळी लोकांकडून पैसे उकळायची.

Vasai Fraud : नकली सोन्याची नाणी देऊन करोडोची फसवणूक, आंतरराज्य मारवाडी टोळीचा भांडाफोड, तिघांना अटक
नकली सोन्याची नाणी देऊन करोडोची फसवणूक
Image Credit source: TV9
Follow us on

वसई : नकली सोन्याची नाणी (Fake Gold Coin) देऊन करोडोची फसवणूक (Fraud) करणाऱ्या आंतरराज्य मारवाडी टोळीचा भांडाफोड करत तिघांना वसई गुन्हे शाखेने अटक (Arrest) केली आहे. किशनभाई कस्तुरभाई मारवाडी सलाट, हरिभाई प्रेमाभाई मारवाडी सलाट, मनीष कामलेशभाई शहा असे मारवाडी टोळीतील अटक केलेल्या आरोपींची नाव आहेत. आरोपींकडून 2 कोटी 18 लाख 95 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. ही टोळी गुजरात राज्यातील असून महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यात जाऊन सोन्याच्या नावाखाली नागरिकांची फसवणूक करत होती. धातूची नाणी सोन्याची असल्याची भासवून ही टोळी लोकांकडून पैसे उकळायचे. वसई गुन्हे शाखा कक्ष 2 चे प्रभारी शाहूराज रणवरे यांच्या पथकाने ही कारवाई केली.

नकली नाणी देऊन 3 कोटींची फसवणूक

तिघेही आरोपी गुजरात राज्यातील बडोदा जिल्ह्यातील खोडीयार नगरचे रहिवाशी आहेत. विरार पोलीस ठाणे हद्दीत 18 एप्रिल 2022 रोजी अपेक्ष हॉटेल समोर मुंबई अहमदाबाद महामार्गाच्या बाजूला एका झोपडीत एका इसमाची नकली सोन्याची नाणी देऊन आरोपींनी फसवणूक केली होती. हेमंत वावीया पटेल असे फसवणूक झालेल्या इसमाचे नाव आहे. धातूच्या नाण्याने सोन्याचे नाणी भरलेली पिशवी आहेत असे भासवून त्या बदल्यात वावीया यांच्याकडून 3 कोटी 12 लाख रुपये घेऊन फसवणूक केली होती. याबाबत विरार पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता. वसई गुन्हे शाखा कक्ष 02 चे प्रभारी पोलीस निरीक्षक शाहूराज रणवरे यांच्या पथकातील पोलीस उपनिरीक्षक सुहास कांबळे, सागर शिंदे, ज्ञानेश्वर जगताप यांच्यासह पोलीस हवालदार मंगेश चव्हाण, संजय नवले, महेश पागधरे, चंदन मोरे, सचिन पाटील, जगदीश गोवारी, पो ना प्रशांत कुमार ठाकूर, अमोल कोरे, दादा आडके, सुधीर नरळ या पथकांनी सायबरची मदत घेऊन या टोळीचा भांडाफोड केला आहे. (A gang that cheated crores by giving fake gold coins was arrested in Vasai)

हे सुद्धा वाचा