AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

सांगलीत पुन्हा मुलं पळवणारी टोळी आल्याची अफवा, साधूंनंतर आता चोर समजून महिलेला बेदम चोपले

जत तालुक्यात मुले चोरणारी टोळी आल्याचा मॅसेज सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. याच गैरसमजुतीतून हा प्रकार घडला आहे.

सांगलीत पुन्हा मुलं पळवणारी टोळी आल्याची अफवा, साधूंनंतर आता चोर समजून महिलेला बेदम चोपले
सांगलीत पुन्हा मुलं पळवणारी टोळी आल्याची अफवाImage Credit source: TV9
| Updated on: Sep 29, 2022 | 7:16 PM
Share

सांगली : मुलं पळवणारी टोळी (Child Kidnapping Gang) समजून साधूंना मारहाण केल्याचे प्रकरण ताजे असतानाच, आज पुन्हा मुले पळवणारी चोर समजून एका महिलेला झाडाला बांधून मारहाण (Beaten to Women) केल्याची घटना सांगलीत उघडकीस आली आहे. याप्रकरणी जत पोलिसांनी चार महिलांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. विशेष म्हणजे अशा अफवेतून मारहाणीची (Beating by Rumours) ही दुसरी घटना आहे. याआधी जत तालुक्यात साधूंना अशाच प्रकारे मारहाण करण्यात आली होती.

चोर समजून भंगार गोळा करणाऱ्या महिलेला मारहाण

सांगलीतील जत तालुक्यात मुले पळवणारी महिला चोर समजून महिला ग्रामस्थांनी झाडाला बांधून भंगार गोळा करणाऱ्या महिलेला मारहाण केली. जत तालुक्यात मुले चोरणारी टोळी आल्याचा मॅसेज सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. याच गैरसमजुतीतून हा प्रकार घडला आहे.

जतच्या ताड वस्ती जुने गोडावून येथे महिला लहान मुलांना घेऊन जात असताना मिळून आल्याने तिला पकडून ठेवले आणि झाडाला बांधण्यात आले. यावेळी मोठ्या संख्येने ग्रामस्थ आणि महिला जमा झाल्या होत्या. या महिलेला चार महिलांनी मारहाण केली.

जत पोलिसांनी केली महिलेची सुटका

घटनेची माहिती मिळताच जत पोलीस घटनास्थळी दाखल झाले आणि सदर महिलेला ताब्यात घेतले. ही महिला जतच्या शेगाव येथील रहिवासी आहे आणि भंगार गोळा करण्यासाठी आली होती. महिलेला तिच्या गावी पाठवण्यात आले आहे. तर मारहाण केलेल्या चार महिलांच्या विरोधात जत पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल केला आहे.

याआधी साधूंना झाली होती मारहाण

काही दिवसांपूर्वी मुले चोरणारी टोळी समजून जत तालुक्यातील लवंगा येथे चार साधूंना मारहाण करण्यात आली होती. जतमधील ही दुसरी घटना आहे. पोलिसांनी सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या व्हिडीओवर विश्वास ठेवू नये, असे आव्हान केले आहे.

T20 विश्वचषक स्पर्धेतून मोठी बातमी; 'हा' संघ थेट बाहेर
T20 विश्वचषक स्पर्धेतून मोठी बातमी; 'हा' संघ थेट बाहेर.
एकाच वेळी 7 घरांमध्ये चोरी; लाखोंची रक्कम लंपास
एकाच वेळी 7 घरांमध्ये चोरी; लाखोंची रक्कम लंपास.
मुंबईच्या महापौरपदाचा मान महिलेला मिळताच भाजपची पहिली प्रतिक्रिया
मुंबईच्या महापौरपदाचा मान महिलेला मिळताच भाजपची पहिली प्रतिक्रिया.
महापौर आरक्षण सोडतीवरून ठाकरे गट नाराज, मिसाळ यांनी सांगितले नियम
महापौर आरक्षण सोडतीवरून ठाकरे गट नाराज, मिसाळ यांनी सांगितले नियम.
ST प्रवर्गाच्या चिठ्ठ्या का टाकल्या नाहीत? पेडणेकरांचा सवाल
ST प्रवर्गाच्या चिठ्ठ्या का टाकल्या नाहीत? पेडणेकरांचा सवाल.
महापौरपदाच्या आरक्षणाने इच्छुकांच्या आशांवर पाणी; पुण्यात मोठा ट्विस्ट
महापौरपदाच्या आरक्षणाने इच्छुकांच्या आशांवर पाणी; पुण्यात मोठा ट्विस्ट.
मुंबईत आवाज भाजपचाच... खुल्या प्रवर्गातील महिलांसाठी महापौरपद राखीव
मुंबईत आवाज भाजपचाच... खुल्या प्रवर्गातील महिलांसाठी महापौरपद राखीव.
29 महापालिकांच्या महापौरपदासाठी आरक्षण सोडत निघाली आहे
29 महापालिकांच्या महापौरपदासाठी आरक्षण सोडत निघाली आहे.
छत्रपती संभाजीनगरमध्ये भाजप–शिंदे सेनेची युती 24 तासांतच कोसळली?
छत्रपती संभाजीनगरमध्ये भाजप–शिंदे सेनेची युती 24 तासांतच कोसळली?.
ठाकरे बंधूंच्या मनोमिलनात पहिला मीठाचा खडा, कल्याण-डोंबिवलीतच सुरुंग
ठाकरे बंधूंच्या मनोमिलनात पहिला मीठाचा खडा, कल्याण-डोंबिवलीतच सुरुंग.