भयानक! खिडक्यांचे पडदे फाडून बांधून प्रवाशांना ठेवले; धावत्या बस मध्ये तरुणीवर गँग रेप केला आणि…

बसमध्ये चढलेल्या या दरोडेखोरांनी प्रवाशांना धमकावले. खिडक्यांचे पडदे फाडून त्यांना बांधून ठेवले. यांनतर आरोपींनी एका 25 वर्षीय तरुणीवर बलात्कार केला. यानंतर दरोडेखोरांनी बसमधील प्रवाशांचे पैसे, मोबाईल फोन तसेच इतर मौल्यवान वस्तू हिसकावून घेतल्या. यानंतर बलात्कार केलेल्या तरुणीला रस्त्याच्या कडेला असलेल्या खड्ड्यात फेकून दिले. यानंतर दरोडेखोर बस मधून खाली उतरले आणि त्यांनी बस उलटवून दिली.

भयानक! खिडक्यांचे पडदे फाडून बांधून प्रवाशांना ठेवले; धावत्या बस मध्ये तरुणीवर गँग रेप केला आणि...
वनिता कांबळे

|

Aug 05, 2022 | 5:56 PM

ढाका : धावत्या बसमध्ये एका 25 वर्ष तरुणीला सामूहिक बलात्कार(Gang Rape) केल्याची धक्कादायक घटना बांगलादेशात(Bangladesh) घडली आहे आरोपींना बसमधील खिडक्यांचे पडदे फाडून इतर प्रवाशांना बांधून ठेवले. यानंतर तरुणीवर बलात्कार करुन तिला रस्त्याच्या कडेला असलेल्या दरीत फेकून दिले. या आरोपींनी बलात्कारानंतर प्रवाशांना देखील लुटले. यानंतर आरोपींनी बस उलटवली आणि त्यांनी घटनास्थळावरुन धूम ठोकली. या घटनेमुळे पोलीस देखील हडबडले आहेत. या प्रकरणी पोलिसांना एका आरोपीला अटक केली आहे.

म्होरक्या पोलिसांच्या ताब्यात

बांगलादेशातील ढाका येथे टांगेल ते चट्टोग्रामला जाणाऱ्या बसमधील प्रवाशांनी हा थरारक अनुभव घेतला आहे. बसमधील एका 25 वर्षीय तरुणीवर बलात्कार करून आरोपींनी बसमधील प्रवांशांना लुटल्याची धक्कादायक घटना चर्चेचा विषय बनली आहे. या दरोडेखोरांच्या टीळीच्या म्होरक्याला पोलिसांनी अटक केलेय. या म्होरक्यानेच दरोड्याचा कट रचला होता. न्यायालयाने त्याला 5 दिवसांची कोठडी सुनावली आहे. ढाका-टांगेल महामार्गावरील टांगेलच्या मधुपूर उपजिल्हामधील रक्तीपारा भागात दोन ते तीन ऑगस्ट दरम्यान ही घटना घडली आहे. टांगेलचे एसपी सरकार एमडी कैसर यांनी या बलात्कार आणि दरोडा प्रकरणाची सविस्तर माहिती दिलेय.

बस चहा नाश्त्यासाठी हॉटेलवर थांबली असताना दरोडेखोर बसमध्ये घुसले

‘ईगल परिवहन’ची बस मंगळवारी रात्री उशीरा 24 प्रवाशांना घेऊन कुश्तियाहून चट्टोग्रामकडे निघाली असताना हा प्रकार घडला. बस सिराजगंज जिल्ह्यातील एका हॉटेलमध्ये चहा आणि नाश्ता करण्यासाठी थांबली होती. येथून बस निघाली तेव्हा 7 दरोडेखोर बसमध्ये चढले होते. पाच ते दहा मिनिटांनी त्यांचे आणखी चार साथीदार बसमध्ये चढले.

बलात्कार करुन प्रवाशांना लुटले

बस सुरु असतानाच बसमध्ये चढलेल्या या दरोडेखोरांनी प्रवाशांना धमकावले. खिडक्यांचे पडदे फाडून त्यांना बांधून ठेवले. यांनतर आरोपींनी एका 25 वर्षीय तरुणीवर बलात्कार केला. यानंतर दरोडेखोरांनी बसमधील प्रवाशांचे पैसे, मोबाईल फोन तसेच इतर मौल्यवान वस्तू हिसकावून घेतल्या. यानंतर बलात्कार केलेल्या तरुणीला रस्त्याच्या कडेला असलेल्या खड्ड्यात फेकून दिले. यानंतर दरोडेखोर बस मधून खाली उतरले आणि त्यांनी बस उलटवून दिली.

मुख्य आरोपी बांगलादेशच्या परिवहन सेवेत ड्रायव्हर म्हणून कार्यरत होता

या प्रकरणातील मुख्य आरोपीची न्यायालयाने पाच दिवसांच्या कोठडीत रवानगी केली. आरोपीचे नाव राजा मिया(वय 32 वर्षे) असे आहे. तो जिल्ह्य़ातील कालिहाटी उपजिल्हा येथील रहिवासी आहे. ढाका-टांगेल रस्त्यावर झटिका परिवहन अर्थात बांग्लादेशमध्ये परिवहन सेवेत ड्रायव्हर म्हणून कार्यरत होता.

आरोपींकडे होते तीन मोबाईल

यापूर्वी डिटेक्टिव्ह ब्रँचने (डीबी) राजा मिया याला जिल्ह्यातील देवळा परिसरातून अटक केली होती. यावेळी त्याच्याकडून तीन मोबाईल जप्त करण्यात आले होते. आरोपी राजाने दरोड्याची कबुली दिली आहे. मात्र, महिलेवर बलात्कार केला नाही असे त्याने पोलिसांना सांगीतले. मात्र, बलात्कार पीडितेची तांगेल सामान्य रुग्णालयात वैद्यकीय तपासणी करण्यात आली. रुग्णालयातील स्त्रीरोगतज्ज्ञ डॉ. रेहेना परवीन यांनी सांगितले की, पीडितेच्या शरीरावर जखमांच्या खुणा आहेत.

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें