अवघ्या तीन रुपयांसाठी महिलेची हत्या, मुलावर जीवघेणा हल्ला; वाचा कुठे घडला हा धक्कादायक प्रकार

झारखंडच्या बोकारो परिसरात ही अंगावर काटा आणणारी घटना घडली आहे. बुधवारी दुपारच्या सुमाराच धक्कादायक घटना घडली असून आरोपी फरार झाला आहे.

अवघ्या तीन रुपयांसाठी महिलेची हत्या, मुलावर जीवघेणा हल्ला; वाचा कुठे घडला हा धक्कादायक प्रकार
नोकरीच्या वादातून दिल्लीत तिहेरी हत्याकांड
Follow us
| Updated on: Oct 27, 2022 | 3:33 PM

बोकोरो : किरकोळ कारणावरून वाद आणि त्या वादाचे पर्यवसान हत्या, जीवघेणा हल्ला यामध्ये होण्याचे प्रमाण वाढले आहे. कोरोना महामारीनंतर अशा गुन्ह्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर वाढ झाली आहे. झारखंडमध्ये एका महिलेची हत्या (Women Murder) झाली असून, त्या मागील कारण चक्रावून टाकणारे आहे. मारेकर्‍याने अवघ्या तीन रुपयांसाठी (Murder only for 3 rupees) महिलेची निर्घृण हत्या केली. इतकेच नव्हे तर त्या महिलेच्या मुलावर जीवघेणा हल्ला (Attack) केला. या घटनेने संपूर्ण परिसरा प्रचंड खळबळ उडाली असून स्थानिक पोलिसांनी घटनेचा कसून तपास सुरू केला आहे.

झारखंडच्या बोकारो परिसरात ही अंगावर काटा आणणारी घटना घडली आहे. बुधवारी दुपारच्या सुमाराच धक्कादायक घटना घडली असून आरोपी फरार झाला आहे. नगमा असे हत्या करण्यात आलेल्या महिलेचे नाव आहे.

काय आहे प्रकरण?

नगमाची दोन मुले इम्पियाज आणि मुमताज यांच्या गुड्डू नामक तरुणासोबत तीन रुपयांवरुन वाद सुरु होता. काही वेळात या वादाचे हाणामारीत रुपांतर झाले. गुड्डूने आपल्या मित्रासोबत मिळून नगमाच्या दोन्ही मुलांना मारहाण करण्यास सुरुवात केली.

हे सुद्धा वाचा

आरडाओरडा ऐकून नगमा घराबाहेर आली आणि भांडण सोडवण्याचा प्रयत्न करु लागली. यादरम्यान गुड्डूने खिशातील चाकू काढून नगमावर सपासप वार केले. तसेच तिच्या दोन्ही मुलांवरही वार केले. हल्ला केल्यानंतर आरोपी तेथून पसार झाला.

हल्ल्यात जखमी झालेल्या नगमा आणि तिच्या मुलांना स्थानिकांनी तात्काळ रुग्णालयात नेले. मात्र उपचारादरम्यान नगमाचा मृत्यू झाला. तर तिच्या मुलांवर उपचार सुरु आहेत.

फरार आरोपीचा पोलिसांकडून शोध सुरु

पोलीस सध्या त्या फरार आरोपीचा शोध घेत आहेत. आरोपीविरोधात हत्या आणि हत्येचा प्रयत्न तसेच अन्य गंभीर गुन्हे दाखल करण्यात आले असून, त्याच्या शोधासाठी विविध पथके तैनात करण्यात आली आहेत.

Non Stop LIVE Update
लोकसभा निवडणुकीतील कमी जागांवर शरद पवार यांचं मोठं विधान
लोकसभा निवडणुकीतील कमी जागांवर शरद पवार यांचं मोठं विधान.
एअर इंडियाची तेल अवीवमध्ये जाणारी सेवा 30 एप्रिलपर्यत स्थगित
एअर इंडियाची तेल अवीवमध्ये जाणारी सेवा 30 एप्रिलपर्यत स्थगित.
दोन महिन्यामध्ये एकनाथ शिंदे दिसणार नाहीत, प्रकाश आंबेडकरांचं वक्तव्य
दोन महिन्यामध्ये एकनाथ शिंदे दिसणार नाहीत, प्रकाश आंबेडकरांचं वक्तव्य.
बेकायदा फेरीवाल्यांवर थेट कारवाई करा, मुंबई हायकोर्टाचे स्पष्ट आदेश
बेकायदा फेरीवाल्यांवर थेट कारवाई करा, मुंबई हायकोर्टाचे स्पष्ट आदेश.
मोठी बातमी, धनगर आरक्षणाची याचिका सुप्रीम कोर्टानं फेटाळली
मोठी बातमी, धनगर आरक्षणाची याचिका सुप्रीम कोर्टानं फेटाळली.
अजित पवार लोकसभेची एकही जागा जिंकणार नाहीत, पाहा कोणी केलं भाकीत?
अजित पवार लोकसभेची एकही जागा जिंकणार नाहीत, पाहा कोणी केलं भाकीत?.
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग.
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?.
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?.
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद.