AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

वसईत इंजिनिअरिंग कंपनीला भीषण आग; तीन जणांचा मृत्यू, नऊ जण गंभीर जखमी

दुपारी 40 सिलेंडरची गाडी कंपनीत आली होती. ते सिलेंडर भरत असतानाच बॉयलरचा स्फोट झाला आणि भीषण आग लागली.

वसईत इंजिनिअरिंग कंपनीला भीषण आग; तीन जणांचा मृत्यू, नऊ जण गंभीर जखमी
वसईत एका कंपनीला भीषण आगImage Credit source: TV9
| Updated on: Sep 28, 2022 | 6:53 PM
Share

वसई / विजय गायकवाड (प्रतिनिधी) : वसई (Vasai)तील कॉश पावर इंजिनिअरिंग लिमिटेड कंपनीत बॉयलरचा स्फोट (Boiler Blast) होऊन भीषण आग (Fire) लागली आहे. या आगीत 3 कामगारांचा जागीच मृत्यू झाला, तर 7 जण गंभीर जखमी झाले आहेत. आज दुपारी अडीच वाजता ही घटना घडली आहे. या स्फोटावेळी 1 ते 2 किलोमीटरपर्यंत आवाज घुमला. सुमारे 4 ते 5 किमीपर्यंत धुराचे लोळ दिसत आहेत. अग्नीशमन दलाने शर्थीचे प्रयत्न करुन आग विझवली.

दुपारी अडीचच्या सुमारास लागली आग

वसईत मुंबई अहमदाबाद महामार्ग नजीक जूचंद्र परिसरात कॉश पावर इंजिनिअरिंग लिमिटेड ही कंपनी आहे. या कंपनीत एकूण 50 कामगार काम करीत होते. दुपारी 2.30 च्या सुमारास कंपनीतील बॉयलरचा स्फोट झाला. यामुळे कंपनीला भीषण आग लागली.

आग विझवण्याचे शर्थीचे प्रयत्न सुरु

यानंतर तात्काळ वसई विरार महापालिकेच्या अग्निशमन दलाला घटनास्थळी पाचारण करण्यात आले. अग्नीशमन दलाकडून दोन तासापासून आग विझवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न करत आगीवर नियंत्रण मिळवले.

तिघांचा मृत्यू, नऊ जण जखमी

या आगीतून 40 कामगार सुखरुप बचावले आहेत. मात्र दुर्दैवाने 10 जण आत असल्याने ते आगीमुळे अडकले होते. यापैकी 3 जणांचा जागीच मृत्यू झाला तर 9 जण जखमी झाले. जखमींपैकी एकाची प्रकृती चिंताजनक आहे. जखमींना उपचारासाठी विविध रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

ग्रामपंचायत हद्दीत बेकायेशीर सुरु होती कंपनी

सदर कंपनी ग्रामपंचायत हद्दीत असून कंपनीला रितसर परवानगी नाही. चंद्रापाडा ग्रामपंचायत वाकी पाडा पाझर तालावाजवळ ही कंपनी आहे. एक वर्षापूर्वीच ही कंपनी सुरु करण्यात आली आहे. सुरक्षेची कुठलीही उपाययोजना कंपनीत नव्हती.

जेवणाची वेळ असल्याने बाहेर गेल्याने 38 कामगार बचावले

दुपारची वेळ जेवणाची वेळ असल्याने स्थानिक कामगार जेवणासाठी गेले होते आणि 12 कर्मचारी कंपनीत होते. तर 38 कामगार बाहेर असल्याने ते वाचले आहेत.

जखमींपैकी तिघांना वसईतील प्लॅटिनम हॉस्पिटलमध्ये, चौघांना मीरा रोड येथील ऑरबीट हॉस्पिटलमध्ये, तर दोघांना वसई जूचंद्र एफ अँड बी हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आहे.

सिलेंडर भरताना भीषण स्फोट

दुपारी 40 सिलेंडरची गाडी कंपनीत आली होती. ते सिलेंडर भरत असतानाच बॉयलरचा स्फोट झाला आणि भीषण आग लागली.

छत्रपती संभाजीनगरमध्ये भाजप–शिंदे सेनेची युती 24 तासांतच कोसळली?
छत्रपती संभाजीनगरमध्ये भाजप–शिंदे सेनेची युती 24 तासांतच कोसळली?.
ठाकरे बंधूंच्या मनोमिलनात पहिला मीठाचा खडा, कल्याण-डोंबिवलीतच सुरुंग
ठाकरे बंधूंच्या मनोमिलनात पहिला मीठाचा खडा, कल्याण-डोंबिवलीतच सुरुंग.
मुंबईचा महापौर कोण? आरक्षण सोडतीकडे राज्याचं लक्ष
मुंबईचा महापौर कोण? आरक्षण सोडतीकडे राज्याचं लक्ष.
कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल
कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल.
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?.
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने...
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने....
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?.
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा.
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका.
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?.