AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

चारित्र्याच्या संशयातून पतीने दोन वर्षाच्या मुलासह पत्नीसोबत हैवानी कृत्य, 4 वर्षाच्या मुलासमोरच…

शकूरपूर येथील रहिवासी बृजेश याला गेल्या काही दिवसांपासून पत्नीचे दुसऱ्या पुरुषासोबत अनैतिक संबंध असल्याचा संशय होता. यावरुन अनेकदा त्यांच्यात वाद होत होते. याच वादातून आरोपीने पत्नी आणि मुलाचा काटा काढला.

चारित्र्याच्या संशयातून पतीने दोन वर्षाच्या मुलासह पत्नीसोबत हैवानी कृत्य, 4 वर्षाच्या मुलासमोरच...
चारित्र्याच्या संशयातून पतीने पत्नीसह मुलाला संपवलेImage Credit source: socialmedia
वैजंता गोगावले
वैजंता गोगावले | Updated on: Feb 18, 2023 | 11:41 AM
Share

नवी दिल्ली : चारित्र्याच्या संशयातून पतीने पत्नीसह दोन वर्षाच्या मुलाची हत्या केल्याची धक्कादायक घटना नवी दिल्लीत उघडकीस आली आहे. धक्कदायक म्हणजे 4 वर्षाच्या मुलासमोरच पतीने पत्नी आणि लहान मुलाचा चाकून भोसकले. पोलिसांनी आरोपीला अटक केली असून, पोलीस त्याची अधिक चौकशी करत आहेत. बृजेश असे हत्या करणाऱ्या आरोपी पतीचे नाव आहे. दिल्लीतील नेताजी सुभाष प्लेस पोलीस ठाण्याअंतर्गत शकूरपूर येथे ही घटना घडली. पोलिसांनी घटनेची माहिती मिळताच घटनास्थळी दाखल होत मृतदेह ताब्यात घेत शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठवले. आरोपीकडून गुन्ह्यात वापरलेले हत्यारही जप्त केले आहे.

4 वर्षाच्या मुलासमोरच पत्नी आणि छोट्या मुलाला संपवले

शकूरपूर येथील रहिवासी बृजेश याला गेल्या काही दिवसांपासून पत्नीचे दुसऱ्या पुरुषासोबत अनैतिक संबंध असल्याचा संशय होता. यावरुन अनेकदा त्यांच्यात वाद होत होते. याच वादातून आरोपीने पत्नी आणि मुलाचा काटा काढला. मोठ्या मुलासमोरच पत्नी आणि छोट्या मुलाला चाकूने भोसकून त्यांची हत्या केली.

छोटा मुलगा पत्नीला अनैतिक संबंधातून झाल्याचा संशय होता

मोठा मुलगा आपल्यापासून झाला आहे आणि छोटा मुलगा पत्नीच्या अनैतिक संबंधातून झाल्याचा आरोपीला संशय होता. याच संशयातून त्याने पत्नीसह दोन वर्षाच्या मुलालाही संपवले. घटनचेी माहिती मिळताच पोलीस तात्काळ घटनास्थळी रवाना झाले. पोलिसांनी घटनास्थळावरुन आरोपीला अटक केली आहे. पोलीस आरोपीची अधिक चौकशी करत आहेत.

Follow Us
परभणीत दूध पेढीवर FDAची धडक कारवाई! रिशा मिल्क अँड मिल्क प्रोडक्ट्स...
FDA Raid | परभणीत दूध पेढीवर FDAची धडक कारवाई! रिशा मिल्क अँड मिल्क प्रोडक्ट्सचा अन्न परवाना निलंबित
गणेशोत्सवाआधी BMCचा मोठा निर्णय! रस्ते-पदपथ अडवणाऱ्या जाहिरात...
Mumbai | गणेशोत्सवाआधी BMCचा मोठा निर्णय! रस्ते-पदपथ अडवणाऱ्या जाहिरात फलकांवर बंदी; उल्लंघन केल्यास कारवाई होणार
पाईप दिसला नाही अन् काळाचा घाला! नाशिकमध्ये भीषण अपघात
Nashik | पाईप दिसला नाही अन् काळाचा घाला! नाशिकमध्ये भीषण अपघात; संतप्त नागरिकांचा महापालिकेत ठिय्या
बिकानेरच्या रसमलाईत चक्क बुरशी! कामोठ्यात धक्कादायक प्रकार समोर
Navi Mumbai | बिकानेरच्या रसमलाईत चक्क बुरशी! कामोठ्यात धक्कादायक प्रकार समोर; दुकान मालकाने चूक मान्य करत...
मध्य रेल्वेची लोकल सेवा ठप्प! कल्याण स्थानकवरून प्रवाशांवर भर पावसात..
Mumbai Local | मध्य रेल्वेची लोकल सेवा ठप्प! कल्याण स्थानकवरून प्रवाशांवर भर पावसात रुळावरून पायी चालण्याची आली वेळ
अमित शाहांनी मुंबईतून दिली दोन मोठी अपडेट! सेवा संकल्प अभियानची घोषणा
Amit Shah | अमित शाहांनी मुंबईतून दिली दोन मोठी अपडेट! सेवा संकल्प अभियानची घोषणा, पुढे म्हणाले...
नांदेडमध्ये दुष्काळग्रस्तांची दहीहंडी! दीड महिन्यापासून पाऊस गायब...
Nanded | नांदेडमध्ये दुष्काळग्रस्तांची दहीहंडी! दीड महिन्यापासून पाऊस गायब; शेतकऱ्यांनी चौकात मांडली करपलेल्या पिकांची व्यथा
जरांगेंना विखे पाटलांची कळकळीची विनंती! चर्चेतून मार्ग काढू...
Radhakrishna Vikhepatil | जरांगेंना विखे पाटलांची कळकळीची विनंती! चर्चेतून मार्ग काढू... मराठा आरक्षणावर मोठी अपडेट समोर
तोंडाला पाने पुसण्यापेक्षा कोर्टात टिकणारं आरक्षण हवं!
Shivendraraje Bhonsle | तोंडाला पाने पुसण्यापेक्षा कोर्टात टिकणारं आरक्षण हवं! शिवेंद्रराजे भोसले स्पष्टच बोलले, पुढे म्हणाले...
संजय राऊतांचा अमित शाहांवर फंड कलेक्शनचा आरोप; बन यांचा सडेतोड पलटवार
Sanjay Raut Vs Navnath Ban | संजय राऊतांचा अमित शाहांवर फंड कलेक्शनचा आरोप; नवनाथ बन यांचा सडेतोड पलटवार, मुंबई दौऱ्यावरून वार- पलटवार सुरूच