भयानक! दिल्ली पुन्हा हादरली; आणखी एक श्रद्धा जिवाला मुकली

वसईतील तरुणीचे हत्याकांड गाजले असतानाच हे आणखी एक भयानक हत्याकांड उजेडात आले आहे. त्यामुळे राजधानी नवी दिल्लीमध्ये महिलांच्या आणि तरुणींच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.

भयानक! दिल्ली पुन्हा हादरली; आणखी एक श्रद्धा जिवाला मुकली
कामाचा पगार मागणाऱ्या अल्पवयीन मुलीची हत्याImage Credit source: TV9 Marathi
Follow us
| Updated on: Nov 15, 2022 | 9:08 PM

नवी दिल्ली : राजधानी नवी दिल्लीमध्ये सध्या वसईतील श्रद्धा वालकरचे हत्याकांड गाजत असतानाच आणखी एका भयानक हत्याकांडाचा उलगडा झाला आहे. या हत्याकांडामागे पगाराचे क्षुल्लक कारण होते. पगार मिळाला नाही म्हणून घरकाम करणाऱ्या अल्पवयीन मुलीने पोलीस तक्रारीची धमकी दिली होती. त्याच रागातून मुलीला घरकामाला ठेवणाऱ्या आरोपीने मित्रांच्या मदतीने मुलीची निर्घृण पद्धतीने हत्या केली. त्यानंतर मुलीच्या मृतदेहाचे सहा तुकडे करून मृतदेह नदीमध्ये फेकून दिला.

वसईतील तरुणीचे हत्याकांड गाजले असतानाच हे आणखी एक भयानक हत्याकांड उजेडात आले आहे. त्यामुळे राजधानी नवी दिल्लीमध्ये महिलांच्या आणि तरुणींच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.

पगार दिला नाही म्हणून मुलगी होती नाराज

आरोपीने त्याच्या घरात काम करण्यासाठी झारखंड येथून अल्पवयीन मुलीला आणले होते. मात्र तो हत्या झालेल्या मुलीला घरकामाचा मोबदला देत नव्हता. मुलगी मोबदला देण्यासाठी वारंवार पाठपुरावा करत होती.

हे सुद्धा वाचा

कित्येक महिने पैसे मिळाले नाहीत म्हणून तिने पोलिसांमध्ये तक्रार देण्याची धमकी दिली होती. तिच्या या नाराजीनंतर आरोपीने घरकाम करणाऱ्या मुलीच्या हत्येचा कट रचला होता. त्याने आपल्या मित्रांच्या मदतीने हा कट यशस्वी केला.

इतकेच नव्हे तर नंतर पुरावे नष्ट करण्याच्या हेतूने मुलीच्या मृतदेहाचे सहा तुकडे केले होते. चार वर्षांपूर्वी 17 मे 2018 रोजी ही धक्कादायक घटना घडली होती. या प्रकरणात दिल्ली पोलिसांच्या विशेष युनिटने आरोपीला अटक केली आहे.

मुख्य आरोपी चार वर्षांपासून होता फरार

अल्पवयीन मुलीच्या निर्घृण हत्याकांडानंतर दिल्ली पोलिसांनी या प्रकरणातील तीन आरोपींना अटक केली होती. मात्र हत्येचा कट रचणारा मुख्य आरोपी मागील चार वर्षांपासून फरार होता.

गेल्या चार वर्षांत विविध गुन्ह्यांमध्ये या हत्याकांडाचे कनेक्शन शोधण्याचा प्रयत्न दिल्ली पोलिसांनी केला होता. अखेर मुख्य आरोपी पोलिसांच्या जाळ्यात सापडला. शालू टोपणो असे या मुख्य मारेकर्‍याचे नाव असून त्याच्याविरुद्ध हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Non Stop LIVE Update
तर भाजपात पहिली उडी मारणारे सुनील तटकरे असतील रोहित पवार यांची टीका
तर भाजपात पहिली उडी मारणारे सुनील तटकरे असतील रोहित पवार यांची टीका.
शिवसेनेची पहिली यादी जाहीर, सात विद्यमान खासदारांना पुन्हा संधी
शिवसेनेची पहिली यादी जाहीर, सात विद्यमान खासदारांना पुन्हा संधी.
एका जागेसाठी कॉंग्रेसला देशाचे पंतप्रधान पद घालवायचं का ? - संजय राऊत
एका जागेसाठी कॉंग्रेसला देशाचे पंतप्रधान पद घालवायचं का ? - संजय राऊत.
आनंद दिघेंचा शिष्य यंदा मारणार हॅट्रीक, केदार दिघे यांचा विश्वास
आनंद दिघेंचा शिष्य यंदा मारणार हॅट्रीक, केदार दिघे यांचा विश्वास.
ओवेसी आणि इम्तियाझ यांनी चष्म्याचे नंबर बदलावे -केंद्रीय मंत्री भागवत
ओवेसी आणि इम्तियाझ यांनी चष्म्याचे नंबर बदलावे -केंद्रीय मंत्री भागवत.
लवकरच बरा होऊन... दिलीप वळसे पाटील यांचं दुखापतीनंतर पहिलं टि्वट काय?
लवकरच बरा होऊन... दिलीप वळसे पाटील यांचं दुखापतीनंतर पहिलं टि्वट काय?.
शिवसेनेत पक्ष प्रवेश करताच गोविंदाला हवी 'ही' जबाबदारी, शिंदे देणार?
शिवसेनेत पक्ष प्रवेश करताच गोविंदाला हवी 'ही' जबाबदारी, शिंदे देणार?.
जलील बोलका पोपट आणि चंद्रकांत खैरे नाकारलेला उमेदवार, कुणी केली टीका?
जलील बोलका पोपट आणि चंद्रकांत खैरे नाकारलेला उमेदवार, कुणी केली टीका?.
गोविंदाचा शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थित घोषणा
गोविंदाचा शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थित घोषणा.
बॉलिवूड कलाकार राजकारणात, सेनेकडून हे स्टार प्रचारक लोकसभेच्या रिंगणात
बॉलिवूड कलाकार राजकारणात, सेनेकडून हे स्टार प्रचारक लोकसभेच्या रिंगणात.