AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

टीसीने तिकिट मागितल्याचा राग, महिला प्रवाशाचा दोन भावांसह पोलीस ठाण्यात धिंगाणा

टिटवाळा येथे राहणारी शशी पांडे ही महिला काल रात्री आठ वाजण्याच्या सुमारास आसनगाव लोकलने टिटवाळा येथे जात होती. डोंबिवली जवळ एका महिला टीसीने तिच्याकडे तिकिट मागितले.

टीसीने तिकिट मागितल्याचा राग, महिला प्रवाशाचा दोन भावांसह पोलीस ठाण्यात धिंगाणा
तिकिट मागितल्याने महिलेकडून टीसीला धक्काबुक्कीImage Credit source: TV9
| Edited By: वैजंता गोगावले | Updated on: Dec 16, 2022 | 8:20 PM
Share

डोंबिवली : टीसीने तिकिट मागितले म्हणून महिलेने शिवीगाळ आणि धक्काबुक्की करत दोन भावांसह पोलीस ठाण्यात धिंगाणा घातल्याची घटना डोंबिवलीत घडली आहे. सदर महिला रेल्वेच्या फर्स्ट क्लासच्या डब्यातून प्रवास करत होती. याप्रकरणी डोंबिवली जीआरपी पोलिसांनी पोलीस कर्मचाऱ्यांना धक्काबुक्की करणाऱ्या महिलेसह तिच्या दोन भावांविरोधात डोंबिवली रेल्वे पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. रेल्वे पोलिसांनी दोघांना अटक केली आहे. नितीन पांडे आणि सर्वेश पांडे अशी अटक करण्यात आलेल्या दोघांची नावे आहेत.

विनातिकिट फर्स्ट क्लासमध्ये प्रवास करत होती महिला

टिटवाळा येथे राहणारी शशी पांडे ही महिला काल रात्री आठ वाजण्याच्या सुमारास आसनगाव लोकलने टिटवाळा येथे जात होती. डोंबिवली जवळ एका महिला टीसीने तिच्याकडे तिकिट मागितले. मात्र तिकिट नसल्याने महिला टीसीने दंडाची पावती शशीला दिली. त्यामुळे शशी संतापली.

शशीने आधी महिला टीसीला धक्काबुक्की केली

शशीने महिला टीसीशी हुज्जत घालण्यास सुरुवात करत धक्काबुक्की केली. डोंबिवली रेल्वे स्टेशनला उतरल्यावर संबंधित महिला टीसीने घडल्या प्रकाराबाबत डोंबिवली रेल्वे पोलिसात तक्रार नोंदवली. या दरम्यान शशी हिने आपल्या दोन्ही भावांना बोलवून घेतले.

बहिण-भावंडांनी पोलीस ठाण्यातही घातला गोंधळ

यानंतर बहिण भावांनी मिळून डोंबिवली रेल्वे पोलीस ठाण्यातही एकच गोंधळ घातला. याशिवाय पांडे बंधूंनी पोलीस कर्मचाऱ्यांना देखील धक्काबुक्की केली.

याप्रकरणी डोंबिवली रेल्वे पोलीस ठाण्यात नितीन पांडे आणि सर्वेश पांडे या दोन्ही भावांविरोधात गुन्हा दाखल करत दोघांना अटक केली. सेकंड क्लासचा पास असताना फर्स्ट क्लासमध्ये प्रवास करणाऱ्या प्रवाशावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Follow Us
530 कोटींचे बनावट टेंडर अन् ... गिरीश महाजनांच्या नातलगाने...
530 कोटींचे बनावट टेंडर अन् ... गिरीश महाजनांच्या लांबच्या नातलगाने टप्प्यात केला कार्यक्रम, नाशिक कुंभमेळ्यात कसा झाला घोटाळा?
पक्ष सत्तेत असला तर अपात्रतेची कारवाई होतच नाही, कपिल सिब्बल असं...
पक्ष सत्तेत असला तर अपात्रतेची कारवाई होतच नाही, कपिल सिब्बल असं का म्हणाले? टर्निंग पॉइंट ठरणारा मुद्दा काय?
तर एकनाथ शिंदेंना पक्ष मिळालाच नसता' त्या निर्णयावर...
तर एकनाथ शिंदेंना पक्ष मिळालाच नसता' त्या निर्णयावर... अखेर कपिल सिब्बल यांची कोर्टाकडे मोठी मागणी
भर मंचावरून जरांगेंचं व्यंग; अखेर बावनुकळे म्हणाले, 'माझ्या शरीर...
Manoj Jarange Video | भर मंचावरून मनोज जरांगेंचं व्यंग; अखेर बावनुकळे म्हणाले, 'माझ्या शरीरावरून, चेहऱ्यावरून...
पंजाबचे माजी मुख्यमंत्री सुखबीर सिंह यांच्यावर हल्ल्याचं नेमकं कारण...
Sukhbir Singh Badal | पंजाबच्या माजी मुख्यमंत्री सुखबीर सिंह यांच्यावर हल्ल्याचं नेमकं कारण काय? याआधीही... मोठी अपडेट समोर
अगामी सुनावणी मंगळवारी, पण... कोर्टाबाहेर येताच संजय राऊत नेमकं काय...
अगामी सुनावणी मंगळवारी, पण... कोर्टाबाहेर येताच संजय राऊत नेमकं काय म्हणाले?
शिवसेनेच्या सुनावणीत मोठा ट्विस्ट! हायकोर्टही पक्षाची नोंदणी रद्दचे...
शिवसेनेच्या सुनावणीत मोठा ट्विस्ट! हायकोर्टही पक्षाची नोंदणी रद्दचे आदेश आयोगाला देऊ शकत नाही, मग...
अपात्र होणाऱ्या... एकनाथ शिंदेंच्या अडचणी वाढल्या? कपिल सिब्बल...
अपात्र होणाऱ्या... एकनाथ शिंदेंच्या अडचणी वाढल्या? कपिल सिब्बल यांनी नेमका युक्तिवाद काय लढवला?
मोठी बातमी! निकाल कोणाच्या बाजून झुकतोय? सिब्बल यांचा नेमक्या...
मोठी बातमी! निकाल कोणाच्या बाजूने झुकतोय? सिब्बल यांचा नेमक्या मुद्यावर युक्तिवाद, कोर्टाचं निदर्शन काय?
कपिल सिब्बल यांचा निवडणूक आयोगाच्या निर्णयाला आव्हान
शिवसेना पक्षचिन्ह प्रकरण: कपिल सिब्बल यांचा निवडणूक आयोगाच्या निर्णयाला आव्हान