Pandharpur Attack : संशयातून तरुणावर जीवघेणा हल्ला, मुलाला वाचवण्यासाठी आईने हातावर झेलला वार

मुलावर केलेला तलवारीचा वार जयश्री यांनी स्वतःच्या हातावर झेलला. यामध्ये त्यांच्या हाताचा पंजा तुटला आहे. याबाबत बालाजी रणदिवे यांनी तालुका पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली.

Pandharpur Attack : संशयातून तरुणावर जीवघेणा हल्ला, मुलाला वाचवण्यासाठी आईने हातावर झेलला वार
संशयातून तरुणावर जीवघेणा हल्लाImage Credit source: Google
Follow us
| Updated on: Jul 29, 2022 | 9:11 PM

पंढरपूर : तालुक्यातील खर्डी येथे अनैतिक संबंध (Immoral Relations) असल्याच्या संशयावरून एका तरुणावर तलवार आणि कुऱ्हाडीने हल्ला (Attack) करून त्याला जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याची घटना उघडकीस आली आहे. मात्र तलवारीचा वार आईने हातावर घेऊन आपल्या मुलास वाचवले. यात आईचा हात तुटला असून तिला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या घटनेमुळे खर्डी गावात खळबळ उडाली आहे. याप्रकरणी पंढरपूर तालुका पोलीस ठाण्यात चौघांविरोधात गुन्हा दाखल (Case File) करण्यात आला आहे. पोलिसांनी आरोपींना अटक केली आहे. रामदास कांबळे, हरिदास कांबळे, सिताराम कांबळे, संतोष उकिरडे अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत.

किरकोळ वादातून तरुणावर जीवघेणा हल्ला

खर्डी येथील संतोष रणदिवे याचा आरोपी रामदास कांबळे याच्याशी किरकोळ वाद झाला होता. या वादाचे पर्यावसन भांडणात झाले. तू माझ्या भावाच्या पत्नीबरोबर संबंध का ठेवतो, असे म्हणत आरोपी रामदास कांबळे याने संतोषवर तलवार आणि कुर्‍हाडीने खुनी हल्ला करण्याचा प्रयत्न केला. यावेळी संतोषची आई जयश्री रणदिवे भांडण सोडविण्यासाठी मध्ये पडल्या. मुलावर केलेला तलवारीचा वार जयश्री यांनी स्वतःच्या हातावर झेलला. यामध्ये त्यांच्या हाताचा पंजा तुटला आहे. याबाबत बालाजी रणदिवे यांनी तालुका पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली. फिर्यादीनुसार रामदास कांबळे, हरिदास कांबळे, सिताराम कांबळे, संतोष उकिरडे यांच्यावर हत्येचा प्रयत्न केल्याबद्दल गुन्हा दाखल करण्यात आला असून, आरोपींना अटक करण्यात आली आहे. (A young man was fatally attacked in Pandharpur on suspicion of having an immoral relationship)

हे सुद्धा वाचा

Non Stop LIVE Update
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी.
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ.
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान.
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका.
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर.
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार.
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.