प्रेमातील वाद टोकाला गेला, तरुणाचा प्रेयसीवर जीवघेणा हल्ला, कुठे घडली घटना ?

प्रेम प्रकरणातील वादातून ही हत्या आणि आत्महत्या घडल्याचे प्राथमिक तपासात कळते. मात्र पोलीस तपासानंतरच नक्की प्रकरण काय ते स्पष्ट होईल.

प्रेमातील वाद टोकाला गेला, तरुणाचा प्रेयसीवर जीवघेणा हल्ला, कुठे घडली घटना ?
वीजेचा शॉक लागून मायलेकाचा दुर्दैवी मृत्यूImage Credit source: TV9
Follow us
| Updated on: Sep 28, 2022 | 6:47 PM

पालघर : एका तरुणाने तरुणीवर भरदिवसा गोळीबार केल्याची धक्कादायक घटना बोईसर (Boisar) परिसर घडली आहे. प्रेम प्रकरणातून हा गोळीबार (Firing in Boisar) केल्याचा प्राथमिक अंदाज बोईसर पोलिसांकडून व्यक्त केला जातोय. तरुणीवर हल्ला (Attack on Young Girl) केल्यानंतर आरोपीने गाडीखाली उडी घेत आत्महत्येचा प्रयत्न केला. यात आरोपी गंभीर झाला होता. त्याला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला.

बोईसरमधील धक्कादायक घटना

स्नेहा दिनेशकुमार मेहतो असे हल्ल्यात मृत्यू झालेल्या तरुणीचे नाव आहे. तर कृष्णा यादव असे आरोपी तरुणाचे नाव आहे. बोईसरमधील टिमा हॉस्पिटलजवळ ही धक्कादायक घटना घडली आहे.

गोळीबारात तरुणीच्या डोक्याला मार लागल्याने तिचा मृत्यू

कृष्णाने स्नेहावर गोळीबार केला. या गोळीबारात स्नेहाच्या डोक्याला मार लागल्याने तिचा जागीच मृत्यू झाला. यानंतर आरोपी कृष्णा यादवने पळून जाण्याचा प्रयत्न केला. यावेळी स्थानिकांनी आरोपीचा पाठलाग केला. मात्र सीआयएसएफच्या गाडीखाली येऊन त्याने आत्महत्येचा प्रयत्न केला.

हे सुद्धा वाचा

तरुणाचा आत्महत्येचा प्रयत्न

गाडीखाली आल्याने जखमी झालेल्या तरुणाला रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. मात्र रुग्णालयात उपचारादरम्यान आरोपी तरुणाचा मृत्यू झाला. याप्रकरणी बोईसर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस अधिक तपास करत आहेत.

पोलिसांचा तपास सुरु

या तरुण-तरुणीबाबत अधिक चौकशी पोलीस करत आहेत. प्रेम प्रकरणातील वादातून ही हत्या आणि आत्महत्या घडल्याचे प्राथमिक तपासात कळते. मात्र पोलीस तपासानंतरच नक्की प्रकरण काय ते स्पष्ट होईल.

दिवसाढवळ्या घडलेल्या या घटनेमुळे परिसरात खळबळ माजली आहे.

Non Stop LIVE Update
तर तुतारी वाजवून टाका, राणांच्या विधानानंतर सुजय विखेंच वक्तव्य चर्चेत
तर तुतारी वाजवून टाका, राणांच्या विधानानंतर सुजय विखेंच वक्तव्य चर्चेत.
हा आचारसंहितेचा भंग नाही?दादांच्या वक्तव्यावर ठाकरेंच्या नेत्याचा सवाल
हा आचारसंहितेचा भंग नाही?दादांच्या वक्तव्यावर ठाकरेंच्या नेत्याचा सवाल.
राणा दाम्पत्याची अडसूळांनी काढली अक्कल; म्हणाले, राजकारण सोडेल पण...
राणा दाम्पत्याची अडसूळांनी काढली अक्कल; म्हणाले, राजकारण सोडेल पण....
पुढे द्रौपदीचा विचार...मुलींच्या जन्मदरावर दादांच्या वक्तव्याची चर्चा
पुढे द्रौपदीचा विचार...मुलींच्या जन्मदरावर दादांच्या वक्तव्याची चर्चा.
थेट विमानातून पंतप्रधान मोदी झाले 'त्या' विलक्षण सोहळ्याचे साक्षीदार
थेट विमानातून पंतप्रधान मोदी झाले 'त्या' विलक्षण सोहळ्याचे साक्षीदार.
उदयनराजेंना तिकीट मिळालं पण भाजपने अपमान केला, अभिजीत बिचुकलेंची टीका
उदयनराजेंना तिकीट मिळालं पण भाजपने अपमान केला, अभिजीत बिचुकलेंची टीका.
संध्याकाळी 6 वाजेनंतर उमेदवारांना प्रचार करता येणार नाही, कारण....
संध्याकाळी 6 वाजेनंतर उमेदवारांना प्रचार करता येणार नाही, कारण.....
मी मी म्हणारे चालत नाही, ज्यांचे पुण्य संपले..., महाजनांचा रोख कुणावर?
मी मी म्हणारे चालत नाही, ज्यांचे पुण्य संपले..., महाजनांचा रोख कुणावर?.
चारही खांदे गेले तर मी..., राम बोलो भाई राम, गुलाबराव पाटलांची बॅटिंग
चारही खांदे गेले तर मी..., राम बोलो भाई राम, गुलाबराव पाटलांची बॅटिंग.
राणांची आनंद अडसूळांनी काढली अक्कल,पती-पत्नी त्यांच्या मुलाच्या भेटीला
राणांची आनंद अडसूळांनी काढली अक्कल,पती-पत्नी त्यांच्या मुलाच्या भेटीला.